Pan Card : निष्क्रिय झाले पॅनकार्ड, आता नाही करता येणार हे आर्थिक व्यवहार

Pan Card : पॅन-आधार जोडणी न करण्याचे परिणाम अनेकांना भोवणार आहेत. त्यांना अनेक आर्थिक व्यवहारच नाही तर या सेवांपासून वंचित रहावे लागेल. त्यांना निष्क्रियतेचा मोठा फटका बसेल.

Pan Card : निष्क्रिय झाले पॅनकार्ड, आता नाही करता येणार हे आर्थिक व्यवहार
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 5:35 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अनेकदा संधी दिली. दोन्ही कार्डच्या लिंकिंगसाठी आयकर खात्याने (Income Tax) 1 जुलै 2017 रोजी नियम लागू केला होता. पण त्यानंतर अनेकदा ही मुदत वाढविण्यात आली. गेल्यावर्षीपासून दोन्ही कार्ड जोडणीसाठी केंद्र सरकारने विलंब शुल्क आकारले. अर्थसंकल्प 2021 मध्ये केंद्र सरकारने हे दोन्ही कार्ड जोडणे बंधनकारक करण्यात आले होते. आता 30 जून 2023 रोजीपर्यंत कार्डची जोडणी करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. ज्यांनी ही जोडणी (PAN-Aadhaar Not Link) केली नाही, त्याचे परिणाम अनेकांना भोवतील. त्यांना अनेक आर्थिक व्यवहारच नाही तर या सेवांपासून वंचित रहावे लागेल. त्यांना निष्क्रियतेचा मोठा फटका बसेल.

दंड वसुली 1 एप्रिल 2022 आणि जून 2022 या दरम्यान आधार लिंक केल्यावर 500 रुपये दंड लावण्यात आला. तर गेल्या वर्षी 1 जुलै 2022 पासून आधार-पॅन जोडणीसाठी 1,000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. त्यानंतर ही अनेकांनी दोन्ही कार्डची जोडणी केली नाही.

पॅनकार्डचा उपयोग केंद्र सरकारने कर चोरी शोधण्यासाठी पॅनकार्ड सुरु केले. करदात्यांची गुंतवणूक, कर्ज आणि इतर व्यावसायिक घटनांचा रेकॉर्ड त्यामुळे सरकार दरबारी नोंदवल्या जातो. त्यासाठी पॅनकार्ड क्रमांकाचा उपयोग होतो. अनेक आर्थिक बाबींचा ट्रॅक रेकॉर्डसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. देशात विना पॅन कार्ड मोठा व्यवहार करता येत नाही.

हे सुद्धा वाचा

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास असा बसतो फटका

  1. आयकर विभागानुसार, 15 आर्थिक व्यवहार, सेवांना फटका बसतो
  2. पॅनकार्ड नसेल तर सरकारी, सहकारी आणि खासगी बँकेत खाते उघडता येते
  3. क्रेडिट आणि डेबिट कार्ड मिळणार नाही
  4. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते उघडता येणार नाही
  5. परदेश यात्रेदरम्यान पॅनकार्डचा तपशील नसेल तर फटका
  6. एकाचवेळी 50 हजारांहून अधिकची रक्कम जमा करता येणार नाही
  7. म्युच्युअल फंडात एकाचवेळी 50 हजार रुपयांपेक्षा अधिकचे पेमेंट
  8. कोणत्याही संस्थेला 50 हजार रुपयांची रक्कम पाठविता येणार नाही
  9. आरबीआयकडून बाँड खरेदीसाठी एकदाच 50 हजारांहून अधिकची रक्कम खर्च करता येणार नाही
  10. कोणत्याही बँकेत, मुदत ठेव वा इतर योजनेतील वार्षिक गुंतवणूक 5 लाख रुपयांपेक्षा अधिक नको
  11. बँक ड्रॉफ्ट, पे ऑर्डर, धनादेशासाठी 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येणार नाही
  12. एका आर्थिक वर्षात विम्याचा हप्ता 50 हजार रुपयांपेक्षा जास्त भरता येणार नाही
  13. शेअर बाजारात एक लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करता येणार नाही
  14. निष्क्रिय पॅन वापरल्यास कर कपातीचा फटका
  15. दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी-विक्री करता येणार नाही.
  16. 10 लाख रुपयांपेक्षा अधिकची चल-अचल संपत्तीची खरेदी विक्री करता येणार नाही
  17. दोन लाख रुपयांपेक्षा अधिकच्या वस्तूची खरेदी विक्री केल्यास कर भरावा लागेल

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.