Smartphone Tips: ‘या’ पद्धतीने स्मार्टफोन कधीही करू नका साफ, स्क्रीन होईल खराब

स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यांची योग्य तऱ्हेने काळजी घेतल्यास ते वारंवार खराब होत नाहीत. फोनवर नेहमी स्क्रीन गार्ड अथवा स्क्रीन प्रोटेक्शन लावणे गरजेचे आहे. त्यामुळे फोनवर धूळ अथवा घाण चिकटत नाही.

Smartphone Tips: 'या' पद्धतीने स्मार्टफोन कधीही करू नका साफ, स्क्रीन होईल खराब
ईएमआयवर स्मार्टफोन खरेदी केला म्हणून पती-पत्नीत वाद
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 6:53 PM

Smartphone Screen Cleaning Tips : स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यांची योग्य तऱ्हेने काळजी घेतल्यास ते खराब होत नाहीत. मात्र स्मार्टफोन सतत साफ करणेही चांगले नाही. चुकीच्या पद्धतीने फोन साफ केल्यास तो खराब होऊ शकतो. फोन साफ करताना योग्य काळजी घेणे (Smartphone Screen Cleaning) गरजेचे आहे. फोनच्या स्क्रीनवर स्क्रीन गार्ड अथवा स्क्रीन प्रोटेक्शन (screen guard or screen protection) लावून ठेवावे. त्यामुळे त्यावर धूळ बसत नाही अथवा घाण चिकटत नाही. आयफोन, ॲंड्रॉईड यांसारखे व इतर कोणतेही स्मार्टफोन साफ आणि सुरक्षित (clean and safe) ठेवण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यांचे योग्य रितीने पालन केल्यास तुमचा फोन अनेक वर्ष, खराब न होता व्यवस्थित चालू शकेल.

स्क्रीन प्रोटेक्टरचा वापर करा

आपल्या स्मार्टफोनवर नेहमी स्क्रीन गार्ड किंवा स्क्रीन प्रोटेक्टर लावून ठेवावा. त्यामुळे फोनवर धूळ, माती बसत नाही किंवा कोणतीही घाण चिकटत नाही. तसेच चुकन फोन हातातून खाली पडल्यास स्क्रीनवर चरेही उमटत नाहीत. जेव्हा तुम्ही नवीन फोन घ्यायला जाल, त्याच वेळेस दुकानातून त्यावर स्क्रीन प्रोटेक्टर लावून घ्या. मात्र तेवढ्यानेच काम संपत नाही. हे स्क्रीन गार्ड अथवा स्क्रीन प्रोटेक्टर वेळोवेळी साफ करणेही गरजेचे असते. तुमचा फोन जरी खाली पडला तरी स्क्रीन प्रोटेक्टरमुळे फोनच्या स्क्रीनचे नुकसान होत नाही.

मायक्रोफायबर कापड वापरा

तुमचा स्मार्टफोन साफ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरणे हा एक उत्तम पर्याय आहे. फोनवर बसलेली धूळ किंवा तेलाचे, घामाचे डाग पुसण्यासाठी हे कापड उपयोगी पडते. एक कोरडे कापड घेऊन त्याच्या मदतीने फोन स्वच्छ करावा. फोन साफ करण्यासाठी चुकूनही साधारण कापड वापरू नका, अन्यथा स्क्रीनवर चरे उमटू शकतात.

हे सुद्धा वाचा

पेपर वाईप्स वापरू नका

स्मार्टफोन साफ करण्यासाठी चुकूनही पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपर वापरू नका. तसेच पेपस (वेट) वाईप्सचा वापरही फोन स्वच्छ करण्यासाठी करू नका. त्यामुळेही स्क्रीनवर चरे उमटू शकतात.

द्रव पदार्थ वापरू नका

तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन अथवा मागची बाजू स्वच्छ करण्यासाठी कोणतेही लिक्विड म्हणजेच द्रव पदार्थ वापरू नका. जेव्हा फोन निर्जंतुक करणे अतिशय गरजेचे असेल, तेव्हा एका छोट्या स्प्रे बॉटलमध्ये डिस्टिल्ड वॉटर आणि 70 टक्के आयसोप्रोपिल अल्कोहोल भरून घ्यावे. त्यानंतर मायक्रोफायबर कापडावर ते मिश्रण 2-3 वेळा स्प्रे करावे. आता हे कापड स्क्रीन अथवा बॅक पॅनलवर ठेवून नीट स्वच्छ करावे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.