तुम्ही ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरता ? तुमच्यासाठी आहे मोठी बातमी, वेळेवर परतावा केला नाही तर भरावा लागणार दंड
नववर्षात अनेक क्रेडिट कार्ड धारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे कारण की आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने कॅश काढल्यावर कमीतकमी 500 रुपये चार्ज आकारला जाईल. हा चार्ज 20,000 रुपयांपर्यंत कॅश काढल्यावर लागू होईल.
मुंबई : कोरोना महामारीनंतर क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर फार वाढला आहे. फेस्टिवल सिझनमध्ये तर मोठ्या प्रमाणात या कार्डाच्या माध्यमातून खरेदी होत असते, जवळपास फेस्टिवल सीजन दरम्यान होणारी खरेदी एक लाख कोटींच्या पार गेल्याचे समोर आले आहे. अगदी सहज रीतीने या कार्ड मार्फत खरेदी करता येत असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात याचा वापर करतात. अगदी सोप्या पद्धतीने शॉपिंग करता येते, मात्र जेव्हा याचे बिल(Credit Card Bill) भरण्याची वेळ येते किंवा त्याच्यात चूक होते तर मोठा दंड त्या बदल्यात आपल्या कडून आकारला जाऊ शकतो. जर तुम्ही सुद्धा आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला ही 10 फेब्रुवारीनंतर भरल्या जाणाऱ्या पेमेंटवर अधिक दंड आकारला जाईल.
देशातील मोठ्या खाजगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) क्रेडिट कार्डच्या चार्जमध्ये बदल केले आहेत. याशिवाय क्रेडिट कार्डने कॅश काढणे सुद्धा आता महागडे झाले आहे. नवे दर 10 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहेत. बँकेने एमराल्ड सोडून सर्व प्रकारच्या कार्डसाठी विलंब शुल्कबाबत विचार केला आहे.
किती चार्ज लागेल
लाइव्ह मिंटने दिलेल्या रिपोर्टनुसार आता सगळ्या कॅश ॲडव्हान्ससाठी बँक सर्व प्रकारच्या कार्डवर 2.50 टक्के ट्रांजेक्शन फी आकारणार आहे, जे कमीत कमी 500 रुपये असेल. चेक आणि ऑटो डेबिट पेमेंट फेल झाल्यावर बँकेने एकूण रकमेच्या 2% (कमीतकमी 500 रुपये) चार्ज निर्धारित केला आहे.
100 रुपयांपर्यंत कोणतीही लेट फी नाही, मात्र एकूण थकबाकी 100 रुपयांपेक्षा कमी असल्यास कोणत्याही प्रकारचा विलंब शुल्क लागणार नाही. 100 रुपयांपासून पाचशे रुपये पर्यंत थकबाकी असल्यास 100 रुपये चार्ज आकारला जाईल तर 501 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत थकबाकी असल्यास 500 रुपये लेट फी च्या रूपात द्यावे लागतील.
जर तुमच्या क्रेडिट कार्डची 10 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असेल तर 750 रुपये आणि 25 हजार रुपयांपर्यंत रुपये असेल तर 900 रुपये चार्ज भरावा लागेल. याशिवाय 50 हजार रुपयांपर्यंत एक हजार रुपये आणि 50 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास बाराशे रुपये लेट्सी च्या स्वरूपात तुमच्याकडून आकारले जाईल तसेच ग्राहकांच्या बचत खात्यातून पन्नास रुपये प्लस जीएसटी डेबिट केले जाईल.
क्रेडिट कार्डने कॅश काढल्यावर सुद्धा चार्ज
आकारला जाईल. यासोबतच आयसीआयसीआय बँकेचे (ICICI BANK) क्रेडिट कार्डने कॅश काढल्यावर कमीत-कमी 500 रुपयांचा चार्ज आकारला जाईल. हा चार्ज 20 हजार रुपयांपर्यंतची कॅश काढल्यावर लागू होईल. यापेक्षा जास्त रक्कम काढल्यावर 2.5 टक्क्यांच्या हिशोबाने दंड आकारला जाईल. चेक रिटर्न फेल झाल्यावर कमीत कमी 500 रुपये दंड आकारल जाईल.
टॅक्स जमा करण्याची सुविधा
याआधी, बँकेने आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना नवीन सुविधा दिली होती. बँकेचे ग्राहक (Custom Duty) सीमा शुल्काचा ऑनलाईन भरणा करू शकतो. कॉर्पोरेट ग्राहक बँकेच्या कॉर्पाोरेट इंटरनेट बैंकिंग (सीआईबी) आणि मोबाइल बैंकिंग ऐप इंस्टाबिजच्या माध्यमातून सीमा शुल्काचा भरणा करू शकतो. तर रिटेल ग्राहक ग्राहक बँकेच्या इंटरनेट बैंकिंग प्लेटफॉर्मच्या माध्यमातून असे करू शकता.
संबंधित बातम्या :
Electric Vehicle : AMO इलेक्ट्रिकचे 10 कोटी डॉलर उभारण्याचे नियोजन; वित्तीय कंपन्यांशी चर्चा सुरू
Mukesh Ambani | मुकेश अंबानींनी खरेदी केला न्यूयॉर्कमधील लग्झरी हॉटेल; किंमत वाचून व्हालं थक्क!