‘हे’ आहेत सर्वोत्तम पाच क्रेडिट कार्ड, जाणून घ्या त्यांचे फायदे

अनेकदा आपल्याला क्रेडिट कार्डसाठी विविध बँकांकडून कॉल येत असतात. ते आपल्याला क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या विविध ऑफरची माहिती देतात. परंतु बऱ्याचदा आपल्याला क्रेडिट कार्ड कसे वापरावे, त्याचा नेमका फायदा काय आहे? हे माहित नसते, त्यामुळे आपला गोंधळ उडतो.

'हे' आहेत सर्वोत्तम पाच क्रेडिट कार्ड, जाणून घ्या त्यांचे फायदे
क्रेडिट कार्ड
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 6:45 AM

मुंबई : अनेकदा आपल्याला क्रेडिट कार्डसाठी विविध बँकांकडून कॉल येत असतात. ते आपल्याला क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या विविध ऑफरची माहिती देतात. परंतु बऱ्याचदा आपल्याला क्रेडिट कार्ड कसे वापरावे, त्याचा नेमका फायदा काय आहे? हे माहित नसते. समोरच्या व्यक्तीला देखील इतर बँकेच्या तुलनेमध्ये त्यांचे क्रेडिट कार्ड कसे फायद्याचे आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे आपला गोंधळ उडतो. आपण समोरच्या व्यक्तीला प्रतिसाद देऊ शकत नाही आणि कॉल कट करतो. आज आपण क्रेडिट कार्डचा नेमका काय फायदा आहे? कुठले क्रेडिट कार्ड फायद्याचे ठरू शकते हे जाणून घेणार आहोत. यामुळे भविष्यात आपला गोंधळ उडणार नाही तसेच कोणत्या बँकेची सुविधा घ्यायची आहे हे आपल्याला ठरवता येईल.

क्रेडिट कार्डचा काय आहे फयदा? 

जर तुमच्याकडे पैसे कमी आहेत आणि तुम्हाला पैशांची गरज आहे. अशा वेळी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, मात्र क्रेडिट कार्ड आहे तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून बिल देऊ शकता. तुम्हाला जर काही कारणांसाठी वैयक्तीक कर्जाची गरज भासली तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. तुमच्या क्रेडिट कार्डची जेवढी लिमिट आहे, तेवढ्यापर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकते. तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे नसतील तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून देखील तुमचा ईएमआय भरू शकता. दरम्यान आपल्यासाठी सर्वोत्तम क्रेडिट कार्ड कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड

या क्रेडिट कार्डमध्ये प्राईम सदस्यांसाठी Amazon वर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. यासोबत अ‍ॅमेझॉनवर नॉन-प्राइम मेंबर्स 3 टक्के कॅशबॅकसह उपलब्ध आहेत. या कार्डद्वारे 100 हून अधिक Amazon भागीदार विक्रेत्यांना 2 टक्के कॅशबॅक आणि इतर व्यवहारांवर एक टक्के कॅशबॅक मिळतो. हे आजीवन मोफत क्रेडिट कार्ड आहे.

Axis Bank Ace क्रेडिट कार्ड

हे क्रेडिट कार्ड Google Pay रिचार्ज आणि बिल पेमेंटवर 5 टक्के कॅशबॅक, Big Basket आणि Grofers वर 5 टक्के कॅशबॅक, Swiggy, Zomato, Ola वर 4 टक्के, इतर सर्व खर्चांवर 2 टक्के फ्लॅट कॅशबॅक देते. या क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क 499 रुपये आहे.

फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड

हे क्रेडिट कार्ड Flipkart, Myntra आणि 2GUD वर 5 टक्के कॅशबॅक, निवडक विक्रेत्यांवर 4 टक्के आणि इतर श्रेणींमध्ये 1.5 टक्के कॅशबॅक देते. या क्रेडिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 500 रुपये आहे.

HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्ड

या क्रेडिट कार्डसह सर्व ऑनलाईन खर्चावर 1.5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. इतर खर्चांवर 1% कॅशबॅक आहे. तुम्ही सूचीबद्ध विक्रेत्यांसह EMI व्यवहारांवर कॅशबॅक मिळवू शकता. या क्रेडिट कार्डवर वार्षिक 750 रुपये शुल्क आहे.

एचडीएफसी मिलेनिया क्रेडिट कार्ड

या क्रेडिट कार्डमध्ये Amazon आणि Flipkart वर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. यासह PayZapp आणि स्मार्ट बायद्वारे फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगवर 5% कॅशबॅक, ऑफलाईन खर्च आणि वॉलेट रिलोडवर 1% कॅशबॅक आहे. या क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क एक हजार रुपये आहे.

संबंधित बातम्या 

महिन्याभरात 21 पटीने वाढले कॉफीचे दर; जाणून घ्या काय आहेत भाव वाढीमागील कारणे?

गुड न्यूज! पुढील वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 9 टक्के राहण्याचा अंदाज

‘टाटा’ची वाहाने महागणार; एक जानेवारीपासून नवे दर लागू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.