कामाची बातमी : नोकरीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहात? जाणून घ्या योग्य पद्धतीने कसा घ्यावा हा निर्णय

भारतात प्रत्येक 5 पैकी 4 कर्मचारी या वर्षी नोकरी बदलण्यासाठी तयार असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच अमेरिका आणि जगभरात मागील वर्षी चालणारा हा 'द ग्रेट रेजिग्नेशन'चा प्रभाव आता भारतात सुद्धा आपल्याला दिसू लागला आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या विचारात आहात तर जरा थांबा. आज आम्ही तुम्हाला हा निर्णय योग्य पद्धतीने कसा घ्यावा यासंबंधीची माहिती देणार आहोत, याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल..

कामाची बातमी : नोकरीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहात? जाणून घ्या योग्य पद्धतीने कसा घ्यावा हा निर्णय
प्रातिनिधिक फोटो (PC - Google Images)
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 1:52 PM

करियर स्ट्रैटेजिस्ट आणि लीडरशिप कोच सबरीना लिंक्डइनवर करिअर संबंधी आपले विचार लिहीत असतात. त्या सांगतात की तुम्ही एका प्रोफेशनलच्या स्वरुपात स्वतःची एक इमेज बनवली आहे, त्यामुळे रेजिग्नेशनला इतक्या हलक्यात घेऊन स्वतःचे नाव आणि प्रतिष्ठा यांच्यावर चुकीचा प्रभाव पडणार नाही याची काळजी घ्या. ज्या पद्धतीने आपण लग्न, मुलं, घर खर्च, रिटायरमेंट (Retirement) या सर्व गोष्टी चे प्लॅन करतो, त्याच पद्धतीने रेजिग्नेशन सुद्धा प्लॅन करणं आवश्यक आहे. अमेरिकेत (America) साधारणतः 3.4 करोड लोकांनी 2021 या वर्षात नोकरी सोडली, आता भारतात 2022 मध्ये 82 टक्के लोक नोकरी बदलण्याच्या तयारीत आहेत. आपण सर्व आपल्या करिअरमध्ये (Career) पुढे जाण्यासाठी एक नोकरी सोडून दुसरी नोकरी करत असतो, मात्र असे निर्णय घेताना आपण कोणत्याही प्रकारची घाई करता कामा नये. आज याच विषयाच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत की रेजिग्नेशन देण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे.

रेजिग्नेशन देण्याआधी स्वतः ला विचारा 4 प्रश्न :

1. मानसिकदृष्ट्या नोकरीचा राजीनामा देण्यासाठी तयार आहात की नाही? 2. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला त्या नोकरीचा राजीनामा देण्यासाठी प्रवृत्त करत आहे? 3. काय करियर मध्ये पुढे जाण्याची योग्य वेळ आहे? 4. काय तुम्हाला विचार करण्यासाठी आणखी काही वेळ घेण्याची आवश्यकता आहे?

नोकरी सोडण्याआधी आर्थिक बाजू मजबूत करा

1.नेहमी आपला प्रयत्न असला पाहिजे कि एक जॉब सोडत असताना दुसरा जॉब आपल्या हातात असणे अत्यंत आवश्यक आहे. 2. जर नोकरी नसेल तर पुढच्या किती दिवसांचा खर्च आपण त्याशिवाय उचलू शकतो याची खातरजमा करणे आवश्यक आहे. 3. जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड उपलब्ध नसेल तर कमीत कमी पुढील तीन ते सहा महिन्यांचे आर्थिक नियोजन करून निर्णय घेणे आवश्यक आहे. 4. तुम्ही जॉब वर नसताना तुमच्या सर्व खर्चाची यादी बनवून त्या पद्धतीने खर्चावर अंकुश कसा लावता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 5. किराणा ,खाणेपिणे ,लोन, कुटुंबाचा खर्च ,पेट्रोल डिझेलचा खर्च, इन्शुरन्स या सर्व गोष्टींचा खर्च कसा उचलणार आहोत याची एक लिस्ट बनवा. 6. या सर्व गोष्टींसाठी आपल्याला किती खर्च येणार आहे त्याची एक लिस्ट बनवून त्या पद्धतीने पैसे सेविंग करणे गरजेचे आहे.

राजीनामा देण्याचे तुम्ही ठरवलेच आहे तर काय करावे लागेल?

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कंपनीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

राजीनामा देणे आधी तुम्हाला त्यासंबंधीची नोटीस असणे आवश्यक आहे.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवले पाहिजे कधीही कुठल्या वादामध्ये आपण पडू नये.

ऑफिस मधल्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत आपले मैत्रिपूर्ण संबंध असणे गरजेचे आहे, जेणेकरून पुन्हा तेथे काम करण्याची गरज पडल्यास आपण सहजरित्या तिथे काम मिळवू शकू.

राजीनामा बद्दल काय मत आहे एक्सपर्टचे..?

प्लॅनिंग न करता राजीनामा देणे चुकीचा निर्णय असू शकतो.

अलीकडेच न्यूयॉर्क टाईम्समध्ये एक लेख छापून आला होता, त्यामध्ये करियर कोच आणि सल्लागार जेस वास सांगतात की, आपण नेहमी तेच काम करतो जे आपल्याला करावेसे वाटते. पण दुसऱ्या व्यक्ती आपल्याकडून वेगळ्या कामाची अपेक्षा करतात. याच कारणामुळे आपल्यापैकी अनेक जण करिअर संबंधी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. अशा वेळी तुम्ही या गोष्टीचाही विचार केला पाहिजे की आपल्यासाठी महत्त्वाचे काय आहे. नोकरी सोडणे उज्वल भविष्यासाठी कदाचित त्यावेळी योग्य निर्णय असू शकतो. मात्र घाईत तुम्ही हा निर्णय घेत असाल तर त्याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे यासाठी योग्य पद्धतीने प्लानिंग करणे गरजेचे आहे.

मॉन्स्टर डॉट कॉमचे करियर कोच विक्की सालेमी म्हणतात की ,कोविड महामारीमुळे आपल्याला आपल्या जीवना सोबतच करिअरकडे सुद्धा योग्य दृष्टिकोनातून बघण्याची संधी मिळाली आहे. अशातच कोणत्याही प्लॅनिंग शिवाय असा निर्णय घेणे चुकीचा निर्णय ठरवू शकतो. त्यामुळे जोपर्यंत तुमच्याकडे योग्य संधी नाही तोपर्यंत राजीनामा देण्याचा विचार करू नये.

करियर गाइडेंस इंडियाचे डायरेक्टर प्रवीण मल्होत्रा असे म्हणतात की,

अनेकदा आपण चुकीच्या जॉबच्या ठिकाणी फसतो आणि त्यामुळे कोणताही विचार न करता आपण तो जॉब सोडत असतो. अनेकदा अचानक राजीनामा देण्यासारखी परिस्थिती निर्माण होते, अशावेळी प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की कोरोनाचा काळ सुरू आहे. दुसरा जॉब हातात असण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक नोकरीमध्ये कोणती ना कोणती आव्हाने आहेत त्यांचा सामना करणे गरजेचे आहे. यानंतर सुद्धा काही कारण असेल तर बॅकअप ठेवून तुम्ही राजीनामा देऊ शकता.

संबंधित बातम्या :

सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्सची 600 अंकांनी घसरला! गुंतवणूकदारांचे 5.28 लाख कोटी रुपये बुडाले

Driving Licence | तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपली? कशा प्रकारे करा चेक करायची डेडलाइन?

Financial Fraud : तुमच्या ही बँक खात्यातून पैसे झाले गायब? चिंता करू नका अशाप्रकारे थांबवा पुढील धोका

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.