Insurance : कमी पैशांत मिळवा बेस्ट इन्शुरन्स, नुतनीकरणापूर्वी अशी करा तयारी
Insurance : कमी प्रिमियममध्ये तुम्हाला विमा योजना खरेदी करता येते. त्यासाठी ही सोपी पद्धत आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून विम्याच्या हप्त्यात (Insurance Policy) सातत्याने वाढ झालेली दिसते. त्यामुळे अनेक जणांना विमा खरेदी (Insurance Buy) करण्याची इच्छा असूनही ते विमा खरेदी करण्यास धजत नाही. वाढत्या महागाईत विम्याचा वाढलेला प्रिमियम भरायचा कसा अशी चिंता सर्वांना सतावते. कोरोनानंतर प्रत्येकाला विम्याचे महत्व पटलं आहे. आता प्रत्येकाला विमा हवा आहे. विम्याची मुळ रक्कम तर तुम्हाला टाळता येत नाही. पण विमा योजनेचे नुतनीकरण (Renewal) करण्यासाठी काही पर्याय समोर आहेत. त्यानुसार पॉलिसीचे नुतनीकरण करण्यासाठी प्रिमियम थोडा कमी करता येतो. विमा खरेदी करताना ही पद्धत वापरल्यास तुमचा फायदा होईल.
विमा खरेदी करताना काळजी घेतल्यास आणि कंपनीशी घासाघीश केल्यास तुम्हाला विमा खरेदी करताना सवलत मिळते. विमा योजनेचे नुतनीकरण करण्यापूर्वी इतर विमा पॉलिसीशी त्याची तुलना करा. त्यानंतर तुमचा निर्णय घ्या. त्याआधारे विमा पॉलिसी खरेदी करा.
जर एखादी विमा कंपनी तुम्हाला तुमच्या विमा योजनेपेक्षा चांगला भाव देत असेल तर तुम्हाला विमा कंपनी बदलणे गरजेचे आहे. तुम्ही विमा कंपनी बदलण्याची तयार करत असाल तर तुमची सध्याची कंपनी तुम्हाला हमखास सवलत देईल. योग्य वाटल्यास ही ऑफर स्वीकारता येईल.
पण रक्कम कमी होईल म्हणून कोणत्याही विमा कंपनीची योजना खरेदी करु नका. क्लेम सेटलमेंट रेश्यो, विमा खरेदीनंतरची सेवा, लाभ, फायदे आणि क्लेम प्रोसेसिंग टाईम या गोष्टींकडेही लक्ष द्या. नाहीतर कमी हप्ता असल्याने कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करु नका.
विमाधारक विम्याचा दावा दाखल करताना खिशातून रक्कम भरतो, त्याला डिडक्टिबल म्हणतात. ही एक निश्चित रक्कम असते. डिडक्टिबल रक्कम जेवढी वाढवाल, तेवढा प्रिमियम कमी होईल. तुम्ही विमा कंपनीकडे 50,000 ऐवजी 75,000 डिडक्टिबल देण्याची तयारी ठेवल्यास त्याचा परिणाम दिसून येईल.
काही घटना घडल्यास रुग्णालयामध्ये सर्वात अगोदर डिडक्टिबल रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर विमा संरक्षण मिळते. ही सवलत केवळ डिडक्टिबल पॉलिसीवरच मिळते. जर मुख्य योजनेचा प्रिमियम जास्त असेल तर पॉलिसीची साईज कमी करता येते.
तुम्हाला त्याबदल्यात टॉप-अप हेल्थ पॉलिसी खरेदी करता येते. हा आरोग्य विमा तुम्हाला स्वस्तात मिळेल. पण या नवीन टॉपअप पॉलिसीचा वेटिंग पिरियड 45 दिवसांच्या जवळपास असेल. तेवढा वेळ योजनेचा फायदा मिळणार नाही. विमा पॉलिसीतून अॅड ऑन्स दूर करा. त्यामुळे तुमचा प्रिमियम वाढतो.