Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food Delivery Compensation : ऑनलाईन फूड ऑर्डरला झाला उशीर, कंपनीकडून करा नुकसान भरपाई वसूल!

Food Delivery Compensation : ऑनलाईन फूड ऑर्डरला उशीर झाला तर या नियमांनुसार तुम्हाला नुकसान भरपाई मागता येईल.

Food Delivery Compensation : ऑनलाईन फूड ऑर्डरला झाला उशीर, कंपनीकडून करा नुकसान भरपाई वसूल!
मागा नुकसान भरपाई
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 6:05 PM

नवी दिल्ली : ऑनलाईन फूडची (Online Food) लज्जत तुम्ही ही चाखली असेलच की, पण अनेकदा काय होतं उत्साहाच्या भरात आपण फूड ऑर्डर करतो आणि वाटच पाहतो. वेळ निघून गेली तरी डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) काही येत नाही. कधी तर ऑनलाईन कंपनी परस्पर ऑर्डर कॅन्सल (Order Cancelled) करते. उत्साहावर विरजण तर पडतेच, पण पोटातील कावळे डोक्यात काव काव करतात. बऱ्याच कंपन्या तुमची रक्कम परत करते अथवा त्यावर एखादं डिस्काऊंट कुपन देऊन न तुमचा राग शांत करण्याचा पर्याय शोधते. पण ऑनलाईन फूड डिलव्हरी कंपन्यांना, अॅप्सला तुम्ही ठरवलं तर धडा शिकवू शकता. किरकोड फूड ऑर्डरसाठी तुम्हाला हजारोंची नुकसान भरपाई (Compensation) मिळू शकते.

भटिंडा येथील मोहित गुप्ता यांनी स्विगीकडे (Swiggy) 7 नोव्हेंबर 2019 रोजी अफगाणी चाप रोलची ऑर्डर केली होती. फूड कूपन शिवाय त्यांनी 174 रुपये मोजले. मोहित त्यांच्या अफगाणी चाप रोलची वाट पाहत राहिले. 30 मिनिटानंतरही त्यांना काहीच माहिती देण्यात आली नाही.

अचानक स्विगीने त्यांची ऑर्डर कॅन्सल केली. तर 74 रुपये परत केले. त्यानाराजीने गुप्ता यांनी स्विगीला ग्राहक आयोगात ओढले. नुकसान भरपाईची मागणी केली. स्विगीला प्रकरणात फटका बसला. ग्राहक आयोगाने स्विगीला 11000 रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश दिले.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या एका प्रकरणात ग्राहक आयोगाने पिझ्झा डिलिव्हरी वेळेत न केल्याने एका डिलिव्हरी कंपनीला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. अशा अनेक प्रकरणात डिलिव्हरी कंपनीला फटका बसला तर ग्राहकांना दिलासा मिळाला.

तुम्हालाही असाच अनुभव आला असेल तर आता हे प्रकरण तेवढ्यावरच सोडू नका. पण त्यासाठी तुम्हाला सजग रहावे लागेल. फूड डिलिव्हरी कंपनीने तुमची फसवणूक केल्यास, मनमानी केल्यास तुम्हाला दाद मागता येते. नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करता येतो.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील आदित्य परोलिया यांनी याविषयीच्या नियमांची माहिती दिली. त्यानुसार, फूड डिलिव्हरी पार्टनर आणि रेस्टॉरंट हे दोघंही सेवा प्रदान करणारे आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक केल्यास दोघेही त्याला जबाबदार ठरतात. या दोघांविरोधात ग्राहक आयोगाकडे दाद मागता येते.

फूड डिलिव्हरी अॅप्स ग्राहकांकडून या सेवेसाठी थेट रक्कम वसूल करतात. वेळेत हे अन्नपदार्थ मिळावेत यासाठी ग्राहकांकडूनच अतिरिक्त खर्चही घेण्यात येतो. जर वेळेत ऑर्डर पोहचवली नाही तर त्याची जबाबदारी अर्थातच सेवा पुरवठादारांवरच येतो. फूड डिलिव्हरी बॉयकडून सेवेत त्रुटी राहिल्यास, योग्य सेवा न मिळाल्यास अथवा गैरवर्तन केल्यास पोलिसांकडेही दाद मागता येते.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.