मुलांची पॉलिसी असल्यास पालकांना मिळणार आयपीओमध्ये सवलत, जाणून घ्या ‘एलआयसी’च्या आयपीओबाबत महत्त्वाची माहिती

देशातील सर्वात मोठा आयपीओ लवकरच एलआयसी (LIC IPO) मार्केटमध्ये आणणार आहे. सरकारी विमा कंपनीच्या या आयपीओकडे मोठ्या गुंतवणूकदारांचं (Retail Investors) लक्ष लागलं आहे.

मुलांची पॉलिसी असल्यास पालकांना मिळणार आयपीओमध्ये सवलत, जाणून घ्या 'एलआयसी'च्या आयपीओबाबत महत्त्वाची माहिती
भारतीय आयुर्विमा महामंडळ
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 12:23 PM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा आयपीओ लवकरच एलआयसी (LIC IPO) मार्केटमध्ये आणणार आहे. सरकारी विमा कंपनीच्या या आयपीओकडे मोठ्या गुंतवणूकदारांचं (Retail Investors) लक्ष लागलं आहे. या निमित्ताने त्यांना आपल्या व्यवसाय वाढवण्याची संधी मिळणार आहे. एलआयसीने गुंतवणूकदारांना (LIC Policyholders) आपल्या आयपीओच्या माध्यमातून आरक्षण आणि डिस्काउंटीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एलआयसीच्या या नव्या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार कोणाला मिळणार नाही? याबाबत एलआयसीकडून एफएक्यू जारी करण्यात आला आहे. एलआसी लवकरच आपला आयपीओ आणणार आहे. या आयपीओसंदर्भात अनेक प्रश्न सध्या गुंतवणूक करू इच्छिणारे आणि पॉलिसीधारकांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आले आहेत. एलआयसीच्या पॉलिसी धारकांना आयपीओमधील गुंतवणुकीसाठी डिसकाउंट मिळणार आहे. मात्र जर पॉलिसी ही लहान मुलाच्या नावावर असेल तर डिसकाउंट कोणाला मिळणार असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. याचे उत्तर देखील एलआसीच्या वतीने देण्यात आले आहे.

…तर मुलाच्या पालकांना सवलत

जर अप्लवयीन मुलाच्या नावावर एलआयसीची पॉलीसी असेल तर एलआयसीने आयपीओवरील गुंतवणुकीमध्ये देऊ केलेला फायदा कोणाला मिळणार यावर उत्तर देतान म्हटले आहे की, जो त्या पॉलीसीचा प्रस्तावक असेल त्या संबंधित व्यक्तीला आयपीओचा फयादा मिळू शकतो. लहान मुलांच्या प्रकरणात जो पॉलिसीचा प्रस्तावक असतो तोच त्या पॉलिसीचा मालक समजण्यात येतो. त्यामुळे अशा प्रकरणात मुलांच्या आई विडिलांना याचा लाभ मिळू शकतो.

जॉइंट पॉलिसी असल्यास लाभ मिळणार का?

असाच एक प्रश्न विचारण्यात आला होता. की जर पती, पत्नीची जॉइंट पॉलिसी असेल तर त्या दोघांनाही आयपीओच्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो का या प्रश्नाला उत्तर देताना सांगण्यात आले की, त्यातील कुठल्याही एका व्यक्तीला आयपीओसाठी राखवी असलेल्या रिझर्वेशनचा लाभ मिळू शकतो. तर जॉईंट पॉलिसीमधील दुसऱ्या व्यक्तीला ओपन रिटेल कॅटेगिरीमधून अर्ज करावा लागले.

संबंधित बातम्या

बँकेतील कामे आजच पूर्ण करा, मार्च महिन्यात बँकांना तेरा दिवस सुटी

Yamaha FZ अवघ्या 40 हजारात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

महागाईचा भडका उडणार! कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्याही पुढे जाण्याची शक्यता; धातुचेही भाव वाढणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.