ICICI बँकेचं ‘डिजिटल’ पाऊल: कस्टम ड्युटी ऑनलाईन, घरबसल्या करा पेमेंट!
सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) हा वस्तूंच्या आयात-निर्यातीवर आकारण्यात येणारा कर आहे. सीमा शुल्क वस्तूंच्या आयात-निर्यात दोन्ही व्यापारावर आकारले जातात. केंद्रातील महसूलाच्या गंगाजळीत सीमा शुल्काने मोठी भर पडत असते. सध्या भारतात स्मार्टफोन्स वर 29.8%, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 26.85% तसेच सोने आणि चांदीवर 7.5% इतके निर्यात शुल्क आकारले जाते.
नवी दिल्ली- खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आयसीआयसीआयने नव्या सेवेला आरंभ केला आहे. रिटेल आणि कॉर्पोरेट ग्राहक घरबसल्या सहजपणे सीमा शुल्क (Custom Duty) देय करू शकतात. कॉर्पोरेट ग्राहक बँकेच्या कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग (सीआयबी) आणि मोबाईल बँकिंग प्रणालीद्वारे सीमा शुल्क भरू शकतात. तसेच ग्राहकांना भारतीय सीमा शुल्क इलेक्ट्रॉनिक गेटवे (IECEGATY) वेबसाईटवरुन बँकांच्या सूचीतून आयसीआयसीआय बँकेची निवड करून ऑनलाईन देयक करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
सीमा शुल्क म्हणजे काय?
सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) हा वस्तूंच्या आयात-निर्यातीवर आकारण्यात येणारा कर आहे. सीमा शुल्क वस्तूंच्या आयात-निर्यात दोन्ही व्यापारावर आकारले जातात. केंद्रातील महसूलाच्या गंगाजळीत सीमा शुल्काने मोठी भर पडत असते. सध्या भारतात स्मार्टफोन्स वर 29.8%, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 26.85% तसेच सोने आणि चांदीवर 7.5% इतके निर्यात शुल्क आकारले जाते. केंद्र सरकारकडून आढावा घेऊन वित्तीय वर्षात सीमा शुल्काची फेररचना केली जाते.
सीमा शुल्काचे डिजिटल पेमेंट:
भारतीय सीमा शुल्क इलेक्ट्रॉनिक गेटवे वेबसाईट https://epayment.icegate.gov.in/epayment/locationAction.action वर जा.
ड्रॉप डाउन मेन्यूमधून ‘डॉक्युमेंट प्रकार’ आणि ‘लोकेशन कोड’ निवडा.
आयात-निर्यात कोड (आयईसी) एन्टर करा.
पेमेंट करण्यासाठी बँकांच्या यादीतून ‘आयसीआयसीआय’ बँकेची निवड करा
इंटरनेट बँकिंगवर लॉग-इन करा आणि पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा.
नव्या युगाची अग्रणी बँक:
आयसीआयसीआय बँकेचा ग्राहकांसाठी नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीवर भर राहिला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाचे आयसीआयसीआय बँकेने आभार व्यक्त केले आहे. ग्राहकांना सुलभ व त्रासरहित डिजिटल पेमेंटचा सक्षम पर्याय उपलब्ध झाल आहे. ग्राहकांच्या हितासाठी तंत्रज्ञानाच्या विपुल वापरातून आयसीआयसीआय नव्या युगाची अग्रणी बँक ठरणार असल्याचा विश्वास ट्रान्झॅक्शन बँकिंगचे हितेश सेठिया यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा: ‘नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला’, चंद्रकांत पाटलांचा इशारा
लॉकडाऊन नाही पण निर्बंध, राज्यात नवे नियम काय? वाचा सविस्तर
Video : तुम्ही कधी घोड्याला रडताना पाहिलंय का? रडणारा घोडा व्हायरल