एक खातं अनेक फायदे, PM Jan Dhan खातं उघडण्यासाठी ही कागदपत्रं आवश्यक, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आज आम्ही हे खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि त्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या आकर्षक योजनांची माहिती देणार आहोत. (PMJDY Pradhan Mantri Jan Dhan Yojana Eligibility Benefits all the details)

एक खातं अनेक फायदे, PM Jan Dhan खातं उघडण्यासाठी ही कागदपत्रं आवश्यक, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Jan Dhan Account
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 1:23 PM

मुंबई : प्रधानमंत्री जन धन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) ही एक योजना आहे ज्या अंतर्गत देशातील गरिबांचे खाते बँका, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील शून्य रुपयांच्या बॅलन्सवर उघडले जाते. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. आज आम्ही हे खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि त्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या आकर्षक योजनांची माहिती देणार आहोत. (PMJDY Pradhan Mantri Jan Dhan Yojana Eligibility Benefits all the details)

‘हे’ कागदपत्र आवश्यक

पंतप्रधान जनधन योजनेतंर्गत (PM Jan Dhan Yojana Documents) खाते सुरु करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, मतदार कार्ड, NREGA जॉब कार्ड, नाव, पत्ता आणि आधार क्रमांक नमूद असलेले प्राधिकरणाकडून जारी केलेले पत्र यांसह इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असणे गरजेचे आहे.

नवीन जनधन खाते उघडण्यासाठीची प्रक्रिया

जर तुम्हाला नवीन जनधन खाते उघडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. यात नाव, मोबाइल नंबर, बँक शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय/रोजगार, वार्षिक उत्पन्न आणि त्यावर अवलंबून असलेल्यांची संख्या, एसएसए कोड किंवा वॉर्ड क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड इत्यादी तपशीलवार माहिती द्यावी लागेल.

जुन्या खात्याचेही करता येईल रुपांतर

त्याशिवाय तुम्ही तुमचे जुने बँक अकाऊंटही जनधन खात्यात रुपांतर करता येते. यासाठी तुम्हाला बँक शाखेत भेट देऊन Rupey कार्डसाठी अर्ज करावा लागेल. एकदा हा फॉर्म मंजूर झाल्यावर आपले बँक खाते जन धन योजनेत ट्रान्सफर केले जाईल.

पंतप्रधान जनधन अकाऊंटची वैशिष्ट्ये (PM Jan Dhan Account Benefits)

1. हे खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा 2. जवळपास 2 लाखांपर्यंत अपघाती विमा संरक्षण 3. तसेच 30,000 रुपयांपर्यंत लाईफ कव्हर 4. ठेवीवरील व्याज 5. खात्यासह मोफत मोबाईल बँकिंगची सुविधा 6. रुपे डेबिट कार्डची सुविधा ज्यामुळे अकाऊंटमध्ये पैसे काढणे किंवा खरेदी करणे सोपे होते. 7. याद्वारे विमा, पेन्शनसारख्या योजना खरेदी करणे सोपे 8. पंतप्रधान किसान आणि श्रमयोगी मानधन यासारख्या योजनांमध्ये निवृत्ती वेतनासाठी खाते उघडण्याची सुविधा 9. देशभरात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी उत्तम सुविधा 10. शासकीय योजनांच्या फायद्याचे थेट पैसे खात्यात जमा होण्याची सुविधा

(PMJDY Pradhan Mantri Jan Dhan Yojana Eligibility Benefits all the details)

संबंधित बातम्या : 

ऑनलाईन व्यवहार करताना पैशांची फसवणूक झाली तर लगेच ‘या’ नंबरवर कॉल करा

नोकरदारांसाठी महत्वाची बातमी; सरकारच्या निर्णयामुळे PF खातेधारकांना होणार मोठा फायदा

सरकारच्या ‘या’ योजनेत महिन्याला फक्त 55 रुपये द्या आणि 36 हजार रुपये पेंशन मिळवा

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.