‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल; सहा महिन्यांत एका लाखाच्या गुंतवणुकीवर 7.65 लाख
Share Market | Live Mint च्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात गुंतवणुकदारांनी Gita Renewable Energy च्या समभागांची मोठ्याप्रमाणावर विक्री केली आहे. त्यामुळे या समभागाची किंमत 120.15 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी या समभागाने 300 रुपयांच्या पातळीपर्यंत झेप घेतली होती.
मुंबई: सध्या शेअर बाजारात गीता रिन्यूएबल एनर्जी (Gita Renewable Energy) या समभागाची प्रचंड चर्चा आहे. अवघ्या सहा महिन्यांत Gita Renewable Energy कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 665 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या समभागाने अवघ्या सहा महिन्यांत सातपट फायदा देऊन गुंतवणुकदारांना अक्षरश: मालामाल केले आहे.
Live Mint च्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात गुंतवणुकदारांनी Gita Renewable Energy च्या समभागांची मोठ्याप्रमाणावर विक्री केली आहे. त्यामुळे या समभागाची किंमत 120.15 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी या समभागाने 300 रुपयांच्या पातळीपर्यंत झेप घेतली होती. मात्र, किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्यानंतरही गीता रिन्यूएबल एनर्जीचा समभाग गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानला जात आहे. गीता रिन्यूएबल एनर्जी ही उर्जा क्षेत्रातील कंपनी आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीची वाटचाल चांगली असेल, असा जाणकारांचा कयास आहे.
दरम्यान, या समभागाची किंमत 300 रुपयांवरुन थेट 120 रुपयांवर आली असली तरी गेल्या सहा महिन्यांत Gita Renewable Energy च्या समभागांनी गुंतवणुकदारांना 665 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. गेल्यावर्षी या समभागाची किंमत 5.52 रुपये इतकी होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांत हा समभाग 120.15 च्या पातळीवर जाऊन स्थिरावला आहे. याचा अर्थ तुम्ही सहा महिन्यांपूर्वी Gita Renewable Energy चे एक लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य साधारण 7.65 लाख रुपये इतके झाले आहे.
गुंतवणूक करावी का?
गेल्या महिनाभरात Gita Renewable Energy च्या समभागाची किंमत जवळपास निम्म्याने घसरली आहे. ही किंमत इतक्या झपाट्याने घसरत होती की अनेकदा या समभागासाठी लोवर सर्किट लागले. त्यामुळे महिनाभरापूर्वी या कंपनीचे समभाग खरेदी केलेल्या गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. सध्या समभागाची किंमत सार्वकालिक उच्चांकापेक्षा बरीच खाली असली तरी यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स
सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.
गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड
यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.
संबंधित बातम्या:
Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स