Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax : Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल टॅक्स दुप्पट!

Income Tax : पॅनकार्ड नसेल तर मुदत ठेव योजनेवरील गुंतवणुकीवर तुम्हाला दुप्पट कर मोजावे लागेल, काय सांगतो प्राप्तिकर खात्याचा नियम..

Income Tax : Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल टॅक्स दुप्पट!
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 11:37 AM

नवी दिल्ली : आर्थिक व्यवहारांसाठी भारतात पॅनकार्ड अत्यंत आवश्यक आहे. पॅन कार्ड (Pan Card) हे 10 अंकी क्रमांकाचे ओळखपत्र असते. त्यामुळे कोणत्याही भारतीयाची आर्थिक कुंडली समोर येते. प्राप्तिकर खाते पॅनकार्ड देते. नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांसाठी आयटीआर अर्ज (ITR Filing) भरताना पॅनकार्ड गरजेचे ठरते. त्यामुळे पॅनकार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र मानण्यात येते. प्रत्येकाकडे पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने पॅनकार्ड आधार कार्डशी लिकिंग (Pan-Aadhaar Linking) करणे बंधनकारक केले आहे. त्यासंबंधीची मुदतवाढ देण्यात आली आहे. जूनपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पॅनकार्ड नसेल तर FD संबंधी एका नियमाने तुमचे नुकसान होऊ शकते.

FD शी काय आहे संबंध आर्थिक वर्ष 2020-21 च्या फायनान्स बिलमध्ये केंद्र सरकारने एक खास प्रस्ताव दिला आहे. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले असेल तर त्याचा मोठा फटका बसेल. मुदत ठेव योजनेसाठी पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. जर तुम्ही 50,000 रुपयांपेक्षा अधिक वा एका आर्थिक वर्षात 5 लाख रुपयांपेक्षा अधिकची टाईम डिपॉझिटमध्ये गुंतणणूक केली असेल तर पॅनकार्डचा नियम बंधनकारक आहे. तुम्ही बँकेत, पोस्ट कार्यालयात, खासगी वित्तीय संस्थेत एफडी केली असेल तर पॅनकार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

तर बसेल दंडम विना पॅनकार्ड तुम्ही मुदत ठेव योजना सुरु केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. प्राप्तिकर अधिनियमाच्या कलम 194A नुसार, एखाद्या एफडीवर एका वर्षात 10,000 रुपायंपेक्षा अधिक व्याज मिळत असेल तर 10 टक्के टीडीएस कपात होते. पण जर ग्राहकाने एफडी करताना पॅनकार्ड जोडले नसेल तर त्याला 20 टक्के टीडीएस द्यावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांना यामधून सवलत देण्यात आली आहे. त्यांना एफडीवरील 50,000 रुपयांपर्यंतचे व्याज कर मुक्त आहे.

हे सुद्धा वाचा

तर करता येईल दावा जर तुम्हाला मिळणारे व्याज, कर मुक्त मर्यादेच्या आत आहे आणि तरीही बँकेने टीडीएसची कपात केली तर तुम्हाला या रक्कमेवर दावा करता येतो. प्राप्तिकर खात्याकडे आयटीआर भरताना या टीडीएस रक्कमेवर दावा करता येतो. ही रक्कम परत मिळविता येते.

कसा जमा होतो कर प्राप्तिकर रिटर्न दरवर्षी जमा करावे लागते. एकूण मिळकतीवर आयटीआर जमा करावा लगातो. जर तुम्ही तीन वर्षांकरीता एफडी केली तर बँक दरवर्षी तुमच्या खात्यातून TDS कपात करेल. मुदत ठेव योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर बँक व्याज आणि मुळ रक्कम परत करते. तसेच तुमच्या गुंतवणूक रक्कमेवर विम्याचे संरक्षण पण मिळते. DIGCI नुकसान भरपाई देते.

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.