गृह कर्जावर घेतलेले घर विकत असाल तर कराचा भार पेलावा लागेल; जाणून घ्या यावर उपाय
आयकर कायद्याच्या कलम 80 सी नुसार जर तुम्ही गृहकर्जाच्या साहाय्याने खरेदी केलेले घर विकले, तर ते खरेदी केलेल्या वर्षाच्या अखेरीपासून पुढील पाच वर्षांच्या आत कर्जाच्या परतफेडीवर 80C अंतर्गत जो काही करलाभ घेतलेला असेल, तो सर्व करपात्र होईल.
नवी दिल्ली : एचडीएफसी बँकेकडून गृहकर्ज घेऊन रोहितने डिसेंबर 2018 मध्ये मुंबईत 2 बीएचके फ्लॅट खरेदी केला. यासोबत तो कर सवलतीचाही फायदा घेत आहे. तो कर्जाची मुद्दल आणि व्याजावर टॅक्स क्लेम करीत आहे. रोहितचे कुटुंब हळूहळू वाढत आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला आता दोन बेडरूमचा फ्लॅट छोटा पडत आहे. अशा परिस्थितीत रोहित जुना फ्लॅट विकून थ्री बीएचकेचा फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करीत आहे. पण त्याच्या मनात सतत कर भरण्याचा प्रश्न घोळत आहे. (If you are buying a home loan, you will have to pay a tax burden; know the solution)
जर गृहकर्ज असलेला फ्लॅट विकला आणि दुसरा फ्लॅट खरेदी केला तर कर दायित्व काय असेल? असा प्रश्न रोहितला पडला आहे. जुना 2 बीएचकेचा फ्लॅट विकला तर डिसेंबर 2018 पासून मिळणाऱ्या कर सूटचा लाभ परत करावा लागेल का, आणि या परताव्यानंतरच त्यांना थ्री बीएचके फ्लॅट खरेदी करता येईल का? असेही प्रश्न रोहितला सतावत आहेत. असे प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे, अशा प्रश्नांचा सामना अनेक लोकांना करावा लागतो. शेवटी त्यांना कर जाणकारांचा सल्ला घ्यावा लागतो, त्यांच्याकडून त्यांना विविध उपायांबद्दल सांगितले जाते.
सोप्या भाषेत समजून घ्या
सर्वसामान्य कुटुंबातील रोहितदेखील अशाच प्रश्नांनी त्रस्त आहे. म्हणून तो कर सल्लागाराकडे धाव घेतो. कर तज्ञ त्याला काय माहिती देतात ते आपण येथे जाणून घेऊया. पहिली गोष्ट आयकरच्या कलम 80 सी बद्दल आहे. रोहितला याबाबतीत थोडा त्रास होतो. आयकर कायद्याच्या कलम 80 सी नुसार जर तुम्ही गृहकर्जाच्या साहाय्याने खरेदी केलेले घर विकले, तर ते खरेदी केलेल्या वर्षाच्या अखेरीपासून पुढील पाच वर्षांच्या आत कर्जाच्या परतफेडीवर 80C अंतर्गत जो काही करलाभ घेतलेला असेल, तो सर्व करपात्र होईल. तुम्हाला हा सर्व कर ज्या वर्षी गृहकर्जातून घेतलेले घर विकले जाईल, त्याच वर्षी भरावा लागेल.
कराचे पैसे परत करावे लागतील का?
जर रोहितने 80C अंतर्गत परतफेडीच्या रकमेवर टॅक्स क्लेम केला असेल, तर फ्लॅट विकल्याच्या वर्षीच कर भरावा लागेल. परतफेडीच्या रकमेवर कोणतीही कर सूट मिळणार नाही. तथापि, येथे एक लक्षात घेण्यासारखे आहे की हा कर त्याच रकमेवर आकारला जाईल, जो कर्जाची मुख्य रक्कम म्हणून भरला गेला आहे. गृहकर्जावरील व्याज भरले असल्यास कर दायित्वाचा हा नियम लागू होत नाही. म्हणून जर तुम्ही गृहकर्जातून घेतलेल्या घराच्या व्याजावर कलम 24 (बी) अंतर्गत कर लाभ घेतला असेल, तर तो करपात्र होणार नाही आणि करातून सूट मिळेल.
कर कधी आकारला जाणार नाही
रोहित 24 महिने पूर्ण केल्यानंतर सदनिका विकत असल्याने त्यावर मिळणारा नफा दीर्घकालीन भांडवली नफा मानला जाईल. आयकर कायद्याच्या कलम 54 नुसार, निवासी घराच्या विक्रीवर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर सूट मिळू शकते, जर दुसरे घर किंवा फ्लॅट त्या भांडवली नफ्याच्या रकमेसह ठराविक कालावधीत खरेदी केले असेल. (If you are buying a home loan, you will have to pay a tax burden; know the solution)
3 महिन्यांसाठी सायन फ्लायओव्हर वीकएंडला बंद ! गाड्यांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचे हाल होणार https://t.co/8aNdSi4vff#Mumbai | #Traffic | #SionFlyover
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021
इतर बातम्या
आधी तोरा मिरवला पण शेवटी वठणीवर आले, पाकड्यांच्या जर्सीवर आता सन्मानाने दिसतोय ‘इंडिया’
कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश बंदी, तर तुळजापुरात संचारबंदी