आता फोनद्वारे अवघ्या दहा मिनिटात उघडा SBI बँकेत अकाऊंट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआय (SBI) बँकेत तुम्ही आता मोबाईलच्या माध्यामातून सहजपणे अकाऊंट उघडू शकता.
मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआय (SBI) बँकेत तुम्ही आता मोबाईलच्या माध्यमातून सहजपणे अकाऊंट उघडू शकता. त्यामुळे आता तुम्हाला बँकाचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यामुळे आता तुम्ही घरबसल्या एका क्लिकवर बँकेत अकाऊंट उघडू शकता. विशेष म्हणजे या माध्यमातून तुम्हाला झिरो बॅलेन्स अकाऊंटही सुरु करण्याचा पर्यायही मिळतो. मात्र हे अकाऊंट नेमके कसे सुरु करता येईल, याची तुम्हाला माहिती देणार आहोत. (How to open SBI Account from mobile in few minutes)
जर तुम्ही मोबाईलवरुन खाते उघडल्यास त्यावेळी तुम्हाला अकाऊंट नंबर मिळतो. त्यासोबतच तुम्हाला नेट बँकिंगचीही सुविधाही त्वरित मिळते. तसेच एकदा खाते उघडल्यानंतर तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईटवर मिळते. तसेच त्या ठिकाणाहून तुम्हाला व्यवहारही करता येईल. विशेष म्हणजे हे अकाऊंट काही मिनिटात सुरु करता येत असून तुम्हाला त्यात व्यवहार करण्याची परवानगही मिळते.
मोबाईलवरुन कसे सुरु कराल अकाऊंट?
(1) सर्वप्रथम तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत YONO SBI अॅप डाऊनलोड करावे लागेल. या अॅपलिकेशनद्वारे तुम्हाला काही मिनिटात खाते सुरु करता येते. जर तुम्ही आधीच एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्हाला या अॅपद्वारे अनेक प्रकारचे व्यवहार करता येतात. जर नसेल तर तुम्हाला नवीन अकाऊंट सुरु करता येते.
(2) जर तुम्ही SBI चे ग्राहक नसाल तर तुम्हाला होम पेजवर एक ऑप्शन दिसेल त्या तुम्हाला New To SBI यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला होम लोन आणि ओपन अकाऊंटचा पर्याय दिसेल. त्यात तुम्ही ओपन अकाऊंट हा पर्यायावर क्लिक करा.
(3) यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे खाते उघडायचे आहे ते निवडणे आवश्यक आहे. म्हणजे डिजीटल बचत खाते, इंस्टा बचत खाते इत्यादी विविध ऑप्शन तुम्हाला दिसतील. तसेच त्या अकाऊंट संबंधित सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या पर्यायामध्ये दिले जातात. ज्यात तुम्हाला अनेक फायदेही देण्यात आले आहेत.
(4) यानुसार तुम्ही तुमच्या गरजेनुसार खाते निवडावे लागेल. यानंतर पुढे दिलेली प्रक्रियाही पूर्ण करावी लागेल. त्यात तुम्हाला दिलेली माहिती भरावी लागेल. यात दिलेली माहिती, फोटो आणि दस्ताऐवज अपलोड करावे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळील शाखा निवडावी लागेल.
(5) यानंतर तुम्हाला तुमच्या एका अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन ते अॅक्टिव करावे लागेल. ही वेबसाईट सुरु करतेवेळी तुम्हाला नवीन युजर्सचा ऑप्शन क्लिक करावा लागेल. त्यात दिलेली माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्ही नोंदणी करुन लॉग इन करु शकता. यानंतर तुम्हाला इंटरनेट बँकिंगचीही सुविधा मिळेल.
जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत, पण राहतो जेमतेम 375 स्क्वेअर फूट घरात, पाहा फोटो#ElonMusk #elonMuskHome #Musk https://t.co/ZlwRHMC5OY
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 8, 2021
(How to open SBI Account from mobile in few minutes)
संबंधित बातम्या :
SBI जनरल इन्शुरन्सची नवी योजना लाँच, ‘या’ सुविधांसह 5 कोटींचं मिळणार कव्हरेज
LIC ची भन्नाट पॉलिसी, दर दिवसाला 60 रुपयांची बचत करा, 6 लाख रुपये मिळवा