दोन वर्षाच्या FD तूनही मिळणार नाही एवढा परतावा मिळाला आहे. कसा आणि कुठे फायदा झाला ते वाचा

काही शेअर्समधील नफा हा त्या कंपन्यांच्या स्वतःच्या कामगिरीवरही अवलंबून असतो, असाच एक स्टॉक हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड म्हणजेच एचसीसीचा आहे. गुरुवारी झालेल्या ट्रेडिंग दरम्यान स्टॉकला गुंतवणूकदारांना सुमारे 15 टक्के परतावा मिळाला आहे.

दोन वर्षाच्या FD तूनही मिळणार नाही एवढा परतावा मिळाला आहे. कसा आणि कुठे फायदा झाला ते वाचा
शेअर बाजारात आज नेमकं काय घडलं?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 4:45 PM

मुंबईः शेअर बाजारातील (stock market)  तेजी कायम असून आजही शेअर बाजार मोठी उसळी घेऊन बंद झाला. शेअर मार्केटमध्ये तेजीने एकदा उसळी घेतली की, गुंतवणूकदारांना (Investors) शेअर्समध्ये इतका परतावा मिळतो की, कोणत्याही बँकेच्या एफडीमध्ये (Bank FD) मिळत नाही इतका परतावा शेअर्समध्ये मिळून जातो. तर काही शेअर्समधील नफा हा त्या कंपन्यांच्या स्वतःच्या कामगिरीवरही अवलंबून असतो, असाच एक स्टॉक हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड म्हणजेच एचसीसीचा आहे. गुरुवारी झालेल्या ट्रेडिंग दरम्यान स्टॉकला गुंतवणूकदारांना सुमारे 15 टक्के परतावा मिळाला आहे.

एचसीसीचा परतावा हा इतका मोठा आहे की, कोणत्याही बँकेमधून दोन वर्षानंतरही हा फायदा एफडीमधून मिळणार नाही. शेअर्स बाजारात आज हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनच्या शेअरमध्ये मोठी उसळी आली आहे.

काही काळापासून स्टॉकमध्ये घसरण

हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनच्या शेअरमध्ये आज मोठी उसळी बघायला मिळाली. बीएसईवर आज शेअर 14.6 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आजच्या शेअर बाजारा स्टॉकने 17.2 चा उच्चांक गाठला असून स्टॉकची मागील बंद पातळी 15 होती. स्टॉकचा एक वर्षाचा उच्चांक 20 आहे, तर स्टॉकला मिळालेला वर्षाचा निच्चांक 7 आहे. मात्र, गेल्या काही काळापासून स्टॉकमध्ये घसरण दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी हाच शेअर १७.५३ च्या पातळीवर होता, तर 3 महिन्यांपूर्वी स्टॉक 14.75 च्या पातळीवर राहिला होता. तर आजच्या बाजारभावात हा शेअर 17 च्या जवळ पोहोचला आहे. व्यवहाराच्या शेवटी हा शेअर 12 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

स्टॉक वाढला कारण

हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरमध्ये झालेल्या आजच्या वाढीच्या बातमीनंतर कंपनीला 600 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. हा आदेश एका कंसोर्टियमकडून प्राप्त झाला असून त्यामध्ये ओम इन्फ्रा आणि एचसीसीचा समावेश आहे. कंपनीकडून प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे की, HCC ला राजस्थानच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाकडून ओम इन्फ्रा सोबतच्या संघामध्ये ऑर्डर मिळाली आहे.

कंपनीकडून नळ पाणी पुरवठा योजना

मिळालेल्या आदेशानुसार कंपनीला बिकानेर जिल्ह्यातील घरांमध्ये नळ पोहोचवण्यासाठी नोखा पाणीपुरवठा प्रकल्प बांधावा लागणार आहे.या JV मध्ये HCC चा वाटा 50 टक्के आहे. करण्यात येणाऱ्या या कामामध्ये कंपनीला 1000 कि.मी. लांबीच्या पाण्याचे जाळे तयार करावे लागणार आहे. यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारचे काम करावे लागणार आहे. या नेटवर्कच्या मदतीने बिकानेर जिल्ह्यातील दोन शहरांमधील 154 गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

(या बातमीतून कुणालाही गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला नाही; स्टॉकची एका दिवसाची कामगिरी येथे सांगण्यात आली आहे.)

संबंधित बातम्या

चुकीच्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटींना मोजावी लागणार किंमत; दंडासह तुरुंगवारीचा दणका

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासाच्या भाड्यात सूट नाहीच; पूर्ण भाडे भरावे लागणार, रेल्वे मंत्र्यांची संसदेत माहिती

EPFO : नोकरी सोडली आता PF कसा काढणार?, घाबरु नका! एका दिवसात काढता येणार पीएफ, EPFOचं नव्या प्रणालीवर काम सुरू

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.