बारकोड कसे काम करते? प्रत्येक कोडमध्ये दिसणाऱ्या उभ्या काळया लाईन कशा रीड केल्या जातात

जेव्हा केव्हा आपण सामान खरेदी करण्यास बाजारात जात असतो, त्यावेळेस त्यावरील प्रत्येक वस्तूवर एक बारकोड असतो. हा बारकोड स्कॅन केल्यास त्यावरील प्रत्येक वस्तूची किंमत आपल्याला समजत असते. मात्र कधी विचार केला आहे का, की या लाईनमुळे त्या वस्तूचे डिटेल्स कसे रीड होत असतात.

बारकोड कसे काम करते? प्रत्येक कोडमध्ये दिसणाऱ्या उभ्या काळया लाईन कशा रीड केल्या जातात
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 7:52 PM

मुंबई : जेव्हा आपण एखाद्या शोरूम किंवा मॉलमध्ये काही खरेदी करण्यासाठी जातो तर सामानाचे बिल बनवताना त्या सामानांवरील बारकोड (Barcode) स्कॅन केले जातात. बारकोड स्कॅन करताच (Barcode Scan System) त्या  सामानाची संपूर्ण माहिती कॉम्प्युटरवर दिसते आणि त्यासाहाय्यानेच आपले बिल बनते. या बारकोडमध्ये काही काळया रंगाच्या गडद किंवा फुसट उभ्या रेषा असतात ज्यांचा एक सेट पॅटर्न असतो. या पॅटर्न आणि बरकोडवर लिहिलेल्या नंबरमुळे प्रोडक्टबद्दल माहिती मिळते आणि बारकोड स्कॅनर काही सेकंदात याला स्कॅन करतो. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की हे बारकोड कशाच्या आधारावर काम करते? आणि कशापद्धतीने प्रोडक्टची माहिती या लाईन आणि नंबर्समध्ये सामाविष्ट होत असते. तर मग जाणून घेवूयात अखेर बारकोड कसे काम करते, याच्या खाली लिहिलेले नंबर आणि यावरील कोड काय दर्शवतात. आज आम्ही तुम्हाला बारकोडशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती देणार आहोत.

काय असतो बारकोड?

बारकोड कोणत्याही उत्पादनाच्या बाबतीत नंबर आणि सूचना लिहिण्याची एक पद्धत आहे. हा एक मशीन रिडेबल कोड आहे, जो नंबर आणि लाईन यांच्या फॉरमॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये काही गॅप सोबतच काही वेगवेगळ्या सरळ उभ्या लाईन्स बघायला मिळतात. बारकोडमध्ये कोणत्याही उत्पादनाची वेगवेगळी माहिती जसे की किंमत, वजन, उत्पादन वर्ष, कंपनीचे नाव , उत्पादन तारीख अशा विविध माहितीचा समावेश असतो.

कोण बनवतो बारकोड?

बारकोडची एक खास गोष्ट ही आहे की, प्रत्येक वस्तूसाठी युनिक बारकोड असतो. हा दुसऱ्या कोणत्याही बारकोडसोबत मॅच होत नाही आणि संपूर्णतः वेगळा असतो. बारकोड आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून दिला जातो आणि हा ऑनलाईन माध्यमातून जनरेट केला जावू शकतो.

दोन प्रकारचे असतात बारकोड ?

जर बारकोडच्या प्रकाराबद्दल बोलायचे झाले तर ते दोन प्रकारचे असतात. एक तर साधारण बारकोड, ज्याला 1D बारकोड म्हटले जाते. यामध्ये अनेक समांतर लाईन असतात आणि दुसरा बारकोड एका चौकटीत असतो त्याला क्युआर कोड देखील म्हटले जाते. क्युआरकोडची खास गोष्ट ही आहे की यामध्ये जास्त माहिती समाविष्ट करता येते आणि हा स्कॅन करण्यात अधिक फ्रेंडली असतो.

अनेक भागांमध्ये असतो बारकोड?

एक बारकोडचे अनेक भाग असतात, जसे की एखाद्या गाडीच्या नंबर प्लेटचे भाग असतात. नंबर प्लेटचे वेगवेगळे कोड असतात, जे त्या गाडीबद्दल माहिती देतात असेच बारकोडच्या बाबतीतही असते. जसे पाहिले तीन नंबर कोणत्याही देशाबद्दल माहिती देतात, त्यानंतर पुढील तीन नंबर उत्पादनाचा कोड आणि पुढचे चार नंबर प्रोडक्ट कोड बद्दल माहिती देतात आणि शेवटी एक चेक डिजीट असते. जसे की बारकोडच्या सेंट्रल लाईनजवळ असलेला नंबर तो कसा तयार झाला, म्हणजेच जसे की पर्यावरण पूरक वस्तूंपासून बनला आहे की प्लास्टिकचा वापर केला आहे. या नंबर मुळे हे सुध्दा समजते की, प्रोडक्ट शाकाहारी आहे की मांसाहारी.

रीड कसे केले जाते

कॉप्युटर बायनरी म्हणजेच  0,1 ची भाषा समजते. तसेच या बारकोडला देखील  वेगवेगळ्या भागांमध्ये विभागले जाते. यामध्ये, 1डी बारकोड 95 बॉक्समध्ये विभागला गेला आहे आणि यातही 15 वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले गेले आहेत. यामध्ये सगळ्यात उजव्या बाजूला असणाऱ्या सेक्शनला लेफ्ट गार्ड, डाव्या बाजूला असलेल्याला राईट गार्ड आणि सेंटर गार्ड मध्ये विभागलेले असते. यात रीडर उजव्या बाजूने डाव्या बाजूस जात असतो आणि बायनरी भाषेच्या हिशोबाने हे रीड केले जाते, मग कम्प्युटरवर याची सर्व माहिती दिसून येते.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.