पॉलिसी मॅच्युरिटीनंतर किती कर द्यावा लागतो? आयुर्विम्याबाबत जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण गोष्टी
आयुर्विमा (Life insurance) आता मुलभूत गरज झालेली आहे. कोरोना महामारीमुळे विम्यासंदर्भात मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. विमा प्रीमियम भरल्यानंतर तसेच पॉलिसी मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या रक्कमेवर किती कर लागतो हा प्रश्न आयुर्विमा धारकांना सतत पडत असतो. आज आपण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
नवी दिल्ली : आयुर्विमा (Life insurance) आता मुलभूत गरज झालेली आहे. कोरोना महामारीमुळे विम्यासंदर्भात मोठी जागरूकता निर्माण झाली. आता प्रत्येक जण आयुर्विमा आणि आरोग्य विमा (Health insurance) घेण्यासाठी धडपडत आहे. जर तुम्ही कुटुंबातील एकमेव कमावणारे व्यक्ती असाल तर आयुर्विमा लवकरात लवकर घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. देशावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोना (Corona) संकट आहे. कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमावावा लागला आहे. रोजगार गमावल्याने हातात पैसा नाही. अशा स्थितीत एखादा गंभीर आजार उद्धभवल्यास असा परिस्थितीमध्ये विम्याचे सुरक्षा कवच कामाला येते. विम्यामुळे खर्चात मोठी बचत होते. विमा प्रीमियम भरल्यानंतर तसेच पॉलिसी मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या रक्कमेवर किती कर लागतो हा प्रश्न आयुर्विमा धारकांना सतत पडत असतो. आज आपण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
आयुर्विम्यात करसवलतीचा लाभ
जर तुम्ही तुमची पत्नी आणि मुलांचा विमा हप्ता भरत असताल तर प्रीमियमवरील रक्कमेवर आयकर अधिनियम 80 सी कलमाद्वारे सुट मिळते. एखादी व्यक्ती तसेच हिंदू एकत्रित कुटुंब या दोघांनाही कर सवलत मिळते. प्रीमियमच्या तुलनेत विमा कवच दहा पटीनं जास्त असल्यास 80 सीचा फायदा मिळतो. मात्र ही विमा पॉलीसी एक एप्रिल 2012 नंतर जारी केलेली असावी. या अगोदरच्या विमा पॉलिसींना कर सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी प्रीमियमच्या तुलनेत विमा कवच पाच पट अधिक असावे लागते. याशिवाय 2013 नंतर घेतलेल्या पॉलिसी 80 यू अंतर्गत आलेले अपंगत्व किंवा 80 डीडीबी अंतर्गत आजारपण कव्हर करतात. यावेळी 80 सीचा लाभ घेण्यासाठी प्रीमियमच्या तुलनेत विमा कवच 15 पट अधिक असावा लागतो. जेंव्हा एखाद्या कंपनीकडून कर्मचाऱ्याचा विमा काढला जातो. या प्रकरणात जर प्रीमियम कंपनी भरत असेल तर दावे किंवा मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या रक्कमेवर कलम 10 (10डी) अंतर्गत करावर सूट मिळत नाही.
नॉमिनीला मिळणारी रक्कम करमुक्त
विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला मिळणारी रक्कम करमुक्त असते. मात्र, कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या काढलेल्या विम्यासंदर्भात ही सवलत मिळत नाही. कलम 10(10 डी) अंतर्गत सूट मिळवण्यासाठी पॉलिसीमधून मिळणारी रक्कम एक लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास विमा कंपनी रक्कम देण्या अगोदरच एक टक्के टीडीएस कापते. याप्रमाणेच बोनसवर देखील टीडीएस कापला जातो. जर रक्कम एक लाखांपेक्षा कमी असल्यास टीडीएस कापला जात नाही. मात्र, मिळणाऱ्या रक्कमेवर कर लागतो.
संबंधित बातम्या
MahaInfra Conclave : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला राज्याच्या विकासाचा लेखाजोखा
आणखी तीन बँकांना आरबीआयकडून दंड; चेक करा यामध्ये तुमची बँक तर नाहीना?