PF withdrawal rule: पीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; जाणून घ्या कसे मिळवाल पैसे?

PF account | आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही. केवळ एक विनंतीचा अर्ज सादर करून तुम्ही हे पैसे मिळवू शकता.

PF withdrawal rule: पीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; जाणून घ्या कसे मिळवाल पैसे?
पीएफ अकाऊंट
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 9:41 AM

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. नोकऱ्या कशाबशा वाचलेले कर्मचारीही वाढीव खर्चामुळे मेटाकुटीस आले आहेत. अशावेळी कोरोना किंवा अन्य कोणत्या आजारामुळे रुग्णालयात दाखल व्हायची वेळ आली तर हा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न उभा राहतो. यासाठी आता भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे. त्यामुळे पीएफधारक कोणत्याही कागदपत्रांशिवाय आपल्या खात्यातून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतो.

तुम्ही आता आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही. केवळ एक विनंतीचा अर्ज सादर करून तुम्ही हे पैसे मिळवू शकता. या अर्जात आजार आणि रुग्णालयाची संपूर्ण माहिती नमूद करावी लागेल. पीएफ खातेधारक स्वत:साठी आणि कुटुंबातील व्यक्तींसाठी पैसे घेऊ शकतो. यापूर्वी रुग्णालयाचे बिल दाखवल्यानंतरच पीएफ खात्यामधून आगाऊ रक्कम काढता येत होती. मात्र, आता केवळ एक अर्ज दिल्यानंतर काही तासांमध्ये तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. या सुविधेमुळे पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रक्कम किती दिवसांत मिळणार?

तुम्ही अर्ज केल्यानंतर एक ते दोन दिवसांत ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. ही रक्कम तुमच्या सॅलरी अकाऊंट किंवा संबंधित रुग्णालयाच्या खात्यात थेट जमा होईल. त्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर 45 दिवसांच्या आतमध्ये कर्मचाऱ्याला बिल जमा करावे लागेल. तुम्ही काढलेला हा Advance तुम्हाला शेवटी मिळणाऱ्या रक्कमेतून कापला जाईल.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया

* सर्वप्रथम www.epfindia.gov.in या संकेतस्थळावर जावे. * संकेतस्थळावर गेल्यानंतर क्लेम (फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी) भरावा. * याठिकाणी आपल्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाकून व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी. * प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेम या पर्यायवर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्यासमोर एक ड्रॉपडाऊन मेन्यू येईल. त्यामध्ये Advacne (Form 31) हा पर्याय निवडावा. * Form 31 भरताना तुम्हाला पैसे काढण्याचे कारण नमूद करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला किती रक्कम हवी आहे, तेदेखील नमूद करावे. तसेच आपल्या बँकेच्या चेकची स्कॅन कॉपी आणि पत्ता फॉर्ममध्ये नमूद करावा. * यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा क्लेम फाईल होईल.

संबंधित बातम्या:

PF मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधार-पॅन, असे करा अपडेट

आता यूएएनशिवाय जाणून घ्या पीएफ खात्यातील शिल्लक, ही आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.