Ration Card : रेशन कार्डाचे इतके प्रकार, तुम्ही कशाचे हक्कदार!

Ration Card : आता राहण्याचे ठिकाण जाणून घेण्यासाठी आधारकार्डचा अधिकृत वापर सुरु आहे. पण पूर्वी शिक्षापत्रिका, रेशनकार्डचे महत्व होते. केवळ धान्यच मिळविण्यासाठी नाही तर यासाठी पण रेशनकार्डचा वापर होत होता.

Ration Card : रेशन कार्डाचे इतके प्रकार, तुम्ही कशाचे हक्कदार!
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 1:45 PM

नवी दिल्ली : देशात आजही रेशन कार्डचे महत्व कमी झालेले नाही. शिधा पत्रिका (Ration Card) केवळ धान्य मिळविण्यासाठीच वापरण्यात येते असे नाही. तर नागरिकांना त्यांची ओळख पटविण्यासाठी रेशन कार्ड गरजेचे होते. आजही शिधापत्रिकेची गरज धान्य घेताना पडतेच. रेशन कार्ड दाखवावे लागतेच. खाद्यतेल खरेदीसाठी स्वस्त धान्य दुकानावर हे कार्ड दाखविले जाते. सरकारच्या शिधा संबंधीच्या योजनेदरम्यान हे कार्ड दाखवावे लागते. बँकेत खाते उघडण्यासाठी, शाळा, महाविद्यालयात घराचा पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्डचा आजही वापर करण्यात येतो. रेशनकार्डचे विविध प्रकार (Types of Ration Card) असतात. त्याचे रंग ही वेगवेगळे असतात. गरीब कुटुंबांना या आधारे महिन्याचे धान्य, तेल, साखर मिळते.

आधार पूर्वी महत्वाचा दस्तावेज आधार कार्ड पूर्वी रेशनकार्डला मोठे महत्व होते. नागरिकत्व, ओळख पटविण्यासाठी पूर्वी रेशनकार्डचा वापर होत असे. गरीबच नाही तर श्रीमंतांना पण रेशन कार्ड घ्यावे लागत असे. बँका, शाळा, पासपोर्ट, विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठा शिधा पत्रिकेचा वापर होत होता. देशातील विविध राज्यात रेशन कार्डबाबत वेगवेगळी धोरण आहेत. तसेच सरकारी योजनांचे फायदे पण राज्यपरत्वे बदलतात.

किती प्रकारचे कार्ड भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त चार प्रकारचे रेशन कार्ड असतात. या 4 रेशन कार्डची ओळख त्यांच्या रंगानुसार होते. निळे (Blue), गुलाबी(Pink), पांढरे (White) आणि पिवळ्या (Yellow) रंगाचे रेशन कार्ड असते. उत्पन्न गटानुसार, मिळकत, कमाईनुसार हे रेशन कार्ड देण्यात येते.

हे सुद्धा वाचा
  • निळे-हिरवे-पिवळे कार्ड दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी, गरीब लोकांसाठी रेशन कार्ड निश्चित केलेले आहे. निळे, हिरवे आणि पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड त्यांच्यासाठी असते. प्रत्येक राज्यानुसार, रेशन कार्डचा रंग निश्चित असतो. ज्या कुटुंबांकडे एलपीजी कनेक्शन पण नाही, त्यांना हे निळे, हिरवे, पिवळे रेशन कार्ड देण्यात येते.
  • उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वार्षिक उत्पन्न 6400 रुपये असेल तर त्यांच्यासाठी दारिद्रय रेषेखालील शिधा पत्रिका असते. शहरी भागासाठी ही उत्पन्न मर्यादा जास्त आहे. शहरात वार्षिक 11,850 रुपये उत्पन्न गटातील कुटुंबांना हे रेशन कार्ड मिळते.
  • गुलाबी रेशनकार्ड गुलाबी रेशन कार्ड, सामान्य कुटुंबांसाठी आहे. एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्रय रेषेखालील कुटुंबांपेक्षा अधिक असते. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वार्षिक उत्पन्न 6400 रुपये तर शहरात वार्षिक 11,850 रुपये उत्पन्न गटापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना गुलाबी रेशनकार्ड मिळते.
  • पांढरे रेशन कार्ड जे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, अशा कुटुंबांना पांढरे रेशन कार्ड देण्यात येते. या कुटुंबांना सबसिडीयुक्त अन्नधान्याचा कुठल्याच लाभाची गरज नसते. या रेशनकार्डचा वापर जास्त करुन ओळख पटविण्यासाठी करण्यात येते. हे रेशन कार्ड देशातील कोणताही नागरीक घेऊ शकतो. स्वस्त धान्यासाठी या कार्डचा काहीच वापर होत नाही.

Non Stop LIVE Update
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका.