2021 मध्ये पेट्रोल 14 तर डिझेल 17 टक्क्यांनी महागले; पुढील वर्षात इंधनाचे दर कमी होणार?

आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. हे वर्ष विविध कारणांनी गाजले मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ वाढ. 2021 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला. जाणून घेऊयात 2022 मध्ये इंधनाच्या दरात काय फेरबदल होण्याची शक्यता आहे.

2021 मध्ये पेट्रोल 14 तर डिझेल 17 टक्क्यांनी महागले; पुढील वर्षात इंधनाचे दर कमी होणार?
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 2:17 PM

नवी दिल्ली : आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. हे वर्ष विविध कारणांनी गाजले मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ वाढ. 2021 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला. इंधनाचे दर वाढल्याने सर्वच वस्तू  महाग झाल्या, या महागाईचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य मानसाला बसला. पेट्रालो आणि डिझेलच्या किमतीसोबतच गॅसच्या दर देखील समांतर वाढत राहिल्याचे पहायला मिळाले. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात 14 टक्के दर डिझेलच्या दरात 17 टक्के वाढ झाली. लप

पेट्रोलचे दर  118 रुपये लिटरवर 

दोन महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा भडका उडाला होता. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर हे 118 रुपये लिटरवर पोहोचले होते. तर डिझेलच्या किमतीने देखील शंभरी ओलांडली होती. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांमध्ये मोठा असंतोष पसरल्याचे पहायला मिळाले. अखेर चार नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. उत्पादन शुल्क कमी केल्याने पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हापासून देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. केंद्राप्रमाणेच काही राज्य सरकारने देखील पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स कमी केल्याने काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याचे पहायला मिळाले.

इंधनाचे दर आणखी वाढणार

2021 मध्ये पेट्रोलच्या किमती तब्बल 14 टक्क्यांनी वाढल्या तर डिझेलच्या किमतीमध्ये 17  टक्क्यांची वाढ झाली. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात तरी दरवाढीपासून दिलासा मिळणार का याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र नव्या वर्षात देखील पेट्रोल, डिझेलच्या भावात तेजी काय राहण्याचा अंदाज आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणेज सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये कच्चे तेल प्रति बॅरल 90 डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलावर अवलंबून असतात. येत्या वर्षात वर्षभर कच्च्या तेलाच्या दरात तेजी कायम राहण्याचा अंदाज असल्याने, पेट्रोल, डिझेलचे दर आणखी वाढू शकतात.

संबंधित बातम्या

आज आयटीआर दाखल करण्याचा शेवटचा दिवस; …तर मध्यरात्रीपासून भरावा लागणार पाच हजारांचा दंड

जीएसटी परिषदेच्या 46 व्या बैठकीला सुरुवात, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची उपस्थिती; महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णयाची शक्यता

खात्यात बॅलन्स नसताना, बँक देईल मोठी रक्कम, ओव्हरड्राफ्ट सुविधेचा उठवा फायदा, तारण ठेवा आणि सुविधा मिळवा 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.