सामान्य नागरिकांनी ATM आणि क्रेडिट कार्डच्या नियमातील ‘हा’ बदल समजून घ्या, अन्यथा 1 जानेवारीपासून नुकसान होईल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) डेटा स्टोरेजशी संबंधित टोकनाइजेशनचे (RBI tokenization rules) नियम जारी करण्यात आलेत. यानुसार ग्राहकांना आपल्या कार्डची माहिती फूड डिलिव्हरी अॅप, कॅब सेवा देणाऱ्या कंपन्या अशा कोणत्याही थर्ड पार्टी अॅपसोबत शेअर करता येणार नाही. याआधी अॅपमध्ये माहिती स्टोअर केली जात होती, मात्र यामुळे माहितीच्या चोरीचा धोका राहतो. म्हणून नवा नियम लागू होणार आहे. यात ग्राहकांना आपला डेटा शेअर करायचा की नाही याचं स्वातंत्र्य असेल.
Most Read Stories