Retirement Planning : आयुष्याची संध्याकाळ आरामात घालवा, असे व्हा मालामाल

Retirement Planning : निवृत्तीसाठी अगोदरच नियोजन केल्यास, उतारवयात तुम्हाला अधिक काम करावे लागणार नाही. भविष्यासाठी केलेली गुंतवणूकच तुमच्या काही येईल. या योजना तुम्हाला आर्थित स्थिरता देऊ शकतात.

Retirement Planning : आयुष्याची संध्याकाळ आरामात घालवा, असे व्हा मालामाल
असे करा नियोजन
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 7:20 PM

नवी दिल्ली : कोणालाही भविष्याची चिंता असते. भविष्यात चांगल्या सोयी-सुविधा, सूख सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक जण वर्तमान काळात राबतो. पण उतारवयाचा अनेक जणांना विसर पडतो. निवृत्तीसाठी (Retirement Period) केलेली गुंतवणूक आयुष्याच्या संध्याकाळी उपयोगी पडते. आर्थिक सल्लागार निवृत्ती योजनेत रक्कम गुंतविण्याचा सल्ला देतात. आजघडीला अनेक निवृत्ती योजना (Retirement Scheme) उपलब्ध आहेत. पण गुंतवणूकदारांना सरकारी निवृत्ती योजना पसंत आहे. या योजनेतच गुंतवणूक (Investment) करण्यात येते. आपण चार सरकारी निवृत्ती योजनेत (Government Retirement Plans) रक्कम गुंतविल्यास तुमचे भविष्य सुरक्षित करता येते.

अटल पेन्शन योजनेत 18 ते 40 वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला या निवृत्ती योजनेचा लाभ घेता येतो. त्यासाठी गुंतवणूक करता येते. अटल पेन्शन योजनेत, लाभार्थ्याला वयाच्या साठीपर्यंत दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते. 60 वर्षानंतर गुंतवणूकदाराला 1000 रुपये ते 5000 रुपयांपर्यंत मासिक निवृत्तीचे रक्कम मिळते.

लाभार्थ्याची योगदानाची रक्कम जेवढी असेल त्याआधारे निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. या योजनेत नोंदणी करण्यासाठी व्यक्तीकडे, गुंतवणूकदाराकडे खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. पण आता दिवाळीनंतर या योजनेत बदल करण्यात आला आहे. आता करदात्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही.

हे सुद्धा वाचा

भारतीय आयुर्विमा महामंडळाने गुंतवणूकदारांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरु केली आहे. या योजनेत, कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला सहभागी होता येते. त्यासाठी कमाल 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. त्याआधारे त्याला 10 वर्षांकरीता पेन्शन मिळते. गुंतवणुकीवर लाभाची रक्कम निर्धारीत असते. जेवढी गुंतवणूक जास्त, तेवढी पेन्शन अधिक मिळते.

जर व्यक्ती योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक करत असेल तर त्याला 10 वर्षांपर्यंत 9,250 रुपये मासिक पेन्शन मिळेल. पंतप्रधान वय वंदना योजनेसाठी लाभार्थ्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी करता येते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी यंदा 31 मार्च 2023 ही मुदत देण्यात आली आहे.

60 वर्षे अथवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक योजना (SCSS) सुरु करण्यात आली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना अनेक फायदे मिळतात. तसेच स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेणारे, 55 ते 60 वर्ष या काळात स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना योजनेचा फायदा मिळतो. त्यांनाही योजनेत गुंतवणूक करता येते.

या योजनेत कमीत कमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. 1 जानेवारीपासून या योजनेवर नवीन व्याजदर लागू करण्यात आली आहे. सध्यस्थितीत गुंतवणूकदारांना 8 टक्के व्याज मिळते. तिमाही आधारावर व्याज जमा करण्यात येते.

राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) ही निवृत्तीसाठीची चांगली योजना आहे. या योजनेत जमा केलेली रक्कम, शेअर बाजारात गुंतविल्या जातो. त्यामुळे या योजनेतून गुंतवणूकदारांना सरासरी 10 टक्के परतावा मिळतो. 18 ते 70 वयोगटातील नागरिकांना या योजनेत सहभागी होता येते. या योजनेत पेन्शन मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांना वयाच्या 60 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागते.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.