नौदलाच्या सैनिकांसाठी ‘या’ बँकेची खास योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Indian Navy IDFC | 'ऑनर फर्स्ट' खातेधारकांना विनामूल्य आणि वर्धित असा 46 लाख रुपयांचे व्यक्तिगत दुर्घटना विमा कव्हर मिळते, ज्यामध्ये ऑन-ड्यूटी आणि ऑफ-ड्यूटी या दोन्हीप्रकारच्या घटना/दुर्घटनांचा समावेश आहे.
मुंबई: IDFC FIRST बँकेने भारतीय नौदलासोबत एका सामंजस्य करारावर (एमओयू) सही करण्याची घोषणा केली आहे. यानुसार भारतीय नौदलामध्ये सेवारत असलेल्या व्यक्तींसाठी आणि सेवानिवृत्त सैनिकांसाठी ‘ऑनर फर्स्ट’ ही प्रीमियम बँकिंग सेवा पुरवली जाईल.’ऑनर फर्स्ट’ डिफेन्स अकाउंट हे सशस्त्र सेनेतील व्यक्ती आणि त्यामधील सेवानिवृत्त सैनिक यांच्या आवश्यकता लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. ‘ऑनर फर्स्ट’ च्या खातेधारकांच्या सहयोगासाठी सेवानिवृत्त सैनिकांची एक समर्पित टीम आहे. ‘ऑनर फर्स्ट’ साठी तयार केलेल्या सामंजस्य करारावर भारतीय नौदलाचे कोमोडोर – वेतन आणि भत्ता चे कोमोडोर नीरज मल्होत्रा आणि IDFC FIRST बँकचे वरिष्ठ अधिकारी यांनी नवी दिल्ली येथील नौदल मुख्यालयामध्ये सह्या केल्या.
भारतीय नौदलाचे कोमोडोर – वेतन आणि भत्ताचे कोमोडोर नीरज मल्होत्रा म्हणाले, “मी भारतीय नौदल आणि त्यामध्ये सेवारत असलेल्या व्यक्तींसाठी कस्टमाइझ केलेल्या बँकिंग सेवा पुरवण्याबाबत IDFC FIRST बँकने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करतो.”याप्रसंगी IDFC FIRST बैंकच्या रीटेल लायबिलिटीज चे प्रमुख अमित कुमार म्हणाले, “हा आमच्यासाठी एक गौरवाचा क्षण आहे. भारतीय नौदलाशी जोडले जाण्याचा यापेक्षा चांगला क्षण कोणता असू शकला असता, कारण आता भारतीय नौदल १९७१ च्या युद्धातील भारताच्या ऐतिहासिक विजयचा ५० वा वर्धापनदिन साजरा करत आहे. आम्ही आपल्या सुप्रतिष्ठित भारतीय नौदलाच्या बँकिंगसंबंधित आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध आहोत कारण ते आपल्या देशाच्या समुद्र सीमांचे रक्षण करतात. हा सहयोग बँकिंगसंबंधित असलेल्या आमच्या ‘सर्वात आधी देश’ या दृष्टिकोनामध्ये समाविष्ट आहे आणि तो सशस्त्र सेनेच्या आवश्यकतांची पूर्तता करण्याबाबत असलेल्या आमच्या दीर्घकालीन कटिबद्धतेचा पुनरुच्चार करतो.” ‘ऑनर फर्स्ट’ डिफेन्स अकाउंट च्या अंतर्गत विशेषाधिकार आणि सुविधांचा समावेश केला आहे. जसे की, 5 टक्के व्याज मिळणारे झिरो बॅलन्स वेतन खाते आणि आणखी चांगला युजर इंटरफेस व अनुभव देणारे नेट बँकिंग आणि ॲप.
46 लाखांचा इन्शुरन्स कव्हर
‘ऑनर फर्स्ट’ खातेधारकांना विनामूल्य आणि वर्धित असा 46 लाख रुपयांचे व्यक्तिगत दुर्घटना विमा कव्हर मिळते, ज्यामध्ये ऑन-ड्यूटी आणि ऑफ-ड्यूटी या दोन्हीप्रकारच्या घटना/दुर्घटनांचा समावेश आहे. यामध्ये फक्त आकस्मित किंवा दुर्घटनेमुळे होणाऱ्या मृत्यूचा समावेश नसून, संपूर्ण किंवा आंशिक कायमस्वरूपी विकलांगता यांचाही समावेश आहे. या वैयक्तिक दुर्घटना विमा कव्हरमध्ये मुलांसाठी 4 लाखांचा शैक्षणिक अनुदान निधी आणि लग्नाच्या कव्हरसाठी दोन लाखांचा निधीदेखील समाविष्ट आहे.
याशिवाय, या स्तरावरील इतर सर्वश्रेष्ठ सुविधांमध्ये कोणतेही वार्षिक शुल्क नसलेल्या टॉप-ऑफ-द-लाइन व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्डचा समावेश आहे, 1 कोटी रुपयांचे विनामूल्य हवाई अपघात विमा संरक्षण आणि डोमेस्टिक विमानतळावर तीन महिन्यांमध्ये दोनदा कॉम्प्लिमेंटरी एयरपोर्ट लाउंज वापरण्याची सुविधासुद्धा मिळेल.
‘ऑनर फर्स्ट’ डिफेन्स अकाउंट कार्ड हरवल्यास, हरवलेल्या कार्डचे विनामूल्य दायित्व आणि दरोडा, चोरी यांसाठी फसवणूकीसाठीचे ६ लाखांचे व खरेदीच्या तारखेपासून 90 दिवसांमध्ये झालेल्या नुकसानासाठी एका लाख रुपयांपर्यंत संरक्षण पुरवते.
‘ऑनर फर्स्ट’ चे खातेधारक व्हेरिएबल एपीआर आणि 10X रिवॉर्ड पॉइंट्स सोबट ‘फ्री फॉर लाइफ क्रेडिट कार्ड’ साठी पात्र असतील, 1.5% फॉरेक्स मार्कअप, डोमेस्टिक किंवा अंतरराष्ट्रीय विमानतळांवर निवडक स्पा आणि लाउंजचा कॉम्प्लिमेंटरी ॲक्सेस, प्रवासाचा विमा यांसोबतच आणखी इतर बरेच लाभ मिळतात. या विशेषाधिकारांमध्ये रुपये 20000 वरील खर्चासाठी 10X रिवॉर्ड पॉइंट्स चा समावेश आहे, सर्व ऑनलाइन खर्चावर 6X रिवॉर्ड, खरेदी करणे आणि रोकड काढण्यासाठी आयुष्यभर कॉम्प्लिमेंटरी आणि व्याजमुक्त क्रेडिट कार्डचादेखील समावेश आहे.
इतर अनेक लाभांमध्ये, सर्व स्थानिक एटिएममध्ये विनामूल्य अमर्याद व्यवहार, विनामूल्य ऑनलाइन व्यवहार, अमर्याद चेक बुक आणि बँकच्या शाखा व एटिएम नेटवर्कमध्ये कुठेही बँकिंगची सुविधा आहे. ग्राहकांची सोय आणि अनुभव यांमध्ये वाढ करण्यासाठी डिजिटल इनोव्हेशन आणण्याकरिता बँक आपल्या तंत्रज्ञानामध्ये सतत गुंतवणूक करत आहे.