PM Narendra Modi : ‘जर मी हिंदू-मुस्लिम केलं तर…’, प्रचारात प्रथमच पंतप्रधान मोदींकडून भूमिका स्पष्ट

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक 2024 चा प्रचार सुरु असताना प्रथमच मुस्लिमांच्या विषयावर स्पष्टपणे बोलले आहेत. त्यांनी आपले काही व्यक्तीगत अनुभव सुद्धा सांगितले. अलीकडे त्यांनी अशाच एका प्रचारसभेत जास्त मुलांवरुन केलेलं वक्तव्य मुस्लिमांशी जोडलं जात होतं.

PM Narendra Modi : 'जर मी हिंदू-मुस्लिम केलं तर...', प्रचारात प्रथमच पंतप्रधान मोदींकडून भूमिका स्पष्ट
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 8:11 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकसभा निवडणूक 2024 चा जोरदार प्रचार सुरु आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपाने 400 पारचा नारा दिला आहे. त्यांच्याकडून तसाच प्रचार सुरु आहे. नरेंद्र मोदी दररोज देशाच्या वेगवेगळ्या भागात जनसभांना संबोधित करत आहेत. अलीकडे त्यांनी अशाच एका प्रचारसभेत केलेलं वक्तव्य मुस्लिमांशी जोडलं जात होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांना उद्देशून बोलले असा प्रचार विरोधी पक्षाकडून सुरु होता. काल त्यांनी उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर यावर स्पष्टीकरण दिलं. “हिंदू-मुस्लिम राजकारण करायच नाही, हा माझा संकल्प आहे. ज्या दिवशी मी हे असं सुरु करेन, त्या दिवसापासून सार्वजनिक जीवनात राहण्यायोग्य नसेन” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, ते प्रचार सभेतील वक्तव्य मुस्लिमांसाठी नव्हतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. “मला धक्का बसला, कोणी सांगितलं तुम्हाला, जेव्हा एखादा माणूस ज्यांना जास्त मुल आहेत, त्या बद्दल बोलतो, त्याचा अर्थ मुस्लिमांशी जोडता. तुम्ही मुस्लिमांवर हा अन्याय करत नाही का? मी हिंदू-मुस्लिम करणार नाही, हा माझा संकल्प आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गुजरातमध्ये आमच्या शेजारची घर मुस्लिम कुटुंबांची होती, तो अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला. एका खासगी वृत्त वाहिनीशी ते बोलत होते.

मुस्लिम मित्रांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“ज्या दिवशी ईद असायची, तेव्हा शेजारच्या मुस्लिम घरांमधून घरी जेवण यायचं. मुहर्रमच्या दिवशी घराबाहेर जायचं असेल तर, तजिया खालून जावं लागणार हे माहित होतं. मी त्या वातावरणात लहानाचा मोठा झालो. माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत, पण मला त्याची जाहीरात करायला आवडत नाही” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ‘2002 गोध्रानंतर माझी प्रतिमा जाणीवपूर्वक बिघडवण्यात आली’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मुस्लिम तुम्हाला मतदान करणार का? या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी ‘या देशाची जनता मला मतदान करणार’ असं सांगितलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.