Aadhaar Card: तुम्हाला ही आधार कार्डसोबत लिंक मोबाईल नंबर बदलायचा आहे? जाणून घ्या प्रक्रिया
आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणं आता आवश्यक झाले आहे. आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागेल. चला तर मग जाणून घेऊया.
मुंबई : Aadhaar Card आता सरकारी कामासाठी महत्त्वाचं ओळखपत्र बनलं आहे. कोणत्याही कामांसाठी तुम्हाला आता आधार कार्ड बाळगणे महत्त्वाचं झालं आहे. सिम कार् खरेदी करायचे असेल किंवा बँकेत खाते उघडायचे असेल तुम्हाला आता आधार कार्ड सोबत जोडावे लागणार आहे. भारतीय लोकांची ओळख आता आधार कार्ड बनलं आहे.बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती याद्ववारे संग्रहित केली जाते. या शिवाय आता आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत देखील लिंक केला जात आहे. त्यामुळे भविष्यात तुम्हाला कोणत्याही कामासाठी आधारकार्ड दिल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येतो. त्यानंतरच पुढची प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे आधार कार्डला लिंक केलेला नंबर देखील महत्त्वाचा बनला आहे. पण जर तुम्हाला हा नंबर बदलायचा असेल तर मग काय करावे?
जर तुम्हाला आधार सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. अनेकदा आपला मोबाईल नंबर बंद होऊन जातो. किंवा इतर कोणत्याही कारणासाठी तुम्हाला जर नंबर बदलायचा असेल तर काय करावे हे जाणून घेणार आहोत.
आधार कार्डमध्ये नवा मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा?
पहिली पायरी
जर तुम्हाला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्हाला UIDAI च्या वेबसाईटवर जावं लागेल. या वेबसाईटवर जावून तुम्हाला अपॉईंटमेंट घ्यावे लागेल किंवा तुम्ही आधार सेंटरवर देखील जावू शकता.
दुसरी पायरी
अपाँइटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला दुरुस्तीचा फॉर्म भरावा लागेल.
तिसरी पायरी
फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल क्रमांक आणि नवीन मोबाईल नंबर भरायचा आहे.
चौथी पायरी
आधार केंद्रावर दुरुस्ती अर्ज भरल्यानंतर तुम्हाला २५ रुपये फी भरावी लागेल. यानंतर २४ तासात तुमचा नंबर अपडेट होईल.
आधार केंद्रातून मिळालेली फी भरल्याची पावतीवर तुम्हाला रेफरेंस नंबर मिळेल. तो रेफरेंस नंबर टाकून तुम्ही तुमच्या आधार कार्डची अद्यावत केलेली स्थिती जाणून घेऊ शकता.
आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड कसे करावे?
आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड टाकावा लागेल.
सेंड ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेला कोड टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही E-Aadhar Card डाउनलोड करु शकतात.