तुम्ही डेबिट कार्ड वापरता?; मग घ्या ‘ही’ काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक

डेबिट कार्डने आर्थिक व्यवहारात  क्रांती आणली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. डेबिट कार्डमुळे आर्थिक देवाण, घेवाण सोपी झाली, तसेच जवळ पैसे बाळगण्याची देखील आवश्यकता राहिली नाही. मात्र डेबिट कार्डचा वापर करताना काळजी घ्यावी लागते, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

तुम्ही डेबिट कार्ड वापरता?; मग घ्या 'ही' काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 6:15 AM

नवी दिल्ली : डेबिट कार्डने आर्थिक व्यवहारात  क्रांती आणली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. डेबिट कार्डमुळे आर्थिक देवाण, घेवाण सोपी झाली, तसेच जवळ पैसे बाळगण्याची देखील आवश्यकता राहिली नाही. डेबिट कार्डमुळे कुठल्याही जवळच्या एटीएममधून आपल्याला क्षणात पैसे मिळू शकतात. मात्र डेबिट कार्डचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. डेबिटच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना गंडा घातला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. फसवणूक टाळून डेबिटच्या माध्यमातून कसा अधिकाधिक सुरक्षीत व्यवहार करता येईल हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

एटीएममधून पैसे काढताना काय काळजी घ्याल?

जेव्हा तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाता, तेव्हा ते मशिन आधी व्यवस्थित तपासून घ्या, एटीएम पीन टाकताना तुमच्या  जवळपास कोणी नाहीना? याची खात्री करा. तसेच पीन टाकताना एटीएम मशीन व्यवस्थित कव्हर करा. जर तुम्ही पहिल्यांदाच डेबिट कार्डचा वापर करत असाल आणि तुम्हाला ते वापरण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्यास इतरांची मदत घेऊ नका. कारण त्यातून अनेकवेळा तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. तुम्ही जेव्हा एटीएममधून पैसे काढता, तेव्हा प्रत्येकवेळी तुम्हाला पैसे कपातीचा एक एसएमएस किंवा मेल येतो, तो चेक करून आपण जेवढे पैसे काढले आहेत,  तेवढेच खात्यामधून कमी झाले आहेत का? याची खात्री करून घ्या. तुम्ही डेबिट कार्डच्या मदतीने कुठलाही व्यवहार केला नाही, मात्र तरी देखील तुमचे पैसे कमी झाल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा.

ऑनलाईन खरेदी करताना घ्यावी खबरदारी

तुम्ही जेव्हा एखाद्या ऑनलाईन साईटवरून एखाद्या वस्तुची खरेदी करता, तेव्हा तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी डेबीट कार्डची माहिती द्यावी लागते. अशा वेळी सर्व गोष्टी लक्षपूर्वक वाचूनच माहिती द्यावी. तुमच्या एटीएमचा पिन किंवा मोबाईलमध्ये आलेल्या ओटीपीची मागणी बँकेकडून कधीही केली जात नाही, तेव्हा अशाप्रकारचा ओटीपी कोणालीही शेअर करू नये. सोबतच तुम्ही एखाद्या ठिकाणी खरेदी केल्यानंतर जर तुमचे डेबिट कार्ड स्वॅप करणार असला तर तिथे देखील योग्य ती काळजी घ्यावी, आपल्याला पीन टाकताना कोणी पाहात तर नाहीना याची खात्री करूनच मग पीन टाकावा.  तसेच आपल्या बँक खात्यावर काही चुकीचे किंवा शंकास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने संबंधित बँकेशी संपर्क साधावा.

संबंधित बातम्या

महिन्याभरात 21 पटीने वाढले कॉफीचे दर; जाणून घ्या काय आहेत भाव वाढीमागील कारणे?

गुड न्यूज! पुढील वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 9 टक्के राहण्याचा अंदाज

‘टाटा’ची वाहाने महागणार; एक जानेवारीपासून नवे दर लागू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.