Car Insurance | वाहन विमा घेताय? या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष; चांगल्या डीलसाठी रहा आग्रही

वाहनाचा विमा खरेदी करताना त्या विमा पॉलिसीची वैशिष्ट्ये काय आहेत. बोनस पॉईंट काय आहे, पॉलिसीच्या वैशिष्ट्यांपासून क्लेम सेटलमेंटपर्यंत अनेक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे

Car Insurance | वाहन विमा घेताय? या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष; चांगल्या डीलसाठी रहा आग्रही
वाहन विमा घेताना बाळगायची काळजीImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 9:39 AM

मुंबई : कार किंवा दुचाकी, ट्रक अथवा वाहनांचा विमा (Motor Insurance) हा अपघात झाल्यास, आग लागल्यास, चोरी गेल्यास झालेल्या नुकसानीची भरपाई करुन देतो. हा विमा वाहनाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देतो. त्यामुळे वाहन विमा खरेदी करताना वाहनधारकाने थर्ड पार्टी कव्हर, नो क्लेम बोनस, क्लेम सेटलमेंट रेशो, पॉलिसी नूतनीकरण, आयडीव्ही म्हणजेच विमाधारक घोषित मूल्य अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. वाहन विमा हा अत्यावश्यक आहे. तसेच वाहन विमा खरेदी करताना त्यामध्ये खंड न पडू देणे हे अधिक शहाणपणाचे आहे. कारण त्यातून नो क्लेम बोनसचा (No Claim Bonus) फायदा तर होतोच पण अपघात झाल्यास नुकसान भरपाईचा दावा (Claim) ही दाखल करता येतो. त्यामुळे विमा खरेदीत कधी ही खंड पडू न देणे हे फायद्याचे गणित आहे. भारतात वार्षिक दोन हजार रुपयांपासून चारचाकी वाहनांचा विमा सुरु होतो. तर दुचाकी वाहनांचा वार्षिक विमा 480 रुपयांपासून सुरु होतो.

थर्ड पार्टी कव्हर आणि नुकसानीच्या कव्हरवर समजून घ्या

थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये अपघात झाल्यास आपल्या वाहनामुळे थर्ड पार्टीचे नुकसान होते. परंतु ग्राहकाचे किंवा त्याच्या वाहनाचे नुकसान झाल्यास, त्याला कोणतेही संरक्षण मिळत नाही. अशावेळी वाहनधारकांनी ऑन डॅमेज कव्हर असलेली सर्वसमावेशक विमा पॉलिसी घेणे योग्य ठरेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या वर्षी लोकसभेत सांगितले होते की, 2020-21 मध्ये देशात 3,78,343 मोटार अपघात विमा दावे निकाली काढण्यात आले होते. यामध्ये वाहनधारकांना 57 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात आली.

नो क्लेम बोनसचा पूर्ण वापर करा

नो क्लेम बोनस हे विमा पॉलिसीचे अंतर्भूत वैशिष्ट्ये आहे. जर वर्षभरात तुम्ही कोणाला जाऊन धडकला नसाल अथवा तुम्हाला कोणी बहाद्दराने धडक मारली नसेल तर वर्षभरात तुमचा एकही क्लेम होणार नाही. अशावेळी पॉलिसी नुतनीकरणाच्यावेळी त्याचा फायदा होतो. तुम्हाला नुतनीकरण करताना विमा कंपनी विशेष सवलत देते.

दावा सेटलमेंट रेशो

वर्षभरात विमा कंपनीकडे आलेल्या दाव्यांमधून किती दावे निकाली निघाले, हे प्रमाण यातून निश्चित होते. जर एखाद्या कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो 90 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्या कंपनीने देऊ केलेली पॉलिसी तुमच्यासाठी योग्य आहे, असे समजा.

पॉलिसीचे नूतनीकरण वेळेत न केल्यास नुकसान

बहुतांश वाहनधारक विमा खरेदी करताना नुतनीकरणाचा विचार करत नाहीत, मात्र पॉलिसीचे नूतनीकरण वेळेत न केल्यास काय नुकसान होऊ शकते, हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या मागे किती ही धावपळ असली आणि तुम्हाला जेवायची ही फुरसत नसली तरी नुतनीकरणाची तारीख विसरु नका. तशा कंपन्या ही तारीख तुम्हाला विसरू देत नाहीत. विमा संपण्यापूर्वी एक महिना अगोदरच कंपन्या तुम्हाला एसएमएस, फोन कॉल्सवरुन अलर्ट करत असतात. तुम्ही पॉलिसीचे नुतनीकरण केले नाही तर पॉलिसी खंडीत होईल आणि अनेक फायदे तुम्हाला मिळणार नाहीत.

किती प्रभावी अॅड-ऑन कव्हर

Policybazaar.com मोटार नूतनीकरणाच्या प्रमुख अश्वनी दुबे यांच्या मते, कायद्यानुसार सर्व खासगी आणि व्यावसायिक वाहनांना वैध थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं बंधनकारक आहे. परंतु आपले वाहन पूर्णपणे सुरक्षित राहण्यासाठी, आपल्याकडे सर्वसमावेशक धोरण असणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉलिसीमध्ये अॅड-ऑन कव्हर्सचा समावेश करणे योग्य आहे. ही अतिरिक्त कव्हर्स किंवा रायडर्स अतिरिक्त प्रीमियमसह येतात आणि त्यामुळे परिपूर्ण विमा संरक्षण मिळते. ते अनेकदा फायद्याचे ठरते.

संबंधित बातम्या :

तुम्ही पत्नीला संपत्तीमध्ये नॉमिनी केलंय? नसेल तर आजच करा; भविष्यातील संकटे टाळा

7 लाखांचा विमा तोही अगदी मोफत; जाणून घ्या ‘ईडीएलआय’बद्दल

फायर इन्शुरन्स म्हणजे काय? कोणत्या परिस्थितीमध्ये मिळते नुकसान भरपाई? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.