‘या’ कंपनीच्या स्मार्ट फोन, फ्रीज आणि स्मार्ट टीव्ही खरेदीवर मोठी सूट; 20 टक्क्यांची कॅशबॅक ऑफर
Samsung | सॅमसंग कंपनीने HDFC Bank, ICICI Bank, Bank Of Baroda, Axis Bank, Fedral Bank आणि SBI या बँकांशी भागीदारी केली आहे. सॅमसंगकडून एसबीआयच्या ग्राहकांना विशेष सूट दिली जात आहे. तसेच सॅमसंगच्या काही साऊंडबार सिस्टीमच्या खरेदीवर 6000 रुपयांची कॅशबॅक मिळत आहे.
मुंबई: सॅमसंग कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीवर मोठी सूट (Discount) दिली जात आहे. त्यामुळे सॅमसंगचा (Samsung) स्मार्ट फोन, टीव्ही, फ्रीज ही उत्पादने स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. याशिवाय, काही बँकांच्या कार्डने पेमेंट केल्यास 20 टक्क्यांपर्यंत कॅशबॅकही मिळत आहे. यापैकी सगळ्यात जास्त सूट सॅमसंगच्या स्मार्ट टीव्हीवर मिळत आहे. 30 जूनपर्यंत तुम्ही या स्कीमचा लाभ घेऊ शकता. (Heavy discount on samsung smart tv fridge phone electronic items)
सॅमसंग कंपनीने HDFC Bank, ICICI Bank, Bank Of Baroda, Axis Bank, Fedral Bank आणि SBI या बँकांशी भागीदारी केली आहे. सॅमसंगकडून एसबीआयच्या ग्राहकांना विशेष सूट दिली जात आहे. तसेच सॅमसंगच्या काही साऊंडबार सिस्टीमच्या खरेदीवर 6000 रुपयांची कॅशबॅक मिळत आहे.
स्मार्ट टीव्हीवर साऊंडबार फ्री
सॅमसंगचा 75 इंच आणि QLED टीवी मॉडेलच्या खरेदीवर 99,000 रुपये किंमतीचे साऊंडबार मोफत दिले जात आहेत. सॅमसंगच्या QLED टीवी या 65 इंचाच्या टीव्हीसोबत तसेच 75 इंचांच्या UHD टीवी संचासोबत T420 हा साऊंडबार मोफत दिला जात आहे.
कॅशबॅक ऑफर
सॅमसंग कंपनीने HDFC Bank, ICICI Bank, Bank Of Baroda, Axis Bank, Fedral Bank आणि SBI या बँकांशी भागीदारी केली आहे. या माध्यमातून ग्राहकांना 20 टक्क्यांपर्यंत कॅशबॅकही मिळत आहे.
फ्रीज आणि मायक्रोव्हेवच्या खरेदीवर काय ऑफर?
सॅमसंग कंपनीकडून कर्ड मेस्ट्रो, फ्रॉस्ट फ्री आणि डायरेक्ट कूल या फ्रीजवर 15 टक्क्यांची कॅशबॅक दिली जात आहे. तर मायक्रोव्हेववर 10 टक्के आणि मैग्नेट्रोनवर 5 वर्षांची अतिरिक्त वॉरंटी दिली जात आहे.
ईएमआय सुविधा
ही उत्पादने खरेदी करण्यासाठी सॅमसंग कंपनीने 36 महिन्यांची ईएमआय सुविधा देऊ केली आहे. यासाठी 990 रुपयांपासून ईएमआय स्कीमचे हप्ते सुरु होत आहेत. ईएमआयवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
संबंधित बातम्या:
Xiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनचा बाजारात धुमाकूळ, तब्बल 3000 कोटींची विक्री
खुशखबर! अँड्रॉयड युजर्स Battlegrounds Mobile India खेळू शकणार, डाऊनलोडिंगसाठी गेम उपलब्ध
64MP Quad Cam, 256GB स्टोरेजसह Infinix चे दोन नवे स्मार्टफोन बाजारात, किंमत 11 हजारांहून कमी
(Heavy discount on samsung smart tv fridge phone electronic items)