LIC Dhan Ratna Varsha : 10 पट मिळेल रक्कम, कशी आणि किती करावी गुंतवणूक?
LIC Dhan Ratna Varsha : एलआयसी देशातील सर्वात जुनी आणि मोठी विमा कंपनी आहे. विमाधारकाला या योजनेतून दहा पट कमाई होते. कोणती आहे ही योजना?
नवी दिल्ली : एलआयसी (LIC) देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. वेळोवेळी एलआयसी प्रत्येक वर्गासाठी योजना आणते. या योजनेतून गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होतो. एलआयसी योजनाचा (LIC Scheme) सर्वात चांगला फायदा म्हणजे, बचतीसह गुंतवणूकदाराला विम्याचे संरक्षणही (Insurance Coverage) मिळते. त्याला मॅच्युरिटी कालावधीनंतर सर्व फायदे तर मिळतातच, पण पुढे पाच ते दहा वर्ष विम्याचे संरक्षण सुरुच राहते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होतो. त्यामुळे एलआयसीच्या योजनेवर अजून गुंतवणूकदारांचा विश्वास आहे.
एलआयसीची धन रत्न योजना (LIC Dhan Ratna Policy) हमखास परतावा देते. या योजनेत तुम्हाला मनीबॅक फायदे आणि मृत्यूनंतर वारसदारांना नुकसान भरपाईसह परतावा मिळतो. एलआयसीची पॉलिसी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.
एलआयसी विमा रत्न योजना (LIC Bima Ratna) गुंतवणूकदारांना चांगला पर्याय उपलब्ध करुन देते. यामध्ये तुम्हाला हमखास बोनस, मनीबॅक आणि डेथ बेनिफिट्स हे तीन फायदे मिळतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर मोठा फायदा मिळतो.
एलआयसीची विमा रत्न पॉलिसीत गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळतो. यामध्ये मनीबॅक, गारंटीड बोनस आणि डेथ बेनिफिट्सचा फायदा मिळतो. एकाचवेळी तीन फायदे मिळविण्यासाठी या योजनेत गुंतवणूक करता येते.
एलआयसी विमा रत्न पॉलिसीमध्ये 15 वर्ष, 20 वर्ष आणि 25 वर्षांच्या प्रीमियमचा पर्याय मिळतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्रीमियम प्लॅन निवडू शकता. तुम्ही कोणताही पर्याय निवडला तर तुम्हाला योजनेत 4 वर्षे कमी प्रीमियम भरावा लागतो.
या योजनेत तुम्हाला मनीबॅकमध्ये बेसिक सम अॅश्योर्डच्या 25-25 टक्के परतावा मिळतो. 15 वर्षांच्या योजनेत 13 आणि 14 व्या वर्षी, 20 वर्षांच्या योजनेत 18 आणि 19 व्या वर्षी आणि 25 वर्षांच्या योजनेत 23 आणि 24 व्या वर्षी मनी बॅकचा फायदा मिळतो.
धन रत्न योजनेत कमीत कमी 5 लाख रुपयांची सम अॅश्युर्ड विमा उतरविणे आवश्यक आहे. मॅच्युरिटीवर एकूण सम अॅश्युर्डच्या 50 टक्के आणि हमखास फायदा मिळतो. तसेच हमखास बोनसही देण्यात येतो. या योजनेतंर्गत पहिल्या वर्षापासून ते 5 वर्षांपर्यंत प्रति 1000 रुपयावर 50 रुपयांचा हमखास बोनस मिळतो.
या योजनेतंर्गत सहाव्या ते दहाव्या वर्षापर्यंत प्रति 1000 रुपयांसाठी 55 रुपयांचा बोनस, 11 ते 25 वर्षांपर्यंत 1000 रुपयांपर्यंत 60 रुपयांपर्यंत बोनस देण्यात येतो. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास सम अॅश्युर्ड आणि हमखास एडिशनचा पैसा वारसदाराला मिळतो.
वारसदाराला बेसिक सम अॅश्युर्डच्या 125% अथवा वार्षिक हप्त्याच्या 7 पट यापैकी जी मोठी रक्कम असेल ती देण्यात येते. जेवढा प्रीमियम देण्यात आला आहे, त्यापेक्षा 105% कमी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देता येणार नाही.