दही कसे जमवावे ? जाणून घ्या हिवाळ्यात दही बनवण्याचे ‘हे’ 3 स्मार्ट उपाय

हिवाळ्यात दही सेट करणे सोपे नसते. जसजसे तापमान कमी होते तितके गोठणे कठीण होते. अशावेळी जाणून घ्या हिवाळ्यात दही बनवण्याच्या झटपट टिप्स.

दही कसे जमवावे ? जाणून घ्या हिवाळ्यात दही बनवण्याचे 'हे' 3 स्मार्ट उपाय
curd
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 1:57 PM

दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात जे अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्यासोबतच दही जेवणाची चवही वाढवते. यामुळेच बहुतेक लोक जेवणात दही घेण्यास प्राधान्य देतात. अश्यातच हिवाळ्यात दही सेट करणं फारसं सोपं नसतं. कारण या दिवसांमध्ये जसजसे तापमान कमी होते, तसे दही तयार करणे अवघड होऊन बसते. अशावेळी जर तुम्ही काही स्मार्ट पद्धतींचा अवलंब केला तर हिवाळ्यात तुम्ही दही सहज गोठवू शकाल. कोणत्या आहेत या टिप्स जाणून घेऊयात.

हिरव्या मिरचीबरोबर दही करा सेट

हिवाळ्यात दहीसाठी ही पद्धत अतिशय प्रभावीपणे काम करू शकते. यासाठी आधी दूध चांगले उकळवून घ्या. यानंतर तुम्ही ज्या भांड्यात दही तयार करणार आहेत त्या भांड्यात दूध ठेवा. यानंतर दूध काढलेल्या भांड्यात दोन चमचे दही टाकून चांगले फेटून घ्या,त्यानंतर वर हिरवी मिरची घालून उबदार जागी ठेवावी. किंवा तुम्ही दही तयार करणाऱ्या भांड्याला उबदार कपड्याने बांधून ठेवा. अशा पद्धतीने हिवाळ्यात सुद्धा दही घट्ट तयार होईल.

ओव्हनमध्ये दही करा सेट

ओव्हनमध्ये तुम्ही दही बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम मातीच्या भांड्यात गरम केलेले दूध कोमट झाल्यावर त्यात काढून घ्या . त्यांनतर त्या दुधात दोन ते तीन चमचे दही घालून चांगले फेटून घ्या. आता या मातीच्या भांड्याला वरच्या भागाला फॉइल पेपरने झाकून ओव्हनमध्ये ८० अंश सेंटीग्रेडवर ३० मिनिटे ठेवावा. मग ते काढून तपासून घ्या. दही गोठले असेल तर फ्रीजमध्ये ठेवा आणि दही खाण्यास तयार होईल.

कुकरमध्ये दही करा सेट

कुकरमध्येही तुम्ही दही सहज सेट करू शकता. यासाठी कोमट दूध ठेवून त्यात दही घालून छान फेटून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये हे दूध काढून त्यावर ॲल्युमिनियम फॉइल लावा. यानंतर कुकुरमध्ये थोडे पाणी घालून त्यात दही तयार करण्यासाठी तयार केलेलं दूध नीट ठेवा. त्यानंतर कुकरची शिट्टी काढून तुम्ही अंदाजे काही मिनिटं हे मिश्रण वाफेवर ठेवा. त्यानंतर कुकर बंद करा. मग कुकर थंड होताच दही काढा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे दही सहज तयार होईल.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.