EPFO : काळजी करु नका, कुठे ही पळून जाणार नाही तुमचा पैसा ! वारसदाराचे नाव नसले तरी अशी काढा रक्कम

EPFO : कर्मचाऱ्याची चूक त्याच्या वारसदारांना भोगावी लागत नाही. कागदपत्रांसाठी थोडी फरफट होते, पण खात्यातील रक्कम मिळविता येते...

EPFO : काळजी करु नका, कुठे ही पळून जाणार नाही तुमचा पैसा ! वारसदाराचे नाव नसले तरी अशी काढा रक्कम
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 5:37 PM

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ही अनेक बचतींपैकी एक लोकप्रिय योजना आहे. ईपीएफओ ही योजना नियंत्रीत करते. कर्मचारी आणि नियोक्ता, कंपनी हे दोन्ही मूळ वेतन आणि महागाई भत्त्याचा 12 टक्के रक्कम योगदान देते. ईपीएफओ गुंतवणुकीवर सध्या सर्वाधिक व्याज देते. या योजनेला केंद्र सरकारचे संरक्षण आहे. केंद्र सरकार या योजनेची हमी घेते. कर्मचाऱ्याच्या एकूण योगदानापैकी 8.33 टक्के कर्मचारी निवृत्ती योजनेत (EPS) जमा होते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू ओढवला तर त्याच्या कुटुंबियांना ही रक्कम देण्यात येते. वारसदार अथवा नामनिर्देशित व्यक्तीला ही रक्कम सोपविण्यात येते. जर वारसदाराचे नाव नसेल तर मग ही रक्कम कशी मिळविता येते?

अशी काढता येते रक्कम एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदार EPF मधील रक्कम काढू शकतो. पण जर नामनिर्दशीत व्यक्ती अथवा वारसदारांची नोंदणी झाली नसल्यास मग काय करता येईल? ही रक्कम बुडीत खात्यात जमा होते का? तर नाही. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या वारसांना मिळते. त्यासाठी काही कागदी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. कधी कधी न्यायालयातून त्यासाठीचा हुकूमनामा आणवा लागतो.

  1. सर्वात अगोदर फॉर्म 20 मध्ये ईपीएफ सदस्य आणि रक्कमेवर दावा सांगणाऱ्यांनी तपशीलवार माहिती द्यावी
  2. अर्ज जमा केल्यानंतर दाव्याच्या स्थितीविषयी एसएमएसद्वारे अपडेट अलर्ट देण्यात येतो
  3. हे सुद्धा वाचा
  4. तुमच्या अर्जाची सध्यस्थितीविषयी ईपीएफओच्या वेबसाईटवर गेल्यास माहिती मिळते
  5. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि दावा मंजूर झाल्यावर वारसदाराला मयत कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यातील रक्कम देण्यात येते. ही रक्कम वारसदाराच्या बँक खात्यात थेट जमा होते
  6. हा अर्ज तुम्हाला नियोक्त्या, कंपनीच्या मार्फत करावा लागतो. ज्या ठिकाणी कर्मचारी काम करत होता. त्या कंपनीतून हा अर्ज ईपीएफओम कार्यालयाकडे पाठवावा लागतो

फॉर्म 20 सोबत लागतील हे कागदपत्रे

  1. ईपीएफ कर्मचाऱ्याचे मृत्य प्रमाणपत्र
  2. पालकत्वाचे, वारसदार असल्याचे प्रमाणपत्र
  3. रद्द केलेल्या धनादेशाची प्रत
  4. फॉर्म 5 (आयएफ) कर्मचारी विमा योजनेशी संलग्नित हा अर्ज तपशीलवार भरावा लागेल
  5. मृत्यूवेळी नियोक्त्याने कर्मचाऱ्याला ईडीएलआय योजनेतंर्गत सवलत दिली नसल्यास त्याची माहिती
  6. दावेदार पति/पत्नी 25 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर आणि मयतावर त्याचे आई-वडिल पण अवलंबून असतील तर त्यांना पेन्शनसाठी फॉर्म 10डी जमा करावा लागेल
  7. रक्कम काढण्यासाठी सर्वात शेवटी फॉर्म 10सी जमा करावा लागेल. ईपीएफ सदस्याचे वय 58 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि त्या तारखेपर्यंत त्याने 10 वर्षांची सेवा बजावली नसेल तर हा फॉर्म भरावा लागतो

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.