Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रायव्हिंग लायसन्सला डिजिलॉकर सोबत जोडणे झाले अगदी सोप्पे, या प्रक्रियांचा करा वापर !

डिजिलॉकर मुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी डॉक्युमेंट घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला आपले ड्रायव्हिंग लायसन्स डिजिलॉकर सोबत कसे जोडायचे? या बद्दल सांगणार आहोत.

ड्रायव्हिंग लायसन्सला डिजिलॉकर सोबत जोडणे झाले अगदी सोप्पे, या प्रक्रियांचा करा वापर !
ड्रायव्हिंग लायसन्सला डिजिलॉकर सोबत जोडणे झाले अगदी सोप्पेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 11:06 PM

डिजिटल इंडिया (Digital India) या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारने डिजिलॉकर (Digilocker) ची सुविधा सर्वांसाठी उपलब्ध केली.या सुविधेमुळे देशातील नागरिकांना कागदपत्रांच्या त्रासाशिवायच आपले महत्त्वाचे कागदपत्र आणि ऑफिशियल डॉक्युमेंट्स डिजिटल स्वरूपामध्ये अगदी सुरक्षित रित्या आपण स्टोअर करू शकतो. डिजिलॉकरमुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी कागदपत्रे घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. मानवी जीवनामध्ये प्रत्येक डॉक्युमेंट हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शाळेचा दाखला, जन्मदाखला, मार्कशीट, वोटर आयडी या सगळ्या कागदपत्रांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) सुद्धा अनेकदा महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. अनेकदा ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याकडे न ठेवणे हे महाग पडू शकते. ड्रायव्हिंग लायसन्स जवळ नसल्याने तुम्हाला चलन देखील भरावे लागू शकते. भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चलन भरावे लागू नये म्हणून आजच्या लेखामध्ये डिजिलॉकर सोबत आपले ड्रायव्हिंग लायसन्स कसे जोडावे, याबद्दलची माहिती आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत.

डिजिलॉकरची ऑफीशियल वेबसाइट

www.digilocker.gov.in ही डिजिटल लॉकरची ऑफिशिअल वेबसाईट आहे. आपल्याला या ऑफिशिअल वेबसाईट वर जायचे आहे आणि फोन नंबरचा वापर करून साइन अप करायचे आहे. साइन अप केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी नंबर मिळेल. या नंबरला इंटर करून तुम्ही अकाउंट साठी एक युजर नेम आणि पासवर्ड बनवू शकता. तुम्ही एक एम पिन सुद्धा सेट करू शकता. एम पीच्या माध्यमातून भविष्यात तुम्हाला फास्ट लॉग इन करण्यासाठी मदत होऊ शकते त्याच बरोबर तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट देखील लवकर सापडण्यास मदत तर होईलच पण त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट सुरक्षित देखील राहील.

अशा प्रकारे ड्रायव्हिंग लायसन्स डिजिटल लॉकर सोबत जोडा..

1 ) आपले अकाऊंट बनवल्यानंतर आधार कार्ड ला डिजिलॉकर अकाउंट सोबत लिंक करा.

2) येथे तुम्ही ॲप वर “पुल पार्टनर्स डॉक्यूमेंट” सेक्शन ला ऍक्सेस करू शकतात. या सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स नंबर ॲड करू शकतात आणि हे ॲप एप्लीकेशनला लायसन्स देईल.

3 ) पुल डाक्यूमेंट सेलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्या पार्टनरला निवडावे लागेल,त्याच्या मदतीने तुम्ही डॉक्युमेंट सोर्स व्हाल. उदाहरणार्थ येथे तुम्हाला सर्व राज्यांचे ऑप्शन उपलब्ध होतील जसे की, रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय शहर इत्यादी..

4) डॉक्युमेंट टाईप मध्ये गेल्यावर ड्रायव्हिंग लायसन्स ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

5) तुम्ही तुमचे नाव आणि पत्ता व्यवस्थित टाईप केल्यानंतर तुमची माहिती एप्लीकेशन मध्ये सबमिट होऊन जाईल. एप्लीकेशन सेलेक्टेड पार्टनर कडून डॉक्युमेंट स्वीकारेल आणि डॉक्युमेंट ला ॲप्लिकेशन मध्ये स्टोर करेल.

6) प्रत्येक वापरकर्त्याला आपले डॉक्युमेंट्स स्टोअर करण्यासाठी 1 जीबी चा स्पेस मिळतो. सगळ्या सरकारी डिपार्टमेंटला आता डिजिलॉकर साठी उपलब्ध असलेले डॉक्युमेंट नियम चे पालन करणे अनिवार्य आहे त्याचबरोबर या डिजिलॉकरचा वापर करण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे.

इतर बातम्या

Indapur Murder : इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना; मुलाकडून बापाची डोक्यात दगड घालून हत्या

फटका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, महिला प्रवाशांचे मोबाईल चोरायचा

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.