बेरोजगारांना मोठा दिलासा! नव्या वर्षात रोजगार वाढणार; जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगारांसाठी खुशखबर आहे. 2022 मध्ये नोकऱ्यांच्या संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशासह जगावर कोरोनाचे संकट होते. मात्र आता हळूहळू कोरोनाचे सावट दूर होत असून, उद्योगधंद्यांना गती आली आहे.

बेरोजगारांना मोठा दिलासा! नव्या वर्षात रोजगार वाढणार; जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 11:03 AM

नवी दिल्ली : नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगारांसाठी खुशखबर आहे. 2022 मध्ये नोकऱ्यांच्या संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशासह जगावर कोरोनाचे संकट होते. मात्र आता हळूहळू कोरोनाचे सावट दूर होत असून, उद्योगधंद्यांना गती आली आहे. परिणामी उत्पादन वाढले असून, येणाऱ्या काळात विविध क्षेत्रात मोठ्याप्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. मात्र कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट आल्यास परिस्थिती अंदाजाच्या विपरीत असू शकते, असे देखील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

रोजगार वाढणार

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सकंट आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा उद्योगधंद्यांना प्रचंड फटका बसला. उत्पादन ठप्प झाल्याने, उद्योग बंद करण्याची वेळ आली. उद्योगधंदे आर्थिक डबघाईला आल्याने अनेकांनी आपले रोजगार गमावले. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले आहे. मात्र तरी  देखील अद्यापही रोजगार म्हणावा असा वाढला नाही. याबाबत बोलताना फार्म टीमलीज सर्व्हिसेसचे प्रमुख बालासुब्रमण्यन यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या सावटातून सध्या तरी आपण बाहेर येत आहोत. उद्योगधंदे पूर्वपदावर आल्याने त्यांना देखील अतिरिक्त मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील वर्ष हे रोजगारासाठी अनुकूल असेल.

…तर बसू शकतो फटका

SHRM इंडियाचे ज्येष्ठ सल्लागार नित्य विजयकुमार यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका हा जागतिक अर्थव्यवस्थेला बसला होता. लाखो लोकांनी आपले रोजगार गमावले होते. मात्र आता परिस्थिती हळूहळ सुधारत आहे.  लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेनंतर उद्योगधंदे सुरू झाले आहेत. रोजगार देखील वाढले आहेत. येत्या वर्षात त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झालेली घट आणि वाढते लसीकरण या दोन गोष्ट रोजगाराच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत. मात्र आता जर कोरोनाची तिसीर लाट आली तर मात्र अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.

संबंधित बातम्या 

Income Tax Return Filing : आतापर्यंत 4.43 कोटींपेक्षा अधिक आयकर रिटर्न दाखल

पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

31 डिसेंबरच्या आत पूर्ण करा ‘ही’ कामे; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.