Home Loan : ईएमआयमुळे झालात त्रस्त, या उपायांनी झटपट उतरेल कर्ज

Home Loan : गृहकर्ज कमी करण्यासाठी हा उपाय तुम्हाला फायदेशीर ठरु शकतो. त्यामुळे ईएमआयचा तुम्हाला ताप होणार नाही. कर्जाच्या विळख्यातून तुमची लवकर सुटका होईल.

Home Loan : ईएमआयमुळे झालात त्रस्त, या उपायांनी झटपट उतरेल कर्ज
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 7:41 PM

नवी दिल्ली : जून 2023 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल केला नाही. हा रेपो दर आता 6.50 टक्के कायम आहे. गेल्या वर्षभरात व्याजदरात सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना दुसऱ्यांदा व्याजदरात दिलासा मिळाला. या निर्णयामुळे गृहकर्जदारांना व्याजदरात वाढ (Interest Rate) होण्याची चिंता नाही. व्याजदर स्थिर राहील. पण व्याजदर कमी झाले नाही. एक वर्षात कर्जावरील व्याज 2 ते 2.5 टक्के वाढले. मे 2022 मध्ये गृहकर्जावर 7.5 टक्के व्याजदर होते. सध्या बँकेचे व्याजदर 9.5 ते 10 टक्के आहेत. त्यामुळे अनेकांच्या गृहकर्जाच्या स्वप्नांना घरघर लागली आहे.

इतकी झाली वाढ भारतीय केंद्रीय बँकेने आतापर्यंत रेपो रेट दरात सहा वेळा वाढ केली आहे. ज्या दरावर इतर बँकांना आरबीआय उधार कर्ज पुरवठा करते, त्याला रेपो दर म्हणतात. मे 2022 पासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये 250 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. नवीन आर्थिक वर्षातील ही पहिली तर या वर्षातील दुसरी वाढ ठरेल. फेब्रुवारी महिन्यात आरबीआयने यापूर्वी रेपो दर 25 बीपीएसने वाढवला होता.

EMI चे ओझे किती वाढले रेपो दरात सातत्याने वाढ होत असल्याने कर्जदार वाढीव ईएमआयच्या ओझ्याखाली दबले. जर एखाद्या व्यक्तीने एपरिल 2022 मध्ये 30 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांच्या परतफेडीच्या बोलीवर घेतले. त्यासाठी व्याजदर समजा 6.7 टक्के आहे. तर त्याला दरमहिन्याला 22,722 रुपये ईएमआय चुकता करावा लागेल. पण मे 2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 2.50 टक्क्यांची वाढ केली. कर्जदाराला त्याचा फटका बसला. 6.7 टक्के व्याजर आता 9.2 टक्के झाला. त्याचा ईएमआयमध्ये कमाल पाच हजार रुपये वाढले. त्याचा ईएमआयचा हप्ता 22,722 रुपयांहून थेट 27,379 रुपये झाला. दर महिन्याला या व्यक्तीला पाच हजार रुपये जास्त मोजावे लागले.

हे सुद्धा वाचा

असा बसला फटका गेल्या वर्षभरात ग्राहकांवर होमलोनचा भार सातत्याने वाढत आहे. त्यांच्यावर दोन प्रकारे दडपण आले आहे. काही बँकांनी प्रत्येक महिन्याच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल केला नाही. बँकांनी कर्जाचा कालावधी वाढविला आहे. बँकांनी कर्जावरील व्याज वाढविले. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा ईएमआयवरील 1000 रुपये वाढतील. याचा अर्थ तुम्हाला 180 महिने ईएमआय आणखी चुकता करावा लागेल. हा कालावधी पुढे 5 ते 6 वर्षांकरीता वाढेल.

ॲडव्हान्स पीएफ EPFO ने याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गृहकर्जाची रक्कम परत फेड करण्यासाठी पीएफ ॲडव्हान्स, आगाऊ रक्कमेसाठी अर्ज करता येऊ शकतो, याची माहिती दिली आहे. त्यासाठी पूर्ण अथवा अर्धी रक्कम काढून गृहकर्जाच्या खात्यात ती रक्कम जमा करु शकता आणि गृहकर्जाचा बोजा कमी करु शकता अथवा त्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकता.

कर्ज पूर्व-भरणा केल्याचा फायदा 30 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांसाठी घेतल्यास पूर्व भरणा रक्कम जमा करण्याचा तुम्हाला मोठा फायदा होईल. समजा 9 टक्के व्याज दराने घेतलेल्या कर्जावर तुम्हाला 27,476 रुपये हप्ता भरावा लागेल. या गृहकर्जावर मासिक 4 हजार रुपायांचा पूर्व भरणा केल्यास व्याजदरातील 2.5 टक्के वाढीचा परिणाम जाणवणार नाही. तुमची व्याजापोटी जास्त जाणारी रक्कम कमी होईल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.