ग्रामीण भागातील तरुणांना HDFC बँक देणार नोकऱ्या, दोन लाख गावांमध्ये विस्तारणार शाखांचे जाळे

HDFC Bank | HDFC बँकेच्या माहितीनुसार,पुढील 6 महिन्यांत 2500 लोकांची भरती केली जाईल. जेणेकरून खेड्यापाड्यात बँकेच्या सेवा पोहोचवणे शक्य होईल. एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे जिचे मुख्यालय मुंबईत आहे.

ग्रामीण भागातील तरुणांना HDFC बँक देणार नोकऱ्या, दोन लाख गावांमध्ये विस्तारणार शाखांचे जाळे
एचडीएफसी बँक
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 6:41 AM

मुंबई: देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) एका निर्णयामुळे आगामी काळात ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होणार आहे. एचडीएफसी बँकेने ग्रामीण भागात विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यादृष्टीने देशातील दोन लाख गावांमध्ये बँकेच्या शाखांचे जाळे उभारण्यात येईल. यासाठी साहजिकच बँकेला कर्मचाऱ्यांची गरज भासेल. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीची संधी मिळू शकेल.

HDFC बँकेच्या माहितीनुसार,पुढील 6 महिन्यांत 2500 लोकांची भरती केली जाईल. जेणेकरून खेड्यापाड्यात बँकेच्या सेवा पोहोचवणे शक्य होईल. एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे जिचे मुख्यालय मुंबईत आहे. पुढील 18-24 महिन्यांत ही बँक देशाच्या अनेक भागांमध्ये आपले शाखा नेटवर्क, व्यवसाय संवाददाता, व्यवसाय सुविधा, सामान्य सेवा केंद्र भागीदार, आभासी संबंध व्यवस्थापन आणि डिजिटल व्यासपीठ वाढवेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील ग्रामीण भागात बँकांच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एचडीएफसी बँकेने हे पाऊल उचलले आहे.

देशातील प्रत्येक पिनकोडच्या परिसरात सेवा पुरवण्याचे लक्ष्य

एचडीएफसी बँकेने देशातील प्रत्येक पिनकोड पत्त्याच्या परिसरात सेवा पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही बँक सध्या देशातील 550 जिल्ह्यांमध्ये सेवा पुरवते. एचडीएफसी बँक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात जास्तीत जास्त बँकिंग सेवा पुरवते. देशाच्या इतर भागात त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी या बँकेने 2500 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने अद्याप याबाबत कोणतीही ठोस योजना जाहीर केलेली नाही.

मात्र, या विस्तारानंतर देशातील एक तृतीयांश ग्रामीण भागांमध्ये बँकेचे अस्तित्त्व निर्माण होईल, असे एचडीएफसीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला बँकिंग क्षेत्राशी जोडणे सोपे होईल आणि लोक जास्तीत जास्त बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतील. क्रेडिट आणि कर्जाच्या बाबतीत, देशातील ग्रामीण आणि अर्ध-शहरी भाग अजूनही मोठ्या प्रमाणावर सेवांपासून दूर आहेत. तथापि, बँकिंग व्यवस्थेच्या शाश्वत विकासात ही क्षेत्रे मोठी भूमिका बजावू शकतात. असे एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड (कमर्शियल अँड रूरल बँकिंग) राहुल शुक्ला यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

अवघ्या 63 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 7786.45 रुपये; लखपतींना बनवले करोडपती

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शेतमालाच्या साठवणुकीसाठी आता घरीच उभारता येणार सौरउर्जेवर चालणारे कोल्ड स्टोरेज युनिट

एलआयसीच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे भरा अन् महिन्याला मिळवा 12 हजारांची पेन्शन

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.