आधार कार्ड IRCTC सोबत लिंक करा आणि मिळवा ‘हे’ फायदे

IRCTC Aadhar | तुम्ही IRCTC वरुन एका महिन्यात जास्तीत जास्त सहावेळा तिकीट बुक करु शकता. मात्र, तुम्ही तुमचे आधारकार्ड IRCTC अकाऊंटसोबत लिंक केल्यास तुम्हाला महिन्याला सहाऐवजी 12 वेळा रेल्वे तिकीटं बुक करता येतील.

आधार कार्ड IRCTC सोबत लिंक करा आणि मिळवा 'हे' फायदे
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँण्ड टुरिझन कॉर्पोरेशन
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 8:19 AM

नवी दिल्ली: लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करताना आपल्यापैकी अनेकजण इंडियन रेल्वे कॅटरिंग अँण्ड टुरिझन कॉर्पोरेशनच्या (IRCTC) माध्यमातून तिकीट बुक करत असतील. तुम्ही IRCTC वरुन एका महिन्यात जास्तीत जास्त सहावेळा तिकीट बुक करु शकता. मात्र, तुम्ही तुमचे आधारकार्ड IRCTC अकाऊंटसोबत लिंक केल्यास तुम्हाला महिन्याला सहाऐवजी 12 वेळा रेल्वे तिकीटं बुक करता येतील.

IRCTC अकाऊंटला आधार लिंक कसे कराल?

* सर्वप्रथम IRCTC च्या irctc.co.in या तिकीट बुकिंग संकेतस्थळावर जावे. * युजर आयडी आणि पासवर्ड टाकून अकाऊंट लॉगइन करावे. * होमपेजवर तुम्हाला My Account हा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये जाऊन आधार केवायसी हा पर्याय निवडावा. * त्यानंतर आपला आधार क्रमांक टाकून Send OTP वर क्लिक करावे. * तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन करावे. * या सगळ्या प्रक्रियेनंतर तुमच्या मोबाईलवर केवायसी डिटेल्स अपडेट झाल्याचा मेसेज येईल.

तिकीट बुक करण्यासाठी आधार व्हेरिफाय गरजेचे

IRCTC अकाऊंटवरुन तिकीट बुक करण्यासाठी तुमचे प्रोफाईल आधार व्हेरिफाय असणे गरजेचे आहे. तिकीट बुक करण्यापूर्वी आधार कार्डाचा तपशील देऊन मास्टर लिस्ट अपडेट करावी लागेल. तिकीट बुक केल्यानंतर मोबाईलवर प्रवाशाचे नाव, तिकाटाचे स्टेटस, भाडे असा सर्व तपशील येईल.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

संबंधित बातम्या:

वेटिंग लिस्टमध्ये ताटकळत बसू नका, कन्फर्म तिकीट कसे मिळवाल?

जर आपण आपल्या स्टेशनवर चढू किंवा उतरू शकले नाही, तर रेल्वे भाडे परत करणार

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.