डेबिट कार्डावरची रक्कम EMI मध्ये कशी कन्व्हर्ट कराल?

Debit Card | बिलिंग काऊंटरवर गेल्यानंतर आपण प्रमाणापेक्षा जास्त खर्च केला असे लक्षात येते. तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर पैसे तात्काळ भरावे लागतात. परंतु, त्यामुळे पुढील खर्चाचा ताळमेळ बिघडण्याची भीती असते.

डेबिट कार्डावरची रक्कम EMI मध्ये कशी कन्व्हर्ट कराल?
डेबिट कार्ड
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 12:23 PM

मुंबई: अनेकदा शॉपिंगला गेल्यावर वस्तू खरेदी करण्याच्या नादात आपल्याला नेमक्या खर्चाचा अंदाज येत नाही. पण बिलिंग काऊंटरवर गेल्यानंतर आपण प्रमाणापेक्षा जास्त खर्च केला असे लक्षात येते. तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर पैसे तात्काळ भरावे लागतात. परंतु, त्यामुळे पुढील खर्चाचा ताळमेळ बिघडण्याची भीती असते.

अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या डेबिट कार्डधारकांना खास सोय देऊ केली आहे. त्यानुसार ग्राहक डेबिट कार्डवरून पूर्ण पैसे खर्च न करता ती रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करु शकता. ग्राहकपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा स्थानिक दुकानांमध्ये तुम्ही डेबिट कार्ड स्वाईप केल्यानंतर तुम्ही ईएमआय सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, Amazon किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स पोर्टलवरून खरेदी करतानाही तुम्हाला या विशेष सुविधेचा लाभ घेता येईल.

योजनेचा फायदा काय?

स्टेट बँकेच्या डेबिट कार्डवर केलेल्या खर्चाची रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट केल्यास तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही. तसेच यासाठी कोणतीही कागदपत्रे जमा करावी लागणार नाहीत. शॉपिंगची रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर तुमच्या बचत खात्यामधील लिमीट पूर्ववत होईल.

डेबिट कार्ड ईएमआय सुविधेसाठी काय कराल?

* तुमचे डेबिट कार्ड स्वाईप करा. * त्यानंतर ईएमआयच्या पर्यायांची निवड करा. * त्यानंतर ईएमआयची रक्कम आणि कालवधी टाका. * ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ओके क्लिक करा, त्यानंतर POS मशीन तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे चेक करेल. * यानंतर तुमची रक्कम ईएमआयमध्ये कन्व्हर्ट होईल. * दुकानदार तुम्हाला ईएमआय आणि इतर तपशील असलेली स्लीप देईल, त्यावर सही करा.

डेबिट कार्डच्या ऑनलाईन ईएमआय सुविधेसाठी काय कराल?

* तुमच्या रजिस्टर्ड मोबाईन नंबरवरुन Amazon किंवा फ्लिपकार्ट पोर्टलवर लॉग इन करा. * तुमची खरेदी झाल्यानंतर पेमेंट ऑप्शनवर जा. * त्याठिकाणी Easy EMI पर्याय निवडा. त्यामध्ये एसबीआय बँकेवर क्लिक करा. * यापुढच्या प्रक्रियेत तुम्हाला EMI चा कालावधी निवडून प्रोसिडवर क्लिक करावे लागेल. * यानंतर एसबीआयचे लॉग इन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुमच्या डेबिट कार्डचा तपशील भरा. * ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासमोर अटी-शर्ती असलेली एक स्क्रीन ओपन होईल. त्याला मान्यता दिल्यानंतर तुमच्या शॉपिंगची रक्कम ईएमआयमध्ये कन्व्हर्ट होईल.

संबंधित बातम्या:

रेशन कार्डवरील मोबाईल क्रमांक बदलायचाय, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

भारतीय रेल्वेसोबत करा ‘हा’ व्यवसाय, कमी भांडवल गुंतवूनही व्हाल मालामाल

Gold Price Today: सोन्याच्या दरात चार दिवसांत तिसऱ्यांदा घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 9300 रुपयांनी स्वस्त

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.