Loan on PAN Card | पॅन कार्ड आहे, मग लाख रुपयांचं कर्ज मिळवा अगदी सहज, असा करा अर्ज

Loan on PAN Card | आर्थिक गरजा भागविण्याचा कर्ज घेणे हा सोपा मार्ग आहे. आता रोज एक तरी फोन वैयक्तिक कर्ज देण्यासाठी येतोच येतो. त्यामुळे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर सहज कर्ज मिळू शकते.

Loan on PAN Card | पॅन कार्ड आहे, मग लाख रुपयांचं कर्ज मिळवा अगदी सहज, असा करा अर्ज
पॅनकार्डवर सहज लाखाचं कर्जImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 4:01 PM

Loan on PAN Card | आर्थिक गरजा (Need of Money) भागविण्याचा सध्याचा सर्वात प्रचलित सोपा मार्ग म्हणजे हात उसणे घेणे अथवा वैयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळवणे. बँकेत (Bank) वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करून कर्ज रक्कम मिळवण्यासाठी चांगलेच कष्ट पडतात. पण आता अनेक वित्तीय संस्थांनी तुमच्याकडे एक दोन महत्वाचे कागदपत्रे असतील तरीही कर्ज उपलब्ध करुन देण्याची सोय केली आहे. त्यामुळे कर्ज मिळवण्यासाठी अडचणी येत असतील तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचं अर्ध काम तर इथंच फत्ते झाल्यात जमा आहे. कारण तुमच्या आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा पॅन कार्डद्वारे मिळतो. तुमच्या आर्थिक व्यवहाराची अख्खी कुंडलीच पॅन कार्डद्वारे (Pan Card) मिळते. त्यामुळे या वित्तीय संस्थांसह काही खासगी बँका तुम्हाला अवघ्या पॅनकार्ड आणि काही कागदपत्रांच्या आधारे कर्ज पुरवठा करतात. आर्थिक गरजा भागविण्याचा कर्ज घेणे हा सोपा मार्ग आहे. आता रोज एक तरी फोन वैयक्तिक कर्ज देण्यासाठी येतोच येतो. त्यामुळे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर सहज कर्ज मिळू शकते.

बहुतांश बँका तुमच्या पॅनकार्डच्या तपशीलाच्या आधारे 50 हजार रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देतात. कर्ज-शेअरिंग एनबीएफसी बजाज फिनसर्व्हच्या मते, केवायसी नियमांनुसार, पॅन कार्ड देऊन कोणत्याही अडचणीशिवाय वैयक्तिक कर्ज मिळवता येते. आपल्या आर्थिक गरजा भागविण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि बँका आपली क्षमता, उत्पन्न आणि परतफेडीच्या कालावधीनुसार कर्जाची रक्कम कमी किंवा वाढवू शकते.

हे सुद्धा वाचा

तारण हवे कशाला?

पॅनच्या आधारे कर्ज घेण्यासाठी ग्राहकाला बँकेकडे कोणतेही तारण ठेवावे लागत नाही. म्हणजे बँका तुम्हाला काहीही गहाण न ठेवता वैयक्तिक कर्ज देतात. मात्र पॅन कार्डवरील वैयक्तिक कर्जही असुरक्षित कर्जांच्या श्रेणीत मोडतात आणि त्यामुळेच बँका त्या माध्यमातून फार मोठ्या रकमेची कर्ज मंजूर करत नाहीत

खर्च ही टळतो

गृहकर्ज किंवा वाहन कर्जाप्रमाणे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी सेवा शुल्काचा खर्च करण्याचे बंधन नाही. बँका तुम्हाला गृहकर्ज घर खरेदी करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी देतात, तर कार खरेदीच्या बदल्यात वाहन कर्ज दिले जाते. कोणत्याही वैयक्तिक खर्चासाठी वैयक्तिक कर्ज वापरू शकता. उदाहरणार्थ, ही रक्कम उपचार किंवा चालण्यासाठी किंवा एखाद्या समारंभाच्या आयोजनासाठी वापरता येते. ती रक्कम त्याच कारणासाठी का वापरली असे तुम्हाला कोणीही विचारत नाही.

ही कागदपत्रे लागतील

पॅन कार्डवर पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला कामाच्या अनुभवासह काही नेहमी लागणारी कागदपत्रे सादर करावी लागतील. पॅनवर वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला किमान दोन वर्षांच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्जदार एकतर पगारदार व्यक्ती किंवा स्वयंरोजगार करणारा असावा. दोन्ही बाबतीत त्याचा क्रेडिट स्कोअर चांगला असायला हवा.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.