EPFO : सहन करु नका मनस्ताप, ईपीएफओवर तक्रार करा बिनधास्त

EPFO : ईपीएफओशी संबंधित एखाद्या सेवेत त्रुटी असेल तर तुम्हाला तक्रार दाखल करता येते.

EPFO : सहन करु नका मनस्ताप, ईपीएफओवर तक्रार करा बिनधास्त
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 8:27 PM

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना सेवेतील त्रुटी अथवा एखाद्या समस्येबाबत तक्रार दाखल करता येते. सदस्यांना खात्यासंबंधी काही अडचण असल्यास, माहिती हवी असल्यास तक्रार दाखल (Registered the Complaint) करता येते. त्यासाठी सदस्यांना तक्रार निवारण प्रणालीचा वापर करता येतो. नोकरदार वर्गासाठी भारतात ईपीएफओ (EPFO) ही मोठी संस्था कार्यरत आहे. यामाध्यमातून कर्मचाऱ्यांच्या वर्तमान आणि भविष्यातील आर्थिक रक्कमेचे व्यवस्थापन करण्यात येते. पेन्शन मिळण्यासाठी सदस्यांना (Members) मोठी मदत मिळते.

ईपीएफओ कर्मचाऱ्यांना त्यांची तक्रार दाखल करण्यासाठी एक पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. EPFIGMS या पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदविता येते. या पोर्टलवर सदस्यांना EPFO शी संबंधित कोणतीही तक्रार देता येते. तसेच तक्रारीची सद्यस्थितीही तपासता येते.

या EPFIGMS पोर्टलच्या माध्यमातून सदस्याला दिल्लीतील आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधता येतो. या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून तक्रार दाखल करता येते. या पोर्टलच्या माध्यमातून तक्रारकर्त्याला त्याच्या तक्रारीचे काय झाले, त्यासंबंधी काय कार्यवाही सुरु आहे, याचे स्टेट्स कळते. माहिती मिळते.

हे सुद्धा वाचा

कोणताही ईपीएफ सदस्य या पोर्टलच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतो. ईपीएफ पेन्शर्स, इतर सदस्यांना तक्रार दाखल करता येते. त्यासाठी काय स्टेप फॉलो कराव्या लागतील. त्याआधारे तुम्हाला तक्रार दाखल करता येईल.  त्या तक्रारीवर काय झाले याची माहिती घेता येईल.

सर्वात अगोदर EPF i-grievance Management System वर जाण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर (https://epfigms.gov.in/) रजिस्ट्रेशन ग्रीव्हेन्सवर क्लिक करावे लागेल. तुमचा युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक टाकावा लागेल. सुरक्षा कोड टाकावा लागेल. Get Detail वर क्लिक करावे लागेल. ओटीपी सबमिट करावा लागेल. व्हेरिफिकेशन मॅसेजवर क्लिक करुन पुढील प्रक्रिया सुरु करावी लागेल.

त्यानंतर सदस्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. ग्रीव्हेन्स डिटेलवर पीएफ खात्याच्या क्रमांकावर क्लिक कार. त्यानंतर कोणत्या प्रकारची तक्रार आहे, ते निवडा. अटॅच बटनावर क्लिक करा. त्यानंतर अॅड बटनवर क्लिक करा. तुमच्या तक्रारीची फाईल अपलोड करा. ही तक्रार सबमिट करा.

तुमची तक्रार सबमिट झाल्यावर त्यासंबंधीची माहिती तुम्हाला नोंदणीकृत ईृ-मेल आणि टेक्स मॅसेजमार्फत मिळेल. त्यानंतर तुमच्या तक्रारीची काय दखल घेण्यात आली. तिची सद्यस्थिती काय आहे हे तपासता येते.

https://epfigms.gov.in या संकेतस्थळावर जाऊन व्हीयू स्टेटस बटनवर क्लिक करा. त्यावर रजिस्ट्रेशन क्रमांक टाका आणि सबमिट बटन दाबा. तुमच्या तक्रारीची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती मिळेल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.