बंद पडलेले PPF खाते पुन्हा कसे सुरु कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

PPF Account | पहिला मार्ग म्हणजे तुम्ही पूर्वी PPF खाते असलेल्या बँकेत किंवा टपाल कार्यालयात निवेदन देऊ शकता. या निवेदनावर कार्यवाही होऊन तुमचे पीपीएफ खाते सुरु होईल.याशिवाय, पीपीएफ खात्यात दरवर्षी किमान 500 रुपये जमा केल्यास ते सुरु राहू शकते.

बंद पडलेले PPF खाते पुन्हा कसे सुरु कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
पीपीएफ गुंतवणूक
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 8:06 AM

मुंबई: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांपैकी एक आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या इतर योजनांपेक्षा चांगला व्याजदर मिळतो. तसेच सरकारी योजना असल्यामुळे गुंतवणूक सुरक्षित राहण्याची हमीदेखील मिळते. त्यामुळे अनेकजण PPF योजनेत गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात.

केंद्र सरकारकडून दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन पीपीएफ योजनेचा व्याजदर निश्चित केला जातो. त्यामुळे बाजारपेठेच्या बदलत्या परिस्थितीनुसार ग्राहकांना वाढीव व्याजाचा लाभ मिळू शकतो. पीपीएफ खात्याचा लॉकइन कालावधी 15 वर्षे आहे. म्हणजेच आपण कायद्यानुसार त्यापूर्वी पैसे काढू शकत नाही. परंतु ग्राहक पीपीएफ फंडांचा अनेक प्रकारे उपयोग करू शकतात. दोन वर्षांनंतर आपण या फंडाविरुद्ध कर्ज घेऊ शकता. दोन वर्षांनंतर जमा झालेल्या पैशांपैकी 25% पैशांपर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते. दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत (तिसर्‍या वर्षाच्या सुरुवातीस) आणि 6 वर्षांपूर्वी कर्ज घेतले जाऊ शकते. कर्जाची रक्कम 36 महिन्यांत परत करावी लागेल. पीपीएफवर मिळणाऱ्या टक्केवारीच्या व्याजापेक्षा कर्जाच्या रकमेवर 2% अधिक व्याज द्यावे लागेल. 7 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण निधीमधून काही पैसे काढू शकता. समजा तुम्ही मध्येच पैसे भरणे बंद केल्यामुळे पीपीएफ खाते बंद झाले तरी काही कालावधीनंतर ते पुन्हा सुरु करता येऊ शकते.

पीपीएफ खाते पुन्हा सुरु करण्यासाठी काय कराल?

पहिला मार्ग म्हणजे तुम्ही पूर्वी PPF खाते असलेल्या बँकेत किंवा टपाल कार्यालयात निवेदन देऊ शकता. या निवेदनावर कार्यवाही होऊन तुमचे पीपीएफ खाते सुरु होईल.याशिवाय, पीपीएफ खात्यात दरवर्षी किमान 500 रुपये जमा केल्यास ते सुरु राहू शकते. ते पूर्णपणे बंद होणार नाही. त्यामुळे दरवर्षी 31 मार्चपूर्वी पीपीएफ खात्यात किमान 500 रुपये जमा करत राहावेत.

यानंतरही तुम्ही अनेक वर्षे पीपीएफ खात्याचा वापरच केला नाही तर ते पुन्हा सुरु करण्यासाठी दंड भरावा लागेल. पैसे न भरलेल्या प्रत्येक वर्षासाठी 500 रुपये आणि 50 रुपयांचा दंड या हिशेबाने तुम्हाला पैसे जमा करावे लागतील. समजा तुम्ही तीन वर्षे पीपीएफ खात्याचा वापर केला नाही तर तुम्हाला एकूण 1650 रुपये भरावे लागतील.

संबंधित बातम्या

SBI अलर्ट! आपला संपूर्ण डेटा चोरीला जातोय, मग चुकूनही हे मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका

आता घर बसल्या करा कोरोना चाचणी, अवघ्या 325 रुपयांत कोरोना किट लाँच

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.