मतदार ओळखपत्राशिवाय मतदानाचा हक्क बजावू शकता! या 11 कागदपत्रांपैकी एकाची आवश्यकता 

मतदान कार्ड नसले म्हणून काय झाले, मंडळी तुम्हाला मतदान करण्यापासून रोखता येत नाही. हा पण मतदान कार्डाऐवजी तुमच्याकडे ओळखीचा सक्षम पुरावा किंवा भक्कम डॉक्युमेंट लागतंय. खाली दिलेल्या 11 कागदपत्रांपैकी एक जरी तुमच्याकडे असेल तर पठ्ठ्याहो तुमचं मतदान पक्कं म्हणून समजा!

मतदार ओळखपत्राशिवाय मतदानाचा हक्क बजावू शकता! या 11 कागदपत्रांपैकी एकाची आवश्यकता 
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 2:27 PM

मुंबई : तुमचे मतदार कार्ड गहाळ झाले तरी तुम्हाला मतदान करण्यापासून रोखता येत नाही. मतदार कार्ड गहाळ झाले असतानाही त्याच्याशिवाय मतदान करता येते. हा पण मंडळी यासाठी दोन नियम आहेत. पहिला नियम म्हणजे तुमचं नाव मतदार यादीत असायला हवं. जर तुमचे नाव मतदार यादीत असेल आणि तुमच्याकडे मतदार कार्ड नसेल, तर दुसरा नियम तात्काळ लागू होतो. केंद्रीय निवडणूक आयोगाने इतर 11 प्रकारच्या कागदपत्रांना ओळखपत्र म्हणून मान्यता दिली आहे, जे आपण दाखवू शकता आणि मतदान करू शकता.  (How to cast vote without Voter ID; This Document can make a easy way to cast Vote)

मतदार यादीत तुमचे नाव असेल तर ज्या भागातील मतदार यादीत तुमचे नाव आहे, त्या भागातील मतदार केंद्रावर जाऊन मतदान करता येते. जर तुमचे मतदार कार्ड हरवले असेल, तर पुढील 11 कागदपत्रांपैकी एकाचा पुरावा सादर करुन मतदान करता येते.

नागरिकांकडे मतदान कार्ड नसेल आणि खालील पैकी एक जरी पुरावा असेल तर त्याला मतदानापासून रोखता येत नाही

  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • जर तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी असाल किंवा पीएसयू आणि पब्लिक लिमिटेड कंपनीत काम करत असाल, तर कंपनीच्या फोटो आयडीच्या आधारे मतदानही करता येऊ शकते.
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • पोस्ट ऑफिस आणि बँकेचे पासबुक
  • मनरेगा जॉब कार्ड
  • कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा कार्ड
  • पेन्शन कार्ड ज्यावर आपला फोटो आहे आणि सदर कार्ड साक्षांकित आहे
  • राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचे (एनपीआर) स्मार्ट कार्ड
  • खासदार किंवा आमदाराकडून मिळालेले अधिकृत ओळखपत्र

असे शोधा मतदार यादीमध्ये आपले नाव

  • निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर लॉग इन करा Electoralsearch.in. या पर्यायावर जा
  • मतदार यादीतील नावे शोधण्याचे किंवा तपासण्याचे दोन मार्ग आहेत
  • पहिल्या पर्यायात नाव, जन्मतारीख आणि इतर काही माहिती प्रविष्ट करून मतदार यादीतील नाव तपासू शकता.
  • दुसऱ्या पर्यायात मतदारांना कार्डवर दिलेल्या ईपीआयसी नंबरद्वारे माहिती मिळू शकते
  • ईपीआयसी क्रमांकाला मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणतात. या नंबरच्या माध्यमातून तुम्ही मतदार यादीत तुमचे नाव तपासू शकता.
  • वैयक्तिक माहिती जमा केल्यानंतर मतदार यादी समोर येईल आणि तुमचा तपशील समोर दिसेल.
  • सर्व माहिती जमा करुनही मतदार यादीत नाव सापडले नाही तर निवडणूक आयोगाच्या टोल फ्री क्रमांक 1800111950 यावर संपर्क साधू शकता.

संबंधित बातम्या : 

HDFC व्यवहाराच्या माहितीसाठी आता प्रति SMS 20 पैसे मोजा, Insta Alert Services च्या नियमांमध्ये बदल 

तुम्ही ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरता ? तुमच्यासाठी आहे मोठी बातमी, वेळेवर परतावा केला नाही तर भरावा लागणार दंड

(How to cast vote without Voter ID; This Document can make a easy way to cast Vote)

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.