AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Money : इसको फॉलो किया तो लाईफ झिंगालाला..पैसा इतक्या वर्षातच डबल झाला..

Money : पैसा डबल झालेला कोणाला नकोय? तोही कोणत्याही फसवणुकीच्या स्कीमशिवाय..मग काय आहे ते पैसा डबल करण्याचे गोल्डन रुल्स..

Money : इसको फॉलो किया तो लाईफ झिंगालाला..पैसा इतक्या वर्षातच डबल झाला..
हे गोल्डन रुल माहिती आहेत का?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 1:16 PM

नवी दिल्ली : पैसा डबल (Rupee Double) झालेला कोणाला नकोय? तोही कोणत्याही फसवणुकीच्या स्कीमशिवाय (Fraud Scheme). पण आपल्या कुणाकडेच जादूई छडी नाहीये की अलादीनचा कंदिल आहे. पण पैसा डबल करण्याचे गोल्डन रुल्स (Golden Rules) आहेत..पण ते समजून घेणे आवश्यक आहे.

72 चा नियम काय आहे? तुमची गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी Rule of 72 म्हणजे 72 चा नियम उपयोगी पडू शकतो. वैयक्तिक अर्थनियोजनातील हा सर्वात लोकप्रिय नियम आहे. या नियमानुसार, तुम्हाला गुंतवणुकीत सातत्य ठेवल्यास किती वर्षात गुंतवणूक दुप्पट होईल हे कळेल.

एव्हरेज कंपाऊंडिंग रेट ऑफ इंटरेस्टच्या आधारे तुम्हाला किती वर्षात रक्कम दुप्पट होते याची माहिती मिळते. जर तुम्हाला गुंतवणुकीवर वार्षिक 10 टक्के परतावा मिळत असेल तर या नियमानुसार, 72 / 10 = 7.2 वर्षांत तुमची रक्कम दुप्पट होईल.

हे सुद्धा वाचा

तुम्ही स्टॉक, बाँड्स, एफडी, बचत खाते या विविध प्रकारात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. याठिकाणी कमी-अधिक नुकसान झाले तरी त्याची सरासरी जर चांगली येत असेल तर तुम्हाला साधारणतः 15 ते 20 वर्षांत रक्कम दुप्पट मिळेल.

शेअर्समध्ये वार्षिक 10% सरासरी परतावा मिळेल. बाँड्स आणि अन्य डेट गुंतवणुकीत तुम्हाला वार्षिक 5% सरासरी तर बचत खात्यात वार्षिक 3% सरासरी परतावा मिळेल. या सर्वांचा एकत्रित विचार केला ,कमी जोखीम गृहित धरता दहा ते पंधरा वर्षे तरी दामदुप्पट होण्यास लागतील.

शेअर्समध्ये 10 टक्के परतावा गृहित धरल्यास 72 / 10 = 7.2 वर्षात रक्कम दामदुप्पट होईल. तर बाँड्समध्ये याच फॉर्म्युलाने 72 / 5 = 14.4 वर्षे लागतील. पण बचत खात्यातील गुंतवणुकीवर सर्वात कमी व्याजदर मिळते. त्यामुळे ही गुंतवणूक दामदुप्पट योजनेसाठी सर्वाधिक कालावधी घेते. या सूत्रानुसार, 72 / 3 = 24 वर्षांत तुमची रक्कम दुप्पट होईल.

गुंतवणूक करताना जोखिमेचा विचारही करावा लागतो. तसेच जबाबदारी आणि वयाचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे एकाच ठराविक उत्पन्नावर वय आणि जबाबदारी वाढल्यानंतर ताण येतो आणि गुंतवणूक मर्यादीत होते.

ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 जवानांना वीरमरण; पत्रकार परिषदेत लष्कराची माहिती
ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 जवानांना वीरमरण; पत्रकार परिषदेत लष्कराची माहिती.
भारताकडून पाकच्या एअरबेसवर हल्ला, सॅटेलाईटचे फोटो समोर, तुम्ही पाहिले?
भारताकडून पाकच्या एअरबेसवर हल्ला, सॅटेलाईटचे फोटो समोर, तुम्ही पाहिले?.
बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडायला 25 कोटी खर्च
बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडायला 25 कोटी खर्च.
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट.
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी.
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.