पेन्शन सुरु राहण्यासाठी गरजेचे असणारे लाईफ सर्टिफिकेट आता घरबसल्या बँकेला पाठवा

Pension life certificate | नाममात्र शुल्क भरल्यानंतर आता पेन्शनधारक ऑनलाईन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवेसाठी विनंती करु शकतात. यानंतर जवळच्या टपाल कार्यालयातील एक पोस्टमन पेन्शनधारकाच्या घरी जाईल आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.

पेन्शन सुरु राहण्यासाठी गरजेचे असणारे लाईफ सर्टिफिकेट आता घरबसल्या बँकेला पाठवा
पेन्शन
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 7:53 AM

मुंबई: दरवर्षी बँकेत जाऊन आपण जिवंत असल्याचे प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करणे, हा पेन्शनधारकांसाठी नेहमीचा शिरस्ता मानला जातो. मात्र, त्यासाठी पेन्शनधारकांना बँकेत अनेक खेटे मारावे लागतात. एवढे करूनही हे काम यशस्वी होईल, याचीही खात्री नसते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत आपल्या हयातीचा दाखला बँकेत सादर करावा लागतो. मात्र, आता हा जिवंत असल्याचा दाखला तुम्हाला घरबसल्या बँकेला पाठवता येऊ शकतो.

नाममात्र शुल्क भरल्यानंतर आता पेन्शनधारक ऑनलाईन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवेसाठी विनंती करु शकतात. यानंतर जवळच्या टपाल कार्यालयातील एक पोस्टमन पेन्शनधारकाच्या घरी जाईल आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल. याचा फायदा ईपीएफओमध्ये उपस्थित असलेल्या साडेतीन लाख पेन्शनधारकांना होईल. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आणि वृद्ध लोकांना कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन, ईपीएफओने हा निर्णय घेतला होता. निवृत्तीवेतन कल्याण विभागाने 20 सप्टेंबर 2021 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, निवृत्तीवेतनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका किंवा टपाल खात्याची डोअरस्टेप सेवा वापरून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ग्राहकांसाठी डोअरस्टेप सुविधा आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक यांचा समावेश आहे.

आपल्या जवळच्या टपाल कार्यालयातून दाखला मिळवा

इंडिया पोस्टच्या घोषणेनंतर पेन्शनभोगी पेन्शन वितरण एजन्सीऐवजी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्याने सेवा बजावली आहे, त्या प्राधिकरणाकडे जाऊ शकते. भविष्यात पेन्शन मिळविणे सुरू ठेवण्यासाठी त्याचा हयातीचा दाखला मिळवू शकेल. ज्या निवृत्तीवेतनधारकांना पोस्ट ऑफिस किंवा पेन्शन वितरण एजन्सीकडे जाण्यास अडचण येते, ते डिजिटल हयातीचा दाखला घेण्यासाठी जवळच्या जीवन प्रमाणपत्र केंद्राला भेट देऊ शकतात.

कसा बनवाल हयातीचा दाखला

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट हल्ली उमंग अॅपद्वारेदेखील बनवता येतं. यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये उमंग अॅप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर त्याच्यावर हयातीचा दाखला शोधलं असता, तुम्हाला ‘जनरेट लाइफ सर्टिफिकेट’ असा पर्याय दिसेल. तो निवडल्यानंतर पेन्शनर ऑथेंटिकेशनसाठी पेज उघडेल. यामध्ये विचारलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला डिजिटल लाईफ प्रमाणपत्र मिळू शकतं.

संबंधित बातम्या:

पेन्शनधारकांचं टेन्शन दूर, आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार पेन्शनशी संबंधित माहिती

Pension Alert | पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! आता घरबसल्या घेता येणार ‘या’ सुविधेचा फायदा!

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! पैसे मिळाले नाही किंवा इतर समस्येसाठी ‘इथे’ करा तक्रार

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.