LIC ची बंद पडलेली पॉलिसी करा पुन्हा सुरु; महामंडळ घेऊन आलंय नवीन योजना

एलआयसीने ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे. 7 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत एलआयसीकडून व्यपगत झालेली विमा पॉलिसी पुन्हा कार्यान्वित करण्याची संधी देण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज भरुन विलंब शुल्कासह एलआयसीचा प्रिमियम जमा करावा लागेल. याविषयीची माहिती जाणून घेऊयात

LIC ची बंद पडलेली पॉलिसी करा पुन्हा सुरु; महामंडळ घेऊन आलंय नवीन योजना
LIC (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 9:15 AM

कोविड (Coronavirus) काळात आर्थिक चणचणीमुळे तुम्हाला एलआयसीचा हप्ता चुकता करता आला नसेल आणि पैशांच्या तुटवड्यामुळे तुम्हची विमा पॉलिसी व्यपगत (LIC policy lapses) झाली असेल अर्थात ती बंद पडलेली असेल तर तिला पुनरुज्जीवीत करता येते. बंद पडलेली विमा पॉलिसी सुरु करण्याची एक संधी एलआयसीने विमाधारकांसाठी आणली आहे. या योजनेतंर्गत ग्राहकांना विहित प्रक्रिया पूर्ण करुन आणि विलंब शुल्कासह हप्ता भरुन बंद पडलेली विमा पॉलिसी पुन्हा सुरु करता येईल. 7 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत एलआयसी विमाधारकांना (LIC Policyholders) व्यपगत विमा पॉलिसी पुन्हा कार्यान्वित करण्याची संधी देत आहे. विमा कालावधी पूर्ण होण्याआधी (Maturity) तुमची पॉलिसी बंद पडलेली असेल तर तुम्हाला ती पुन्हा सुरु करता येईल. या योजनेत विमाधारकाला पाच वर्षांतील विमा योजना पुन्हा कार्यान्वीत करता येईल. मात्र त्यासाठी काही अटींची पुर्तता करावी लागणार आहे. एकीकडे सवलत देताना ज्या आवश्यक बाबाींची पुर्तता करणे गरजेचे आहे. त्या ग्राहकांना पूर्ण कराव्या लागतीलच. ग्राहकांना वैद्यकीय तपासणी पूर्ण करावी लागेल. त्यात ग्राहकांना सूट मिळणार नाही. तसेच आरोग्य आणि इतर विमा योजना पुन्हा सक्रिय करण्यासाठी, पुन्हा सुरु करण्यासाठी विलंब शुल्क द्यावे लागेल.

जाणून घ्या अटी आणि शर्ती

IRDAIच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विमा पॉलिसी जेव्हा ग्रेस कालावधीत भरली जात नाही तेव्हा ती व्यपगत होते. वार्षिक, सहामाही आणि त्रैमासिक प्रीमियम भरण्यासाठी कालावधीत काही दिवस एलआयसी सवलत देते. हा सवलतीचा कालावधी 30 दिवस आहे. त्यानंतर ग्रेस कालावधी देण्यात येतो. हा कालावधी संपल्यानंतर मात्र पॉलिसी बंद पडते. ती पुन्हा सुरु करण्यासाठी व्याजासह एकरकमी प्रीमियम भरावा लागतो. यासोबतच नियमानुसार विलंब शुल्कावर जीएसटीचा भरणा करावा लागतो. विमा पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या विमा प्रतिनिधींसी संपर्क साधावा. अथवा एलआयसीच्या अधिकृत (https://licindia.in/) संकेतस्थळावर रिव्हायव्हल फॉर्म डाऊनलोड करावा. हा अर्ज भरुन विलंब शुल्कासह प्रलंबित हप्ता एलआयसीच्या कार्यालयात जमा करावा.

अशी मिळणार सूट

1 लाख रुपये हप्ता असलेल्या आरोग्य विमावर विलंब शुल्क 20 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 2000 रुपये सूट मिळणार असून 3 लाख प्रीमियमसह पॉलिसीमध्ये 30 टक्के किंवा जास्तीत जास्त 3000 रुपयांची सूट देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर आयपीओमध्ये आपल्या पॉलिसीधारकांना 10 टक्के शेअर्स सवलतीच्या दरात देण्याच्या योजनेवरही एलआयसी काम करत आहे. म्हणजेच एलआयसीच्या लाखो पॉलिसीधारकांना स्वस्तात शेअर्स मिळवण्याची संधी मिळू शकते. एलआयसी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हिस्सा राखीव ठेवण्याचा विचार करत आहे.

पॉलिसी सुरु करण्यावेळी, तुमची धोरणे, गरज आणि प्राप्त परिस्थितीतील आर्थिक स्थिती या सर्वांचा विचार ग्राहकांनी करणे गरजेचे आहे. तुम्ही विमा पॉलिसीची दोन अथवा तीनच हप्ते जमा केले असतील तर पुढे ही पॉलिसी सुरु ठेवणे आवश्यक आहे का, याचा सारासार विचार करुन विमा योजना सुरु ठेवण्याचा निर्णय घ्यावा.

संबंधित बातम्या :

LIC चा जगभरात डंका, परताव्याच्या बाबतीत आघाडीवर, देशातंर्गत बाजारातील मोठी हिस्सेदार

LIC पॉलिसी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी; PAN अपडेट केल्यास IPO मध्ये विशेष सूट

LIC ची विशेष योजना: दररोज 200 रुपयांची बचत अन् मिळणार 28 लाख, प्रीमियमबद्दल जाणून घ्या

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....