AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता घरबसल्या करता येणार पॅन कार्डसाठी अर्ज, 2 मिनिटात मिळणार ई-पॅन कार्ड; संपूर्ण प्रक्रिया काय?

पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याला पॅन 2.0 असे नाव देण्यात आले आहे.

आता घरबसल्या करता येणार पॅन कार्डसाठी अर्ज, 2 मिनिटात मिळणार ई-पॅन कार्ड; संपूर्ण प्रक्रिया काय?
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 5:58 PM

आधारकार्ड प्रमाणेच पॅनकार्ड हे अत्यंत महत्वाचे सरकारी कागदपत्र आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार म्हणा किंवा सरकारी काम यासाठी पॅनकार्ड खूप उपयोगी पडते. त्याचबरोबर पैशांचे मोठं मोठे व्यवहार करताना, बँकेतून मोठी रक्कम काढताना, तसेच पैसे गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड असणे खूप महत्वाचे आहे.

अशातच काही दिवसांपूर्वी पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याला पॅन 2.0 असे नाव देण्यात आले आहे. पॅन अपडेट करण्यासाठी आणि चांगले पॅन देण्यासाठी आयकर विभागाने ही घोषणा केली आहे. यामुळे अर्जदारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर क्यूआर कोड असलेले ई-पॅन कार्ड मोफत पाठवले जातात. मात्र, त्यासाठी तुम्हाला अत्यंत कमी शुल्क भरावे लागणार आहे.

तसेच तुमच्या माहितीसाठी सध्याचे पॅन कार्ड क्यूआर कोडशिवायही वैध राहतील. तर तुम्ही सुद्धा पॅन 2.0 ऑनलाईन पद्धतीने घरी बसून अर्ज करू शकता. पॅन 2.0 कसे काढायचे हे स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.

तुम्ही तुमचेपॅन कार्ड हे PAN NSDL किंवा UTI Infrastructure Technology and Services Ltd. (UTIITSL) ने जारी केले आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. ही माहिती तुम्ही पॅन कार्डच्या मागील बाजूस तपासू बघू शकता. त्यानंतर तुम्ही त्यानुसार अर्ज करू शकता.

एनएसडीएलच्या माध्यमातून ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम तुम्हाला एनएसडीएल ई-पॅन पोर्टलवर जावे लागेल.
  • यासाठी तुम्ही https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html या अधिकृत वेब साईटला भेट द्या.
  • यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार आणि जन्मतारीख दिलेल्या पर्यायत भरा. यानंतर डिटेल्स चेक करा आणि वन टाइम पासवर्ड (ओटीपी) विचारा.
  • त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकावा लागेल. त्यानंतर तुमचा पॅन २.० हा नवीन पॅन कार्ड तयार होईल.
  • पॅन कार्ड जारी केल्यानंतर 30 दिवसांच्या आत तीन विनंत्या विनामूल्य केल्या जाऊ शकतात. त्यानंतरच्या विनंतीलासाठी तुम्हाला जीएसटीसह 8.26 रुपये खर्च करावे लागतील. पेमेंट केल्यानंतर 30 मिनिटांच्या आत तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर ई-पॅन येईल. कोणतीही अडचण आल्यास tininfo@proteantech.in ईमेल किंवा 020-27218080 या क्रमांकावर संपर्क साधावा.

UTIITSLच्या माध्यमातून ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा?

  • यासाठी तुम्हाला आधी UTIITS च्या ई-पॅन पोर्टलवर जावे लागेल
  • त्यानंतर https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard. या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • यानंतर तुम्हाला तुमचा पॅन, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड द्यावा लागेल.
  • जर ईमेल नोंदणीकृत नसेल तर प्रकल्प अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर आपल्याला पॅन 2.0 अंतर्गत ते अपडेट करावे लागेल.
  • तुमचा ई-पॅन PDF स्वरूपात नोंदणीकृत ईमेल आयडीवर देखील पाठविला जाईल.
  • नोंदणीकृत ईमेल आयडीवर तीन रिक्वेस्टपर्यंत ई-पॅन मोफत डिलिव्हर केले जाणार आहे. त्यानंतरच्या तीन विनंत्या विनामूल्य केल्या जाऊ शकतात. 8.26 इतका कमी चार्ज द्यावा लागेल. फिजिकल पॅनसाठी रिक्वेस्ट केल्यास तुम्हाला 50 रुपये खर्च करावे लागतील.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती.
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे.