Indian Railway Rules : चालत्या ट्रेनमधून मोबाईल किंवा पर्स पडलं तर पहिलं हे काम करा, लगेच मिळेल सामान

ट्रेनमधून प्रवास करताना काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतात. घाईगडबडीत ट्रेन पकडताना किंवा ट्रेन सुरू असताना हातातली वस्तू पडते. मोबाईल किंवा पर्स पडली तर टेन्शन येतं. मग या वस्तून कशा मिळवाल जाणून घ्या

Indian Railway Rules : चालत्या ट्रेनमधून मोबाईल किंवा पर्स पडलं तर पहिलं हे काम करा, लगेच मिळेल सामान
चालत्या ट्रेनमधून मोबाईल किंवा पर्स पडलं तरी नो टेन्शन, असं मिळवाल सामान
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 1:51 PM

मुंबई : भारतात रेल्वेचं जाळं सर्वदूर पसरलं आहे. जगात भारतीय रेल्वे नेटवर्क चौथ्या क्रमांकावर येतं. ट्रेननं प्रवास करणं सर्वात सुरक्षित आणि स्वस्त मानलं जातं. त्यामुळे बहुतांश लोकं ट्रेननं प्रवास करण्याला प्राधान्य देतात. कारण स्वस्त आणि वेळेत पोहोचण्याचं उत्तम पर्याय म्हणून याकडे पाहिलं जातं. प्रवासादरम्यान मोबाईल वापरणं आता सामान्य झालं आहे. प्रवास करताना तुम्हाला प्रत्येकाच्या हातात फोन पाहायला मिळेल. पण अनेकदा फोनवर बोलताना किंवा ट्रेनमध्ये चढताना वस्तू ट्रॅकवर पडतात. त्यामुळे आता गेलेली वस्तू कशी मिळावयची याचं टेन्शन येतं.

तंत्रज्ञानाच्या युगात बँकिंग डिटेल्सपासून आयडीपर्यंत महत्त्वाची माहिती फोनमध्ये सेव्ह असते. त्यामुळे फोन पडला किंवा हरवला तर अडचणींचा सामना करावा लागतो. तुमचा फोन रेल्वे रुळावर पडला असेल तर काही नियम आहे. या नियमांचं पालन करून तुम्ही गेलेला फोन किंवा पर्स पुन्हा मिळवू शकता.

चुकूनही चेन पुलिंग करू नका

मोबाईल फोन ट्रॅकवर पडल्यानंतर लोकं पहिल्यांदा चेन खेचतात. पण तुम्ही अशी चूक करू नका. कारण असं करणं दंडनीय गुन्हा आहे. तुम्हाला दंड किंवा एका वर्षाचा तुरुंगवास अथवा दोन्ही होऊ शकतं. ट्रेनची चेन फक्त आपतकालीन संकटातच खेचण्याची परवानगी आहे. सामान सुटलं किंवा मोबाई पडला तर तुम्ही चेन खेचू शकत नाहीत.

असा मिळवाल ट्रॅकवर पडलेला फोन

तुमचा मोबाईल फोन किंवा पर्स रेल्वे ट्रॅकवर पडलं असेल. तर सुरुवातीला ट्रॅकच्या बाजूला असलेल्या पोलवरील पिवळ्या आणि काळ्या रंगाने लिहिलेले नंबर नोट करा. त्यानंतर ट्रेन कोणत्या दोन स्टेशनच्या मध्ये आहे याची माहिती घ्या. लगेच टीटीई किंवा अन्य प्रवाशाच्या मोबाईलची मदत घ्या.

पोलिस हेल्पलाईन नंबर 182 किंवा रेल्वे हेल्पलाईन नंबर 139 वर कॉल करा. त्यांना सामान पडल्याची माहिती द्या. तसेच नोट केलेला पोलवरील नंबर आणि दोन स्टेशनदरम्यानची माहिती द्या. जेणेकरून त्याना पडलेली वस्तू शोधणं सोपं होईल.

पोलिसांना इतकी माहिती दिल्यावर फोन मिळण्याची शक्यता वाढते. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत तुमचा फोन शोधून देतील. पोलीस तुमचा फोन शोधण्याचा प्रयत्न करतात ही बाब लक्षात ठेवा. या दरम्यान तुमचा फोन कोणी उचलला तर मात्र मिळणं कठीण होईल.

अलार्म चेन केव्हा खेचू शकता?

अलार्म चेन खेचण्याचे काही नियम आहेत. काही परिस्थितीमध्ये तुम्ही चेन खेचू शकता. जेव्हा रेल्वे स्टेशनवर ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग व्यक्ती सुटला असेल. त्यांना स्टेशनवर सोडून ट्रेन पुढे निघाली असेल तर तुम्ही चेन खेचू शकता. या व्यतिरिक्त ट्रेनमध्ये आग, दरोडा किंवा आपातकालीन स्थिती ओढावली असेल तर चेन पुलिंग करता येते

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.