पीएफ दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करायचाय?, तर फॉलो करा या सहा सोप्या स्टेप

जेव्हा तुम्ही एखादी नोकरी सोडता किंवा ती बदता तेव्हा तुम्हाला सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे तुमच्या पीएफची. पीएफ दुसऱ्या खात्यामध्ये कसा ट्रान्सफर करायचा हे अनेक लोकांना माहिती नसते. आज आपन त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

पीएफ दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करायचाय?, तर फॉलो करा या सहा सोप्या स्टेप
EPFO
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 6:15 AM

नवी दिल्ली : जेव्हा तुम्ही एखादी नोकरी सोडता किंवा ती बदता तेव्हा तुम्हाला सर्वात मोठी चिंता असते ती म्हणजे तुमच्या पीएफची. पीएफ दुसऱ्या खात्यामध्ये कसा ट्रान्सफर करायचा हे अनेक लोकांना माहिती नसते. त्यामुळे बरेच लोक आपला पीएफ दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपल्या हक्काचे पैसे पीएफ खात्यातून काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पीएफ कार्यालयात चक्रा माराव्या लागतात. यामध्ये मोठ्याप्रमाणात वेळ वाया जातो. मात्र तेच जर तुम्हाला पीएफ एका खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये कसा ट्रान्सफर कारायचा याची योग्य माहिती असेल तर तुमचे परिश्रम वाचतात. आज आपण पीएफ एका खात्यामधून दुसऱ्या खात्यामध्ये सोप्या पद्धतीने ट्रान्सफर कसा करायचा हे जाणून घेणार आहोत.

ईपीएफओची माहिती

कर्मचाऱ्यांना त्यांचा पीएफ एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये सहज ट्रान्सफर करता यावा. त्यामध्ये कोणत्याही समस्या उद्धभवू नये, तसेच पीएफ खात्यामधून सहज पैसा काढता यावा यासाठी ईपीएफओ सतत प्रयत्न करत असते. कर्मचारी सोप्या पद्धतीने कशाप्रकारे त्यांचा पीएफ एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करु शकतात  याची माहिती ईपीएफओच्या वतीने ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. सहा सोप्या स्टेप आहेत, ज्यांचा उपयोग करुन तुम्ही तुमचा पीएफ एका खात्यामधून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकता.

‘असा’ करा पीएफ ऑनलाईन ट्रान्सफर

सर्व प्रथम ईपीएफओ सदस्य पोर्टलला भेट द्या, तिथे तुमचा पासवर्ड आणि यूएएन नंबर टाकून लॉग इन करा

त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिस या पर्यायावर क्लीक करा

ते ओपन झाल्यानंतर तिथेच आणखी एक पर्याय आहे, एक सदस्य एक खाते त्यावर क्लीक करा

त्यामध्ये विचारण्यात आलेली सर्व आवश्यक ती माहिती भरा

त्यानंतर तुम्ही मागे कोणत्या संस्थेमध्ये काम करत होता, त्या  संस्थेची संपूर्ण डिटेल्स त्यामध्ये भरा

सर्व तपशील भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो सबमीट केल्यानंतर तुमचा पीएफ ट्रान्सफर होईल.

तर अशा अवघ्या काही सोप्या टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे ट्रान्सफर करू शकता.  त्यासाठी तुम्हाला आता पीएफ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.

संबंधित बातम्या

चांगल्या बँकिंगसाठी Bad Bank :  कर्ज वसुलीसाठी नवीन प्रयोग, बँकेची बॅलन्सशीटही सुधारणार

Share Market | गुंतवा बिनधास्त, चांगला परतावा हमखास, या शेअरमधून मिळतील तुम्हाला घसघशीत परतावा

भविष्यातील कटकट टाळण्यासाठी हा बदल हवाच, वाहन नावावर करण्याची झंझट छुमंतर, या पद्धतीने करा मोटर वाहन मालकी हस्तांतरण  

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.