Bank ATM Transaction Limit | एटीएममधून पैसे काढताय, मग हे वाचाच, नाहीतर पडेल भूर्दंड

ATM Transaction Limit : बँकेच्या एटीएमची पायरी चढण्यापूर्वी तुम्हाला कितीदा एटीएममधून रक्कम काढता येईल हे माहिती असणं आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला महिन्याकाठी मोठा भूर्दंड बसू शकतो.

Bank ATM Transaction Limit | एटीएममधून पैसे काढताय, मग हे वाचाच, नाहीतर पडेल भूर्दंड
एटीएममधून रक्कम काढताना ठेवा भानImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 10:49 AM

ATM Transaction Limit News : युपीआय व्यवहारांमुळे (UPI Transaction) बँक एटीएमच्या (ATM) व्यवहारांवर परिणाण दिसत असला तरी अनेक जण अजूनही रोखीत व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे बँकेच्या एटीएमची पायरी चढण्यापूर्वी तुम्हाला कितीदा रक्कम काढता येते, याचा नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नाही तर बँकेने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा तुम्ही अधिक वेळा रक्कम काढली तर तुम्हाला त्याचा भूर्दंड सहन करावा लागेल. कारण पुढचा सर्व व्यवहार हा सशुल्क असेल. एटीएम व्यवहार मर्यादा अनेकदा तुमच्याकडे असलेल्या खात्याच्या प्रकारावर आणि तुम्ही वापरत असलेले डेबिट कार्ड यावर अवलंबून असते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ATM व्यवहारांसाठी नियम लागू केलेले आहेत. खासगी आणि सरकार बँका आरबीआयने घालून दिलेल्या नियमानुसार आणि शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील एटीएमनुसार तुमच्याकडून मर्यादेबाहेरील व्यवहारांसाठी शुल्क आकारतात. तुम्ही SBI, HDFC, ICICI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.

SBI एटीएम

SBI च्या अधिकृत संकेतस्थळानुसार, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, हैदराबाद आणि बंगळूरु या शहरात 3 विनामूल्य व्यवहारांसाठी (फक्त बचत बँक खातेधारकांसाठी) पात्र आहात. तर इतर शहरातील बचत खातेदारांसाठी 5 विनामूल्य व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक) ही मर्यादा ठेवण्यात आली आहे. देशभरातील 1.5 लाख एटीएममधून (एसबीआयसहीत इतर बँका) तुम्ही हा व्यवहार करु शकता.

हे सुद्धा वाचा

या मर्यादेव्यतिरिक्त ग्राहकाने व्यवहार केल्यास, त्याला या आर्थिक व्यवहारांसाठी इतर बँक एटीएमसाठी 20 + GST ​​आणि SBI ATM साठी 10 + GST इतके शुल्क प्रत्येक व्यवहारासाठी मोजावे लागेल.

तसेच गैर आर्थिक व्यवहारांसाठी इतर बँकांच्या ATM चा वापर केल्यास 8 + GST ​​आणि SBI ATM साठी 5 + GST शुल्क द्यावे लागेल.

एवढेच नाही तर SBI बँक एटीएम आणि इतर बँक एटीएम दोन्हीमध्ये पुरेशी शिल्लक नसल्यामुळे नाकारलेल्या व्यवहारांसाठी बँक 20 + GST शुल्क ​​आकारते.

ICICI बँक एटीएम व्यवहार

ICICI बँकेने इतर बँकांच्या एटीएममधून रोख पैसे काढण्यासाठी 10,000 रुपयांची मर्यादा ठेवली आहे. खातेदारांना ICICI बँकेच्या ATM मध्ये केलेले पहिले पाच व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही) विनामूल्य आहेत. त्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यहारासाठी 21 रुपये तर गैर आर्थिक व्यवहारांसाठी 8.50 रुपये जीएसटी शुल्कासह मोजावे लागतील. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, हैदराबाद आणि बंगळूरु या शहरात 3 विनामूल्य व्यवहारांसाठी (फक्त बचत बँक खातेधारकांसाठी) पात्र आहात. तर इतर शहरातील बचत खातेदारांसाठी पहिले 5 व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक)विनामूल्य आहेत.

HDFC बँक एटीएम व्यवहार मर्यादा

एचडीएफसी बँकेने ही इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी, प्रति व्यवहार 10,000 रुपयांची कमाल मर्यादा ठेवली आहे. बचत आणि पगारदार ग्राहकांसाठी दरमहा 5 व्यवहार विनामूल्य आहेत. विनामूल्य व्यवहारांच्या अधिकृत संख्येपेक्षा जास्त रोख पैसे काढण्यासाठी, HDFC बँक 21 रुपये अधिक तर गैर आर्थिक व्यवहारांसाठी 8.50 रुपये जीएसटीसह आकारते.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.