फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे असतील तर तुम्हालाही मिळू शकते क्रेडिट कार्ड

Credit Card | याचा अर्थ बँकेने तुमच्या नावे क्रेडिट कार्ड जारी केल्यानंतर तुमच्या मुदत ठेवीचे पैसे त्यासाठी तारण किंवा हमीच्या स्वरुपात राहतील. त्यामुळे तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जितके जास्त पैसे असतील तेवढी तुमची क्रेडिट लिमीट असेल.

फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे असतील तर तुम्हालाही मिळू शकते क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 7:58 AM

नवी दिल्ली: अनेकांना क्रेडिट कार्ड घ्यायची इच्छा असूनही बँकेचे नियम आणि अटींमुळे ते मिळत नाही. अशा लोकांसाठी आता एक पर्याय उपलब्ध झाला आहे. कोणत्याही बँकेत तुम्ही मुदत ठेवीमध्ये (Fixed Deposite) पैसे गुंतवले असतील तर त्या आधारे तुम्ही क्रेडिट कार्ड सहजपणे मिळवू शकता. क्रेडिट कार्ड हे फक्त उधारीवर खरेदी करण्यासाठी उपयोग पडत नाही. तर त्यामुळे क्रेडिट स्कोअर वाढून तुम्हाला भविष्यात मोठे कर्ज मिळू शकते.

अशाप्रकारे क्रेडिट कार्ड मिळवल्यास ते सिक्योर्ड कार्ड असते. याचा अर्थ बँकेने तुमच्या नावे क्रेडिट कार्ड जारी केल्यानंतर तुमच्या मुदत ठेवीचे पैसे त्यासाठी तारण किंवा हमीच्या स्वरुपात राहतील. त्यामुळे तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जितके जास्त पैसे असतील तेवढी तुमची क्रेडिट लिमीट असेल.

क्रेडिट कार्ड कसे मिळवाल?

तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जेवढे पैसे गुंतवले असतील त्या रक्कमेच्या 75 ते 80 टक्क्यांची क्रेडिट लिमीट असलेले कार्ड तुम्हाला मिळू शकते. Axis बँकेत ही मर्यादा 80 टक्के इतकी आहे. तसेच बँकांकडून क्रेडिट कार्ड देताना तुमच्या मुदत ठेवीचा कालावधी कधी संपुष्टात येतो, हेदेखील पाहिजे जाते. तुम्ही क्रेडिट कार्डाचे पैसे फेडले नाहीत तर बँक ती रक्कम मुदत ठेवीच्या पैशातून कापून घेते. तसेच तुम्हाला एखाद्या अडचणीच्यावेळी मुदत ठेवीतील पैसे काढायचे झाले तर त्यापूर्वी तुम्हाला क्रेडिट कार्ड कॅन्सल करावे लागेल. त्यानंतरच तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमधील सर्व पैसे मिळतील.

फिक्स्ड डिपॉझिटवर घेतलेल्या सिक्योर्ड क्रेडिट कार्डासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखल देण्याची गरज नसते. गृहिणी, विद्यार्थी आणि असंघटित क्षेत्रातील कामगारही हे क्रेडिट कार्ड मिळवू शकतात. या कार्डावर 48 ते 55 दिवसांचा इंटरेस्ट फ्री पीरियड असतो. या काळात ग्राहकांनी बिल भरल्यास त्यावर व्याज भरावे लागत नाही. तसेच यावर रिवॉर्ड पॉईंटस आणि कॅशबॅकचीही सुविधा मिळते. क्रेडिट कार्डाचे पैसे वेळेवर भरले तर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारत जाईल. त्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल.

इतर बातम्या:

Income Tax पोर्टलसाठी केंद्र सरकारने मोजले 165 कोटी, पण तांत्रिक अडचणींचे शुक्लकाष्ठ संपेना

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल एकाच किंमतीने विकणार का, पेट्रोलियम मंत्री म्हणाले…

Union Bank of Indiaच्या विशेष योजनेतून कर्ज घेणाऱ्यांसाठी चांगली संधी, क्रेडिट लाईन वाढणार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.