…अशी ही गंडवागंडवी! गुंतवणूक हजारात, रिटर्न लाखात; शेअर फसवणुकीचा ‘सोशल’ पॅटर्न!

आर्थिक तज्ज्ञांऐवजी सोशल मीडियावर येणाऱ्या फसव्या मेसेजवर विश्वास ठेवल्यामुळे शेअर्स ट्रेंडिंगमध्ये फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते. अलीकडच्या काळात फसवणुकीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर आली आहेत.

...अशी ही गंडवागंडवी! गुंतवणूक हजारात, रिटर्न लाखात; शेअर फसवणुकीचा ‘सोशल’ पॅटर्न!
गुंतवणूक हजारात, रिटर्न लाखात; शेअर फसवणुकीचा ‘सोशल’ पॅटर्न!
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 8:36 PM

नवी दिल्ली : गुंतवणुकीची एकाधिक माध्यमे सध्या उपलब्ध आहेत. बँक,पोस्ट ऑफिस सारख्या पारंपरिक माध्यमांसोबतच शेअर्स बाजारात गुंतवणुकीचा (SHARE MARKET) कल अलीकडच्या काळात वाढीस लागला आहे. कमी कालावधीत अधिक रिटर्न देणाऱ्या जाहिरातींची सध्या सोशल मीडियावर (SOCAIL MEDIA) जोरदार ट्रेडिंग सुरू आहे. आर्थिक तज्ज्ञांऐवजी सोशल मीडियावर येणाऱ्या फसव्या मेसेजवर विश्वास ठेवल्यामुळे शेअर्स ट्रेंडिंगमध्ये फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते. अलीकडच्या काळात फसवणुकीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर आली आहेत. ‘सेबी’ने दखल घेत फसव्या गुंतवणूक तज्ज्ञांवर बंदीची कारवाई केली आहे. सेबीकडे जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात अशी प्रकरणे समोर आली होती. ट्विटर आणि टेलिग्रामवर (TWITTER AND TELEGRAM) फसव्या आकडेवारीद्वारे दिशाभूल करून लोकांकडून पैसे उकळण्यात आले.

फसवणुकीचा ‘सोशल’ रिटर्न

सर्वाधिक रिटर्न देण्याच्या नावाखाली छोट्या-छोट्या कंपनीना निवडून अधिक प्रमाणात शेअर खरेदी करण्याचा सोशल मीडियावर सल्ला दिला जातो. वस्तुत: सोशल मीडियावर विशिष्ट शेअर बाबत आभासी वातावरण निर्माण केले जाते. विशिष्ट कंपनीच्या नावे मेसेज फॉरवर्ड करून फसव्या व्यक्ती स्वत: शेअर बाजारातून आधीच खरेदी करून ठेवतात आणि शेअरने उसळी घेतल्यानंतर विक्री करुन नफ्याची कमाई करतात. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर फसवणुकीचे मायाजाल सक्रिय आहे. इंस्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुकवर फसवे कॅम्पेन चालविले जातात.

स्वत: संशोधकाचा दावा

फसव्या जाहिरातींद्वारे विश्लेषक किंवा संशोधक असल्याचा दावा केला जातो. नव्या-नव्या संकल्पनांचा भडिमार केला जातो. कमी दिवसांत अधिक पैसे मिळविण्याच्या आमिषापोटी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकदार अडकतात आणि आपला हक्काचा पैसा गमवतात.

ऐकावे तज्ज्ञांचे, करावे मनाचे

‘सॅमको सिक्युरिटिज’चे इक्विटी रिसर्च हेड येशा शाह यांच्या मते, कोविड प्रकोपाच्या काळात ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शेअर्स बाजारातून मिळणाऱ्या अनुकूल परिणामांमुळे गुंतवणुकीचा कल अधिक दिसून येत आहे. तरुण वयोगटातील गुंतवणूकदारांचे यामध्ये सर्वाधिक प्रमाण आहे. यूट्यूब किंवा सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे शेअर बाजार तज्ज्ञ म्हणण्यांचे प्रमाण यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

‘सेबी’चा रेड अलर्ट

स्वत:च्या फायद्यांसाठी सर्वसामान्यांची पुंजी मातीमोल करणाऱ्या फसव्या गुंतवणूक तज्ज्ञांपासून दूर राहण्याचे आवाहन सेबीने केले आहे. सोशल मीडियावरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे पैसे गुंतवणूक करणे टाळायला हवे. पैसे गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी स्वत: संशोधन करावे किंवा सेबीद्वारे मान्यताप्राप्त सल्लागारांचा मदत घ्यावी.

इतर बातम्या

Gold Price Today : चांदीला लकाकी, सोने वधारले: प्रमुख शहरातील भाव एका क्लिकवर

145 टक्क्यांचा घसघशीत परतावा, सचेता मेटलने गुंतवणूकदारांना केले मालामाल, मल्टी बॅगर शेअरकडे दमदार वाटचाल

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...